Agriculture stories in Marathi, feed management for milking cattle | Agrowon

जास्त दुग्धोत्पादनासाठी वाढवा अाहारातील पोषणतत्त्वे
डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

दुधाळ जनावरांमध्ये पोषणतत्त्वाच्या अभावामुळे रोग उद्‌भवतात. जनावरे वेळेत माजावर येत नाहीत. यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कमी आहारातून जनावरांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यासाठी आहारातील पोषणतत्त्वांची घनता वाढवणे आवश्‍यक आहे.

दुधाळ जनावरांमध्ये पोषणतत्त्वाच्या अभावामुळे रोग उद्‌भवतात. जनावरे वेळेत माजावर येत नाहीत. यामुळे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे कमी आहारातून जनावरांची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यासाठी आहारातील पोषणतत्त्वांची घनता वाढवणे आवश्‍यक आहे.

संकरित दुधाळ जनावरांचे दूध 
 उत्पादन हे देशी जनावरांपेक्षा जास्त असते. दूध देण्याच्या सुरवातीच्या ६ आठवड्यांमध्ये दूध तयार करण्यासाठी लागणाऱ्या पोषकतत्त्वांचे प्रमाण हे आहारातून मिळणाऱ्या पोषणतत्त्वांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते. कारण या काळात जनावरांचा आहार कमी असतो. कमी आहारातून त्यांची शरीराची पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होत नाही. म्हणून या काळात दूध उत्पादनासाठी गायी/ म्हशींच्या शरीरात साठवलेल्या पोषणतत्त्वांचा वापर केला जातो. त्यामुळे या काळात जनावरांचे दिवसेंदिवस वजन कमी होते व जनावर अशक्त होते. त्यामुळे पुढील दूध उत्पादन कमी मिळते. 

  • दूध देण्याच्या सुरवातीच्या सहा आठवडे कालावधीमध्ये कमी आहारातून पोषणतत्त्वांची गरज पूर्ण होण्यासाठी आहारातील पोषणतत्त्वांची घनता वाढवणे आवश्‍यक आहे.
  • पोषणतत्त्वांची घनता वाढवण्यासाठी अाहारात द्विदल चारा पिकांचा वापर करणे, संरक्षित स्निग्ध पदार्थ, संरक्षित प्रथिने यांचा वापर करणे फायदेशीर ठरते.

चॅलेंज फिडिंग किंवा जास्तीचा आहार

  • गाय / म्हैस विण्याच्या अगोदर दोन आठवडे खुराकाचे प्रमाण दैनंदिन मात्रेपेक्षा वाढवणे याला चॅलेंज फिडिंग असे म्हणतात.
  • दैनंदिन मात्रेपेक्षा सुरुवातीला ५०० ग्रॅम प्रतिदिन याप्रमाणे खुराकाच्या प्रमाणात वाढ करावी नंतर प्रतिदिन ५०० ते १००० ग्रॅम प्रति १०० किलो वजनास याप्रमाणे खुराकाचे प्रमाण ठेवावे. 
  • जास्त खुराकाच्या प्रमाणामुळे दूध उत्पादनात जास्तीत जास्त वाढ होते. तसेच ज्या जनावरांची पचनक्षमता जास्तीत जास्त पोषणतत्वांच्या पचनासाठी तयार होते यामुळे प्रतिवेत दूध उत्पादनात वाढ होते.
  •  दुधाळ जनावरांना त्यांच्या वजनाप्रमाणे दूध देण्याचे प्रमाण व दुधातील स्निग्धांश (फॅट)चे प्रमाण यानुसार आहारामध्ये हिरवा 
  • चारा (एकदल आणि द्विदल), वाळला चारा व खुराकाचा वापर करावा.

दुधाळ जनावरांसाठी खुराक

घटक खुराक-१ खुराक-२
 
मका भरडलेला ३३ ५०
शेंगदाणा पेंड २० ---
मोहरी पेंड १० ----
सरकी पेंड ०३ ३०
गहू भुसा १५ ---
उडीद चुरी --- १७
राईस पॉलिश १० ----
तेलविरहित राईस पॉलिश ०६ ---
क्षार मिश्रण
 
०२ ०२
मीठ ०१ ०१

संपर्क -  डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

इतर कृषिपूरक
जनावरांतील पोटफुगीची कारणे, लक्षणे, उपायजनावरांना सर्वसाधारणपणे कडबा, हिरवी वैरण व पेंड...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
दुधाळ जनावरांसाठी संतुलित, संपूर्ण आहार...संतुलित आहार व संपूर्ण आहार या एकाच नाण्याच्या...
म्हैसपालनातील समस्यांवर प्रभावी...म्हैसपालनाचे तंत्र या लेखमालेमध्ये म्हैसपालनातील...
ग्राहकांची मागणी अोळखून कडकनाथ,...लिंबायत(टाकळी), जि. नांदेड येथील असलम खान बाबुखान...
जनावरांना द्या पुरेसे स्वच्छ पाणीजनावरांच्या शरीराला लवचिकता पाण्यामुळे येते....
शेडनेट यंत्रणा कमी करेल गोठ्यातील तापमानऑस्ट्रेलियामधील एका कंपनीने गोठ्यातील जनावरांचे...
लसीकरणातून रोखा ब्रुसेलॉसीस रोगाचा...सद्यःस्थितीमध्ये म्हशींमध्ये ब्रुसेलॉसीस रोगाचा...
एकशेतीस जनावरे, विस्तारलेला दुग्धव्यवसायसन २००६ मध्ये दोन गायींपासून सुरू केलेला...
पशू सल्लाहवामानातील बदलानुसार जनावरांचे दूध उत्पादन,...
मत्स्यसंवर्धन नवीन तळ्यांची निर्मितीकेंद्र शासन अर्थसाह्य नीलक्रांती धोरणांतर्गत...
संगोपन तलावामध्ये करा कोळंबी बीजाचे...उत्तम प्रतीच्या बीजाची उपलब्धता ही कोळंबी...
कापूस, सोयाबीनच्या फ्युचर्स भावात वाढया सप्ताहात साखर, गहू व हरभरा यांचे भाव वाढले....
महिलांसाठी सोयाबीन प्रक्रिया उद्योगसोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण डाळी, शेंगदाणे,...
उन्हाळ्यात म्हशींची घ्या काळजीउन्हाळ्यातील वाढलेल्या तापमानाचा परिणाम...
परसबागेतील कुक्कुटपालनासाठी वनराज...सर्व प्रकारच्या वातावरणात सहजरीत्या वाढू शकणाऱ्या...
व्यवस्थापन माणगा बांबू लागवडीचे...माणगा बांबू टणक असून, भरीव असतो. विविध प्रकारच्या...
मत्स्यपालनाच्या पद्धतीबाबत माहिती...मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण...
लाळ्या खुरकूत रोगाचे नियंत्रण कसे करावे?सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत...