कोकम झाडाचे व्यवस्थापन कसे करावे

कोकम फळ
कोकम फळ

कोकमच्या झाडाला जुन्या झालेल्या फांदीला फुले लागतात. कोकममध्ये दोन प्रकारच्या फांद्या आढळतात. एक म्हणजे आकाशाकडे जाणाऱ्या, ज्यांना शास्त्रीय भाषेत "ऑर्थोट्रॉफिक'' असे म्हणतात. दुसऱ्या म्हणजे जमिनीला समांतर येणाऱ्या किंवा जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या, ज्यांना "प्लॅजिओट्रॉफिक'' असे म्हणतात. यातल्या प्लॅजिओट्रॉफिक या फांद्यांनाच फुले व फळे लागतात. या फांद्या जितक्‍या जास्त असतील, तितके फुलांचे प्रमाण अधिक असते व परिणामी उत्पादनदेखील अधिक मिळते. खालच्या भागामधल्या फांद्यांना उत्पादन जास्त मिळते.   झाडाला सर्व बाजूंनी सूर्यप्रकाश किंवा चांगला प्रकाश मिळायला हवा. प्रकाश जर व्यवस्थित मिळाला नाही, तर झाड उंच वाढते. खालच्या बाजूला फांद्या विरळ होतात. खालच्या फांद्यांवरील पाने विरळ होतात. अशा झाडांना फुले व फळे लागतात; पण फळांचा आकार लहान राहतो.   अशा झाडांमध्ये आपल्याला आढळून येईल की, झाडाच्या शेंड्याला जास्त फळे लागतात. ही फळे काढण्यासाठीदेखील अडचण येते. बऱ्याचदा आपण ही फळे काढू शकत नाही. या झाडांवरून मिळणाऱ्या फळांपैकी सुमारे ३० टक्के फळे ही फारच लहान असतात.   कोकमच्या झाडाला सूर्यप्रकाशाचे नियोजन करणे आवश्‍यक आहे. झाडाच्या आजूबाजूला असलेल्या अन्य झाडांची सावली कमी केल्यास त्याचा फायदा कोकमच्या उत्पादनावर चांगल्या प्रकारे होईल, म्हणूनच कोकमच्या झाडाच्या आजूबाजूच्या झाडांची गर्दी कमी करावी.  जर कोकम फळे नारळ व सुपारी बागेत लावली असली, तर मात्र सावली कमी होण्याला मर्यादा पडतील. कोकमच्या झाडावरील मेलेल्या फांद्या व रोगट फांद्या वर्षातून किमान एकदा तरी कापून झाडाची स्वच्छता करावी.  पूर्ण वाढलेल्या कोकमच्या झाडाला आवश्‍यकतेनुसार खतपुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे. एका पूर्ण वाढलेल्या कोकमच्या झाडाला सुमारे २० ते ३० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. त्याचबरोबर सुमारे ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम स्फुरद व २५० ग्रॅम पालाश हे मुख्य अन्नघटक द्यावेत.  संतुलित खतपुरवठा केल्यानंतर कोकमला जमिनीकडे वाढणाऱ्या फांद्या जोमदार येतात. पाने चांगली रुंद होतात व या सर्वांचा परिणाम उत्पादनवाढीमध्ये होतो. संपर्क - ०२३५८- २८२४१५, विस्तार क्र. २५० उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली, जि.रत्नागिरी   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com