Agriculture stories in Marathi, grape disease control , AGROWON, Maharashtra | Agrowon

वाढलेल्या आर्द्रतेमुळे डाऊनीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
डॉ. एस. डी. सावंत
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सुरू असलेला पाऊस हळूहळू कमी होत जाईल. नाशिक विभागातील पाऊस पूर्णपणे थांबला आहे. 

सर्व द्राक्ष विभागांमध्ये सुरू असलेला पाऊस हळूहळू कमी होत जाईल. नाशिक विभागातील पाऊस पूर्णपणे थांबला आहे. 

  • पुणे, सांगली, सोलापूर या भागामध्ये गुरुवारी शुक्रवारी (ता. २८, २९) काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. 
  • सांगली भागामध्ये जवळजवळ सर्व भागामध्ये गुरुवार-शुक्रवार संध्याकाळी एक दोन मोठ्या सऱ्या किंवा हलका पाऊस होईल. 
  • सोलापूर शहर, नानज, होटगी या भागामध्ये हा पाऊस होईल. पण बाकीच्या बागामध्ये वैराग, बार्शी, उस्मानाबाद, लातूर या भागामध्ये फक्त शुक्रवारी काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येत्या चार- पाच ऑक्टोबरपर्यंत कुठेही पावसाची शक्यता नाही. पाच सहा तारखेला बहुतांश सर्व द्राक्ष विभागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. 

उपाययोजना ः 

  • ​हवामानाच्या या अंदाजानुसार, नाशिकमधील शेतकऱ्यांनी आता छाटणी करण्यास अजिबात हरकत नाही. सांगली, सोलापूर येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारनंतर छाटणी सुरू करावी. 
  •  आतापर्यंत झालेल्या पावसामुळे वातावरणातील आर्द्रता वाढलेली आहे. बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण कमी झाले असून, निरभ्र वातावरण आहे. अशा परिस्थितीत पहाटेचे तापमान लवकर कमी होते. या काळात हवेचे तापमान कमी व जमिनीचे तापमान जास्त राहते. या तफावतीमुळे बऱ्याच ठिकाणी जास्त प्रमाणात धुके किंवा दव पडण्याची शक्यता आहे. असे धुके सूर्यप्रकाश चांगला येईपर्यंत राहते. अशा वातावरणामध्ये डाऊनी मिल्ड्यूचा नवा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पाऊस नसला तरी ज्या ठिकाणी असे धुके पडेल, तिथे डाऊनीच्या नियंत्रणासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 
  •  मागील आठवड्यात लिहिल्याप्रमाणे पोंगा अवस्थेमध्ये मॅन्कोझेबची धुरळणी व तीन पाने बाहेर उमलल्यानंतर पुढील अवस्थेमध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशकाची बाह्यस्पर्शी बुरशीनाशकाबरोबर फवारणी करणे अजूनही अत्यंत आवश्यक आहे. 
  • बागेमध्ये घडावर, पानांवर डाऊनी दिसण्यास सुरवात झालेल्या बागांमध्ये एक- दोन पाने किंवा घड दिसत असतील, तर काढून जाळून टाकावेत. त्यानंतर फवारणी करावी. आंतरप्रवाही बुरशीनाशकांमध्ये अर्धा ते एक मि,लि. चांगल्या दर्जाचे सर्फेक्टंट मिसळून फवारल्यास फवारलेले आंतरप्रवाही किंवा बाह्यस्पर्शी बुरशीनाशक स्टोमॅटा (पर्णरंध्रे) च्या आत पोचू शकते. त्यामुळे डाऊनीचे चांगले नियंत्रण मिळू शकेल.
  • न छाटलेल्या बागांमध्ये शक्यतो बुरशीनाशकाचा वापर करू नका. त्याऐवजी डाऊनी किंवा भुरी प्रादुर्भाव झालेल्या नवीन फुटी काढून घेऊन बाकीच्या कॅनोपीमध्ये जैविक नियंत्रक घटकांचा वापर करावा. त्यासाठी ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रति लिटर किंवा बॅसिलस सबटिलीस २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारावे. 
  • न छाटलेल्या किंवा नुकत्याच छाटलेल्या बागांमध्ये ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस सबटिलिस १ किलो या प्रमाणात ठिबकद्वारे सोडावे. ठिबकद्वारे दिलेल्या जैविक घटकांमुळे नवीन फुटणाऱ्या फुटींची आंतरिक रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे नवीन फुटीवर वापरलेल्या बुरशीनाशकांचा परिणाम चांगला मिळतो.

 संपर्क : डॉ. एस. डी. सावंत, ०२०-२६९५६००१,  
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

इतर अॅग्रो विशेष
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...