व्यासंग वाढवत तरुणाची प्रगतीकडे वाटचाल  

सटाणा (जि. औरंगाबाद) येथील शिवाजी घावटे यांनी डाळिंब बागेतून दर्जेदार उत्पादन घेतले आहे. यंदा बहरलेल्या द्राक्ष बागेत शिवाजी घावटे
सटाणा (जि. औरंगाबाद) येथील शिवाजी घावटे यांनी डाळिंब बागेतून दर्जेदार उत्पादन घेतले आहे. यंदा बहरलेल्या द्राक्ष बागेत शिवाजी घावटे

युवा शेतकरी आता नव्या विचाराने शेती करू लागला आहे. पाणीटंचाई, बाजारपेठेतील मागणी या बाबी लक्षात घेऊन भले थोडी जोखीम घेऊन तो शेतीत बदल करतो आहे. अौरंगाबाद जिल्ह्यातील सटाणा येथील शिवाजी तुकाराम घावटे हा युवक त्याच मानसिकतेतून डाळिंब, द्राक्षाची शेती करू लागला आहे.राज्यात भ्रमंती करून अभ्यास, प्रशिक्षणातून स्वतःला प्रगतिपथावर नेण्याचे त्याचे प्रयत्न सुरू आहेत. अौ रंगाबाद जिल्ह्यातील सटाणा भागातील शिवाजी घावटे हा तरुण सध्या नव्या विचारांनी शेती करतो आहे. कृषी विषयातील पदविका प्राप्त केलेल्या या शेतकऱ्याने डाळिंब, द्राक्ष शेतीतील व्यासंग वाढवला आहे. त्याचे उदाहरण विशेष करून अन्य तरुणांना प्रेरणादायी असेच आहे.  नोकरीचा अनुभव घेऊन शेतीत पदार्पण घरची दहा एकर शेती असलेले शिवाजी घावटे यांनी २००३ मध्ये कृषी पदविका प्राप्त केल्यानंतर कृषी निविष्ठा क्षेत्रातील खासगी कंपनीद्वारे मार्केटिंग विषयातील नोकरीचा अनुभव घेण्यास सुरूवात केली. केली. उत्पादनांची विक्री करताना अन्नद्रव्यांचे व जमिनीच्या सुपिकतेचे महत्त्व लक्षात येत होते.  नोकरीत फिरती असल्याने विविध ठिकाणच्या डाळिंबाच्या बागा पाहता आल्या. त्याचे अर्थशास्त्रही जाणून घेतले. फार काळ नोकरी करायची नाही असेच ठरवले होते. मग पारंपरिक शेती करणाऱ्या वडिलांकडे डाळिंब लावण्याचा आग्रह धरला. पण सुरवातीला हिरवा कंदील काही मिळाला नाही. अखेर शिवाजी यांनी नोकरी सोडली व पूर्णवेळ शेतीचीच जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली.  डाळिंब, द्राक्षाकडे वाटचाल 

  • आज शिवाजी यांनी साडेतीन एकरांत डाळिंब व अडीच एकरांत द्राक्षाची बाग उभी केली आहे. 
  • डाळिंबाचा सुमारे सहा ते सात वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. द्राक्षाचे हे उत्पादनाच्या दृष्टीने दुरसेच वर्ष आहे. आजपर्यंत डाळिंबाची चार ते पाच उत्पादने घेतली आहेत. आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने  
  • सुमारे तीन वर्षांपूर्वी मोसंबीचे अडीच एकर क्षेत्र त्यांनी कमी केले. त्या जागी द्राक्षे घेतली. औरंगाबाद जिल्ह्यातील जे शेतकरी द्राक्षाकडे वळले त्यामध्ये शिवाजी यांचाही सहभाग आहे.
  • द्राक्षाचे मार्केटिंग मागील वर्षी पहिले उत्पादन घेतले. विक्रीचा अनुभव नव्हता. व्यापाऱ्यांनी मागणी केलेले दर परवडत नसल्याने त्यांना नकार दिला. पण पुढे दर अधिकच पडले. पण व्यापाऱ्यांना माल देण्याबरोबरच स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला. अौरंगाबाद परिसरातील काही मुख्य ठिकाणी स्वतः स्टॉल लावले.  जिथे व्यापाऱ्यांना १८ ते २५ रुपये प्रति किलो दराने विकणे भाग पडले होते तिथे थेट विक्रीतून किलोला ४० रुपये हाती पडले. मग परिसरातील हातगाडीवालेही द्राक्षांची मागणी करू लागले. त्यांनाही ३० रुपये दराने द्राक्षे दिली. थेट विक्रीचा हा अनुभव शिवाजी यांना निश्चितच आत्मविश्वास देणारा ठरला आहे.  मार्केटनुसार बहार व्यवस्थापन  डाळिंबाच्या आंबे बहाराचं व्यवस्थापन करतांना शिवाजी मार्केटचा अभ्यास महत्वाचा मानतात. पहिल्या वर्षी मिळालेल्या दरानुसार दुसऱ्या वर्षीच्या बहाराचे व्यवस्थापन करण्याचे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे. आजवरच्या चार वर्षांत त्यांचे बाग ताणावर सोडण्याचे व्यवस्थापन त्याविषयी बरचं काही सांगून जातं. या पद्धतीमुळे ‘एक्‍स्पोर्ट क्‍वाॅलिटी’च्या मालाला दर पडण्याचा धोका टाळला गेल्याचा त्यांचा अनुभव सांगतो. 

    ​उत्पादन डाळिंब (प्रति २० किलो क्रेट)   

    २०१४ ९०० क्रेट- दोन एकरांतून
    २०१५ १६०० क्रेट- दोन एकर
    २०१६ साडे १५०० क्रेट- (दोन एकर)
    २०१७ २६०० क्रेट (साडेतीन एकर)

           शेततळे तारणहार  खडक असल्याने शेतातील विहीर आटते. फेब्रुवारीनंतर पाण्याची शाश्वती नसते. त्यावर पर्याय म्हणून प्रत्येकी २० गुंठ्याची दोन शेततळी घेतली आहेत. त्यातील पाणी अतिशय काटेकोरपणे वापरण्याशिवाय पर्याय नाही. फेब्रुवारीनंतर डाळिंब व द्राक्ष अशा दोन्ही बागा शेततळ्याच्या पाण्यावरच अवलंबून असतात.  

    व्यासंग वाढवला

  • अडीच एकर द्राक्षात प्रत्येकी सव्वा एकरावर माणिक चमन व सोनाका द्राक्षाची बाग उभी आहे.
  • माती परीक्षणावर शिवाजी यांचा विशेष भर आहे. शेतातील चार वेगवेगळ्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण त्यांनी करून घेतले आहे. परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्य व पाण्याचे व्यवस्थापन केले आहे. 
  • द्राक्ष लावण्यापूर्वी गटासह सुमारे एक वर्ष विविध ठिकाणी शिवाजी यांनी भ्रमंती केली. नाशिक, सांगली आदी भागांत जाऊन शेतकऱ्यांचे प्रयोग अभ्यासले.
  • स्वखर्चाने म्हणजे दीड लाख रुपये खर्च करून अलीकडेच इस्राईलला जाऊन आले. तेथील पाणी व्यवस्थापन, शेती पद्धती पाहिली. 
  • इस्राईलमध्ये कळाले माती परीक्षणाचे महत्त्व इस्राईलमधील अभ्यास दौऱ्याचा अनुभव सांगताना शिवाजी म्हणाले, की डाळिंब बागेत तेलकट डाग रोग येतो. त्यावरील उपाय मी इस्राईलमधील तज्ज्ञांना विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, की तुम्ही जमिनीचे परीक्षण केले पाहिजे. त्यात कोणते घटक आहेत, कोणते नाहीत ते वेळोवेळी पाहिले पाहिजेत. मातीबरोबरच पान, देठ परीक्षणही केले पाहिजे. शिवाजी म्हणतात की आता माती परीक्षणाचे खरे महत्त्व मला कळाले आहे. द्राक्षातील पंधरा जणांचा आमचा गट आता हे परीक्षण करून घेणार आहे. लवकरच माझ्या शेतात या विषयातील मार्गदर्शनपर कार्यक्रमही आयोजीत केला आहे.  कोणत्या सुधारणा केल्या?  शिवाजी म्हणाले, की आम्ही पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती भागातही फिरलो. तेथे शेडनेटमधील भाजीपाला तंत्र पाहिले. मात्र हे खर्चिक तंत्रज्ञान अंमलात आणण्यापेक्षा फळपिकांकडे वळावे असे वाटले. त्या दृष्टीनेच डाळिंब, द्राक्ष फायदेशीर वाटले.

  • कोणतीही गोष्ट कोणाकडून शिकताना कमीपणा वाटून घेतला नाही. विद्यार्थ्याप्रमाणे शिकण्याची वृत्ती ठेवली आहे. 
  • दुष्काळ, मार्केटची स्थिती पाहून पीकपद्धती बदलली. 
  • आता कृषी सेवा केंद्रही सुरू केले आहे. भावाकडे त्याची जबाबदारी आहे. 
  • संपर्क : शिवाजी घावटे, ९१५८२७११३७ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com