Agriculture stories in Marathi, how to plant wheat crop , AGROWON, Maharashtra | Agrowon

गहू लागवड कशी करावी?
डॉ. भरत रासकर
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

जिरायती भागात पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तर बागायती पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास फुटव्यांची संख्या, ओंबीची लांबी,ओंबीतील दाण्यांची संख्या, दाण्याचा आकार आणि वजन वाढून उपेक्षित उत्पादन मिळते.
बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्‍टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. काही भागात उसाची तोडणी झाल्यानंतर गव्हाचे पीक घेतले जाते. परंतू १५ डिसेंबरनंतर गव्हाचे पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.

जिरायती भागात पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तर बागायती पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी. या कालावधीत पेरणी केल्यास फुटव्यांची संख्या, ओंबीची लांबी,ओंबीतील दाण्यांची संख्या, दाण्याचा आकार आणि वजन वाढून उपेक्षित उत्पादन मिळते.
बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्‍टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते. काही भागात उसाची तोडणी झाल्यानंतर गव्हाचे पीक घेतले जाते. परंतू १५ डिसेंबरनंतर गव्हाचे पेरणी केल्यास उत्पादनात घट येते.
जिरायती भागासाठी पंचवटी, नेत्रावती, बागायती भागासाठी त्र्यंबक,तपोवन,गोदावरी,फुले समाधान आणि बागायती उशिरा पेरणीसाठी   एनआयएडब्ल्यू ३४ या जातीची निवड करावी. वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी १०० ते १२५ किलो  आणिउशिरा पेरणीसाठी  हेक्‍टरी १२५ ते १५० किलो बियाणे लागते. पेरणीपुर्वी थायरम ३ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति १० किलो बियाण्यास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर व २५० ग्रॅम पीएसबी  जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
पेरणी  करताना दोन ओळींत २० सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीस उशीर झाल्यास दोन ओळींत १८ सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. यामुळे उगवण चांगली होते. ट्रॅक्‍टरने पेरणी करत असताना बियाणे ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. पाण्याचा प्रवाह, जमिनीचा उतार व प्रकार लक्षात घेऊन  २.५ ते ३ मीटर रुंदीचे सारे पाडावेत.
माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्याची मात्रा द्यावी.
बागायती गव्हाच्या वेळेवर पेरणीसाठी हेक्‍टरी ८ ते १० टन पूर्ण कुजलेले शेणखत आणि लोहाची कमतरता असणाऱ्या जमिनीत २० किलो हिराकस हे १०० किलो शेणखतात १५ दिवस मुरवून नंतर द्यावे.  जिरायत पेरणी करताना संपूर्ण नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. गव्हाच्या बागायत वेळेवर पेरणीसाठी सरळ खते किंवा मिश्र खते यांच्या उपलब्धतेनुसार द्यावे.

संपर्क  ः डॉ. भरत रासकर, ८७८८१०१३६७
कृषी संशोधन केंद्र, निफाड,जि. नाशिक

टॅग्स

इतर तृणधान्ये
भात काढणीनंतर योग्य वाळवण आवश्‍यक या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे भातपिकाची...
तंत्र खपली गहू लागवडीचे...खपली गव्हाची पेरणी १ ते २० नोव्हेंबर दरम्यान...
लागवड जिरायती गव्हाची...जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या...
शास्त्रीय पद्धतीनेच करा गहू बीजोत्पादनआनुवंशिक आणि भौतिकदृष्ट्या शुद्ध असणारे गहू...
तंत्र बागायती गहू लागवडीचे...वेळेवर पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात...
बागायती गहू लागवडीसाठी सुधारित वाणखरिपातील पिकांच्या काढणीनंतर काही ठिकाणी...
रब्बी पिकांतील रासायनिक तणनियंत्रणपिकांच्या अधिक उत्पादनासाठी योग्य वेळेत...
रब्बी ज्वारीच्या योग्य जाती पेरारब्बी ज्वारीची उत्पादकता कमी असण्याचे प्रमुख कारण...
भातपिकावर तपकिरी तुडतुडे, लष्करी...मुसळधार पावसानंतर सद्यस्थितीत पावसाने उघडीप दिली...
गहू लागवड कशी करावी?जिरायती भागात पेरणी ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या...
लागवड खपली गव्हाचीखपली गव्हाची काळी कसदार तसेच हलक्या, चोपण...
भातावरील पर्ण करपा, कडा करपा रोग...राज्यात भातामध्ये अनेक ठिकाणी पर्ण करपा व कडा...
गोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक गोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप...
ज्वारी पीक संरक्षण किडींचा एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब करून...
​ज्वारीवर आधारित प्रक्रिया पदार्थ ज्वारीचा उपयोग प्रामुख्याने भाकरीसाठी होतो....
उन्हाळी ज्वारी लागवड तंत्रज्ञान उन्हाळी हंगामातसुद्धा मराठवाड्यामध्ये विशेषतः...
रब्बी ज्वारी वाण आणि लागवड तंत्रज्ञानरब्बी ज्वारी वाण मध्यम ते भारी जमीन आणि मध्यम...
खरीप ज्वारी लागवड तंत्रज्ञानज्वारी हे उष्ण तसेच अर्थशुष्क उष्ण कटीबंधीय...
जागतिक मानांकनामुळे मंगळवेढ्याच्या...प्रसिद्ध आहार विशेषज्ञ ऋजुता दिवेकर यांनी आपल्या...
भातावरील करपा रोगाचे नियंत्रणकरपा ः रोगकारक बुरशी : Pyricularia oryzae...