मध पोळ्यातील मेणाचे महत्त्व

मधमाशीपालन
मधमाशीपालन
  • पोळ्याच्या बांधकामासाठी लागणारा मुख्य व एकमेव कच्चा माल म्हणजे मधमाश्‍यांचं मेण. मधमाश्‍यांमधील कोवळ्या वयाच्या कामकरी माश्‍यांच्या उदर भागात असलेल्या मेणग्रंथींच्या चार जोड्यांमधून मेण स्रवते. 
  • मधमाश्यांच्या कुटुंबाची मेणाची गरज हंगामानुसार संपते. वयोमानाप्रमाणे कामकरी माश्‍यांच्या मेणग्रंथी अकार्यक्षम होतात. 
  • फुलोऱ्याच्या हंगामात पूर्णवाढीच्या एपिस मेलिपेराच्या मोहळातील पोळ्यात सुमारे ५०,००० ते ७५,००० षटकोनी घरे असतात. त्यांची व्याप्ती २ चौरस मीटर एवढी भरते. अशा पोळ्यासाठी ८०० ग्रॅम मेण लागते.
  • भारतीय सातेरी जातीच्या पोळ्यातील कामकरी मधमाश्यांच्या घराचा आकार लहान असतो. दक्षिणेतील सपाटीवरच्या क्षेत्रात ही घरे ४.२५ मि.मी. रुंदीची असतात. जसजसे उत्तरेकडे जावे तसतसा हा आकार मोठा होत जातो. 
  • सर्वात लहान आकार ४.२५ मि. मी. हा केरळमध्ये, तर त्याहूनही लहान ४.२० मि.मी. श्रीलंकेमध्ये सापडतो. या दोन्ही जातींच्या मेणाचे विलयबिंदूही वेगळे असतात. 
  • भारतीय सातेरी मधमाशीचे मेण ६० अंश सेल्सिअस तापमानाला वितळते, तर विदेशी मेण हे ६२ अंश सेल्सिअस तापमानाच्या आसपास वितळते.
  • १६८४ मध्ये मार्टिन जॉन यांनी मधमाश्यांच्या मेणाची उत्पत्ती त्यांच्या उदरभागात होते, असा शोध सर्वप्रथम लावला. 
  • मेणाच्या पातळ चकत्या त्यांनी तिथं पाहिल्या आणि त्यांचा उपयोग पोळी बांधायला केला जातो अशी नोंद केली. मेणाची निर्मिती मधमाशीच्या एकूण आठ मेणग्रंथींतून होते. 
  • कोवळ्या वयाच्या कामकरी माशांच्या उदरभागातील मेणकप्प्यांमध्ये मेणाच्या पांढऱ्या चकत्या दिसतात. मेणाच्या चकत्या तयार होण्यापूर्वी मेण द्रवरूप असते. 
  • दोन दिवस वयाच्या कामकरी मधमाश्यांच्या रक्तातील चयापचय प्रक्रियेचा परिणाम म्हणून मेण तयार होते. मधमाश्‍यांनी खाल्लेल्या व शोषण केले गेलेल्या मधातील साखरेच्या पचनातून शेवटी मेण ग्रंथींमध्ये मेणनिर्मिती होते. 
  • एक किलो मेण तयार होण्यासाठी सुमारे ८ ते ९८ किलोग्रॅम मध मधमाश्‍यांना पचवावा लागतो. 
  • ताजे शुद्ध मेण रंगाने पांढरे दिसते. मात्र, मधमाश्‍यांच्या पोळ्यात किंचित पिवळी छटा दिसू लागते. कारण त्यावर परागकणातील कॅरटिनॉईड रंगकणांचा परिणाम होतो. हे कण मेणात विद्राव्य असतात. 
  • मेणाच्या चकत्यांचा बांधकामासाठी वापर होताना त्यात लाळेचा अंश मिसळतो, तोच या रंगकणांचा स्रोत असावा. 
  • वारंवार वापरानंतर पिलाण्याची पोळी गडद रंगाची होत जातात, कारण त्यामध्ये अनेक पिढ्यांच्या पिलाण्याची कात वा जुनी त्वचा मिसळत जाते.
  • शुद्ध मेणाची मानके
    खनिजे     ०.५ टक्के  
    बेन्झिनमध्ये न विरघळणारे पदार्थ  १.०० टक्का
    पाण्यात विरघळणारे पदार्थ     ०.५ टक्के
    वायुरूप तत्त्वे   १ टक्का 
    घनता     ०.९५ टक्के
    मेणाचे भौतिक गुणधर्म 
    मेणाचं विशिष्ट गुरुत्व     ०.९०
    गंध     मधासारखा
    विद्राव्यता     पाण्यात अविद्राव
    थंड अल्कोहोलमध्ये किंचित विद्राव्य, बाष्पनशील तेलांमध्ये व क्लोरोफॉर्म, इथर, बेन्झीन आणि कार्बन डाय-सल्फाईडमध्ये पूर्ण विद्राव्य. -

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com