सुधारित कृषी अवजारांबाबत माहिती द्यावी.

सुधारित कृषी अवजारांबाबत माहिती द्यावी.

म.कृ.वि. बैलचलित खत व बी पेरणी यंत्र  या यंत्राच्या साह्याने आपण विविध पिकांची पेरणी करू शकतो. दोन ओळींतील व दोन रोपांतील अंतर पाहिजे ते ठेवू शकतो. खत व बी एकाच वेळी पेरू शकतो, त्यामुळे बियाण्याचे व खताचे नुकसान होत नाही. या यंत्राच्या साह्याने आपण आंतरपिके घेऊ शकतो.

बैलाच्या साह्याने चालणारा पाच दातेरी मोगडा/ पेरणी यंत्र  या अवजाराचा वापर दुय्यम व आंतरमशागतीसाठी करता येतो. या मोगड्यावर पेरणीच्या संरचना बसवून दोन फणी व तीन फणी पेरणी यंत्रही तयार करता येते. हा मोगडा लाकूड किंवा लोखंडापासून तयार करता येतो.

तीन फणी मोगडा  हा मोगडा आंतरमशागतीसाठी कोळप्यासारखा वापरता येतो. पुढे दोन व त्याच्या मधोमध मागे एक असे तीन फणांचे हे कोळपे असते. फणाचे फाळ त्रिकोणी पात्यांचे असतात, त्यामुळे पिकाच्या दोन रांगांमधील जमीन उकरली जाते. या अवजाराने तणे निघतात, लहान सरी-वरंबे तयार होतात; तसेच पिकाच्या बुंध्याजवळ मातीची भर पडते. एका दिवसात साधारण एक हेक्‍टर क्षेत्राची आंतरमशागत होऊ शकते.  

संपर्क : ०२४५२- २२९०००  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com