ऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...

ऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...
ऊस पिकासाठी ठिबक सिंचन करताना...

ऊस लागवडीची दिशा आणि कर्बवायू यांचा संबंध गेल्या भागामध्ये पाहिला. या वेळी जमिनीचा प्रकार आणि मगदुराप्रमाणे सरींचा आकार, ठिबक सिंचनातील विविध घटकांचे प्रमाण याविषयी माहिती घेऊन प्रत्यक्ष पिकाची पाण्याची गरज कशी काढतात, ते पाहू.

जमिनीच्या मगदुरानुसार ड्रिपर्सची संख्या व त्यांची योग्य जागा अवलंबून असते. उदा. भारी काळ्या जमिनीत पाणी केशाकर्षण दाबाने आडवे पसरते व त्या तुलनेने गुरुत्वाकर्षण दाबामुळे कमी खोल जाते. या उलट हलक्या, मुरमाड वा वालुकामय जमिनीत केशाकर्षण दाब हा गुरुत्वाकर्षण दाबापेक्षा कमी असतो. त्यामुळे पाणी आडवे न पसरता खाली जाते. मध्यम जमिनीत हे प्रमाण दोन्ही (हलकी व भारी जमीन) यांच्यामध्ये असते. त्यामुळे पिकांच्या सऱ्या व ठिबकनळ्या जवळ किंवा लांब ठेवून, ड्रिपर्स कमी जास्त अंतरावर लावावे लागतात. जमिनीच्या प्रकारानुसार दोन सऱ्यांमधील अंतर, ड्रिपर डिस्चार्ज व दोन ड्रिपरमधील अंतर ठरविण्यासाठी तक्त्याप्रमाणे काटेकोरपणे अवलंब करावा. (तक्ता पाहा.)

तपशील जमिनीचा प्रकार जमिनीचा प्रकार जमिनीचा प्रकार
     हलकी जमीन          मध्यम जमीन      भारी जमीन
जमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन) जमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन) जमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन) जमिनीवरील ठिबक सिंचन प्रणाली (सरफेस ठिबक सिंचन)
जमिनीची खोली [फूट]       १ ते १.५    १.५ ते ३       ३ पेक्षा जास्त 
दोन सरीतील अंतर[फूट]       ४      ५      ६
दोन ड्रीपरमधील अंतर [सेंमी]       ३०          ४०   ५० 
 ड्रीपर डिस्चार्ज [लिटर प्रतितास]       २.०-२.४       २.४-४.०      ४ 
भूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक) भूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक) भूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक) भूपृष्ठाअंतर्गत ठिबक सिंचन (सब-सरफेस ठिबक)
जमिनीची खोली[फूट ] १ ते १.५       १.५ ते ३     ३ पेक्षा जास्त
दोन लॅटरलमधील अंतर [फूट]   ६     ७      ८
 दोन जोडओळीतील अंतर[फूट]     ५     ६     
दोन ड्रीपरमधील अंतर[सेंमी] ३०   ४०    ५०
ड्रीपर डिस्चार्ज, [लिटर/तास ]    २.०-२.४     २.४-४.०     ४ 
  • सध्या आपल्याकडे उपलब्ध असणारा प्रतिदिन विजेचा पुरवठा (६ ते ८ तास), उन्हाळ्यातील पिकाची वाढणारी गरज लक्षात घेता ऊस पिकासाठी ताशी २ लिटरपेक्षा कमी क्षमतेचा ड्रीपर वापरू नये. 
  • एप्रिल-मे महिन्यामध्ये ६ ते ८ महिने वयाच्या उसाची पाण्याची गरज हवामानानुसार ३२ ते ३८ हजार लिटर प्रतिएकर असते. कमी डिस्चार्जचे ड्रीपर वापरल्यास जास्त कालावधीपर्यंत ठिबक सिंचन संच चालवावा लागतो. 
  • पिकातील आंतर शरीरक्रियेसाठी आवश्यक पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक असते. उदा. मुख्य कोंबातील ओलाव्याचे प्रमाण (Sheath moisture) ८० ते ८२ % आवश्यक असते. त्यापेक्षा कमी पाणी मिळाल्यास ऊस पिकाची वाढ खुंटते.  
  • ठिबक सिंचन प्रणालीचा योग्य वापर केल्यास ऊस पिकाची पाण्याची गरज व्यवस्थित भागते. पाणी वाया जात नाही.
  • ठिबक नळीचा प्रकार व वापर : शेताच्या लांबी-रुंदी व उतार यानुसार ठिबक नळ्या (१६ ते २० मि.मि.) यांची कमाल लांबीविषयी माहिती घेऊ. शेताच्या लांबी व उतारानुसार नळ्याचा आकार ठरवावा. बरेच शेतकरी खर्च वाचवण्यासाठी सबमेन (उपनळी) व सेक्शनची संख्या कमी ठेवू पाहतात. अशा वेळी एका मर्यादेपर्यंत १६ एम.एम. ऐवजी २० एम.एम.ची ठिबक नळी वापरावी. पंपापासून मिळणारा डिस्चार्ज यानुसार सेक्शन व वॉल्वची संख्या निश्चित करावी. उन्हाळ्यातील उपलब्ध पाण्याचा विचार करावा. तक्ता : ठिबक नळीचा प्रकार व कार्यक्षमता

    दोन ड्रीपरमधील अंतर (सेंमी)     जमिनीचा उतार (टक्के)     ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये)   ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये)   ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये)   ठिबक नळीची जास्तीत जास्त लांबी (मीटरमध्ये)
      - - १६ एमएम     १६ एमएम    २० एमएम  २० एमएम
       -   -          २.४ लिटर      ४ लिटर           २.४ लिटर      ४ लिटर 
    ३० सें. मी. हलकी जमीन       २    ५२.५      ४०.८      ६७.८       ५४.९
    ३० सें. मी. हलकी जमीन           १      ५९.७     ४४.७      ८३.७       ६३.३
    ३० सें. मी. हलकी जमीन           ००      ६६.९      ४८.३      १००.८      ७२.३
    ३० सें. मी. हलकी जमीन -१       ७४.४         ५२.२      ११७.६      ८१.०
    ३० सें. मी. हलकी जमीन     -२    ८१.३      ५५.८      १३३.५      ८९.४
    ०.४० सें. मी. मध्यम जमीन      २      ६०.०      ४७.६      ७४.८       ६२.०
    ०.४० सें. मी. मध्यम जमीन         १       ७०.०       ५२.८      ९६.४       ७४.० 
    ०.४० सें. मी. मध्यम जमीन         ००       ८०.८      ५८.४      १२१.६       ८७.२
    ०.४० सें. मी. मध्यम जमीन         -१      ९१.२       ६३.६    १४६    ९९.६ 
    ०.४० सें. मी. मध्यम जमीन        -२        १०१.६       ६८.८       १६८      १११.६
    ०.५० सें. मी. भारी जमीन       २      ६५.५      ५३      ७९.५       ६७.५
    ०.५० सें. मी. भारी जमीन         १      ७९     ६०      १०७.५       ८३.५
    ०.५० सें. मी. भारी जमीन         ००        ९३.५       ६७.५      १४०.५       १००.५
    ०.५० सें. मी. भारी जमीन         -१       १०७.५      ७४.५      १७३       ११७.५
    ०.५० सें. मी. भारी जमीन         -२       १२०.५      ८१.५      २०१.५      १३३.५

    * ठिबक सिंचनामध्ये पिकासाठी आवश्यक पाण्याची गरज काढताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात.

  • पीक प्रकार व पिकाचे वय
  • जमिनीची प्रत
  • जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारे बाष्पीभवन
  • पानावाटे होणारे उत्सर्जन
  • पानांचा व मुळांचा विस्तार
  • दोन ओळीतील व दोन रोपांतील अंतर
  • वाऱ्याचा वेग व हवेतील आर्द्रता
  • पिकाच्या वाढीच्या विविध टप्प्यांमध्ये आवश्यक पाण्याची गरज काढता येते. उसामध्ये उगवण, रोपावस्था, फुटवा, उसाची जोमदार वाढ व पक्वावस्था अशा विविध टप्प्यांमध्ये पाण्याची आवश्यकता वेगळी असते. वरील घटकांपैकी काही घटक प्रतिदिन बदलणारे असल्याने पाण्याची गरज वेगवेगळी येते.  
  • १) बाष्पीभवन पात्र : बाष्पीभवन पात्राद्वारे दररोजचा बाष्पीभवनाचा वेग मिळवावा. ते शक्य नसल्यास गावात किमान एक बाष्पीभवन पात्र बसवून त्यावर मोजमाप करावे. हेही शक्य नसल्यास कृषी हवामान विभागातून आपल्या विभागाची २० वर्षांची सरासरी मिळवून त्याचा वापर करावा. २) पीक गुणांक (क्रॉप फॅक्टर किंवा क्रॉप कोईफिशिएण्ट) : निरनिराळ्या पिकांचा गुणांक वाढीच्या विविध टप्प्यांनुसार निराळा असतो. पाणी व्यवस्थापन तंत्रात एफ.ए.ओ. २४ या पुस्तकातून पीकगुणांक घेतले जातात. यात मुख्यत्वेकरून चार अवस्था असून, त्यानुसार सुरवातीला गुणांक कमी (०.३ ते ०.४), पीकवाढीच्या काळात (०.७ ते ०.८), तर पूर्ण वाढ झालेल्या व जास्तीत जास्त पानांचे क्षेत्रफळ असताना १.० ते १.२ पर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर तो कमी होत जातो (०.८ ते ०.९). ३) पिकाच्या वाढीच्या अवस्था दर्शविणारा गुणांक (कॅनॉपी फॅक्टर). ४) पिकाने व्यापलेले क्षेत्रफळ (दोन पिकांतील व ओळीतील अंतर).

    ठिबक सिंचनात प्रतिदिनी पाण्याची गरज काढण्याची पद्धत : अ.  बाष्पीभवन मि.मी. x पात्र गुणांक      यास पिकाची संदर्भ पाण्याची गरज असे म्हणतात. बाष्पीभवन पात्र गुणांक ०.७ इतका धरला जातो.  ब. पीक गुणांक (क्रॅाप फॅक्टर ) क. पीकाच्या वाढीचा/ विस्ताराचा गुणांक (कॅनॅापी फॅक्टर) ड. दोन ओळीतील अंतर (मीटर)

    दररोज पिकाला लागणारे पाणी (लिटर ) = अ  x  ब x क x ड उदा. ऊस पीक, वय ६ महिने, ठिकाण = सोलापूर जिल्हा,    महिना = मार्च  अ. पिकाची संदर्भ पाण्याची गरज = १० मि.मि.,  १२ मि.मि.   ब. पिकाचा गुणांक = ०.७,      क. पूर्ण वाढलेली अवस्था = १.०० ड. दोन ओळीतील अंतर (मीटर) = १.८ मीटर  ऊस पिकास उन्हाळ्यात मार्च महिन्यात दररोज लागणारे पाणी (लिटर) अ= ८, ब = ०.७, क = १.००, ड= १.८ दररोज उसाला लागणारे पाणी (लिटर)= अ x ब x क x ड                     = १० x ०.७ x १.० x १.८                    = १२.६ लिटर / मीटर / दिवस                     = १२.६ x  २२१४                      = २७८९६.४० लिटर/ एकर/ दिवस

    पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी पाण्याची गरज

    महिना      पाण्याची मात्रा लिटर प्रतिमीटर ठिबकची नळी पाण्याची मात्रा लिटर प्रतिमीटर ठिबकची नळी
    - पटटा पद्धती (२.५ x ५ x २.५  फू ट)     एक  ओळ पद्धती  (५ फूट) 
    ऑक्टोबर (लागण)       १.९०     १.२७
    नोव्हेंबर      १.९७      १.३१
    डिसेंबर       २.११       १.४१
    जानेवारी      ३.७०       २.४६
    फेब्रुवारी    ५.९८      ३.९७
    मार्च     ८.७७    ५.८३
    एप्रिल     १३.३३     ८.८६
    मे     १८.२३     १२.११ 
    जून    १३.६७    ९.०९
    जुलै     ७.३२    ४.८६
    ऑगस्ट     ७.२९     ४.८४
    सप्टेंबर    ५.७३  ३.८०

    टिप : वरील तक्ता हा मार्गदर्शनासाठी असून, जमिनीचा प्रकार, हवामान व पिकाची अवस्था यानुसार पाण्याची गरज बदलू शकेल. 

    संपर्क : विजय शं. माळी, ०९४०३७७०६४९ (वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि, जळगाव.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com