Agriculture stories in Marathi, integrated pest management of sugarcane , AGROWON, Maharashtra | Agrowon

ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन
सुरज नलावडे, देवेंद्र इंडी, मंगेश बडगुजर
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

तपशील : पूर्व मशागत    
कीड    : ऊस पोखरणारे किडे, खवले कीड, पिठ्या ढेकूण, हुमणी, वाळवी    
व्यवस्थापनाचे उपाय : शक्यतो हलक्या जमिनीत उसाची लागवड करू नये. हुमणीच्या अळ्या आणि कोष नैसर्गिक शत्रूंना बळी      पडण्यासाठी दोन नांगरटी जास्त कराव्यात. शेणखत अथवा कंपोस्ट खतातून हुमणीच्या अळ्या शेतात जातात. त्यामुळे खताच्या प्रत्येक गाडीत एक किलो कार्बारील भुकटी (१० टक्के) मिसळावी. 
शेतातील, बांधावरील वाळवीची वारुळे खोदून वाळवीच्या राणीसह नष्ट करावीत. 

तपशील : पूर्व मशागत    
कीड    : ऊस पोखरणारे किडे, खवले कीड, पिठ्या ढेकूण, हुमणी, वाळवी    
व्यवस्थापनाचे उपाय : शक्यतो हलक्या जमिनीत उसाची लागवड करू नये. हुमणीच्या अळ्या आणि कोष नैसर्गिक शत्रूंना बळी      पडण्यासाठी दोन नांगरटी जास्त कराव्यात. शेणखत अथवा कंपोस्ट खतातून हुमणीच्या अळ्या शेतात जातात. त्यामुळे खताच्या प्रत्येक गाडीत एक किलो कार्बारील भुकटी (१० टक्के) मिसळावी. 
शेतातील, बांधावरील वाळवीची वारुळे खोदून वाळवीच्या राणीसह नष्ट करावीत. 

 
तपशील : बेणे निवड    
कीड    : ऊस पोखरणारे किडे, खवले कीड, पिठ्या ढेकूण
व्यवस्थापनाचे उपाय : बेणे मळ्यातील निरोगी आणि कीड विरहित बेण्याची निवड करावी. 
किडलेल्या बेण्याचा लागवडीसाठी उपयोग करू नये. 

तपशील : बेणे प्रक्रिया
कीड    : खवले कीड, पिठ्या ढेकूण    
व्यवस्थापनाचे उपाय : ३०० मि.ली. मॅलॅथिऑन (५० टक्के प्रवाही) किंवा २६५ मि.ली. डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवावे व नंतर लागवड करावी.

तपशील : लागवडीची वेळ    
कीड    :  सर्व किडी    
व्यवस्थापनाचे उपाय : उसाची लागवड पट्टा पद्धतीने शिफारस केलेल्या हंगामाप्रमाणेच करावी. 
शिफारशीत कीड प्रतिकारक जातींची लागवड करावी (फुले ०२६५). 
पाण्याचा चांगला निचरा असणाऱ्या जमिनीत उसाची लागवड करावी. 

तपशील : लागवडीची वेळ    
कीड   :  पांढरी माशी, वाळवी, खोड कीड व मूळ पोखरणारी अळी
व्यवस्थापनाचे उपाय : उसाचा भोवती एक ओळ तुरीची टोकावी. त्यामुळे किडीचा पतंग उसावर अंडी घालण्यास येत नाही. 
क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ लिटर प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर वाफश्‍यावर सरीतून प्रति हेक्टर ओतावे. 

तपशील : लागवडीनंतर ३० दिवसांनी    
कीड   : खोड कीड
व्यवस्थापनाचे उपाय : हेक्टरी ५ कामगंध सापळे (ई.एस.बी. ल्युर) शेतात लावावेत. क्लोरपायरीफॉस २.५ लिटर प्रति हेक्टरी जमिनीतून सरीतून द्यावे, त्यानंतर हलकेसे पाणी द्यावे. 

तपशील : लागवडीनंतर ४५ दिवसांनी
कीड    :  खोड कीड    
व्यवस्थापनाचे उपाय : उसास बाळबांधणी करावी. उसात मका, ज्वारी व गहू ही आंतरपिके न घेता कांदा, लसूण, कोथिंबीर, पालक ही आंतरपिके घ्यावीत. हेक्टरी ४ फुले ट्रायकोकार्ड १० दिवसांच्या अंतराने ५ वेळा लावावीत. 

तपशील : लागवडीनंतर ४५ दिवसांनी
कीड    : हुमणी     
व्यवस्थापनाचे उपाय : आंतरमशागत करताना हुमणीच्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. 

तपशील : लागवडीनंतर ४५ दिवसांनी
कीड    :  मूळ पोखरणारी अळी    
व्यवस्थापनाचे उपाय : जमिनीतून क्लोरपायरीफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ लिटर प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून द्यावे अथवा (५ टक्के) दाणेदार क्विनॉलफॉस ३० किलो चळीतून द्यावे व हलकेसे पाणी द्यावे. 

तपशील : लागवडीनंतर ६० दिवसांनी
कीड    : पांढरी माशी, पायरीला     
व्यवस्थापनाचे उपाय : किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच १०५० मि.ली. डायक्लोरव्हॉस प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. 

तपशील : लागवडीनंतर ६० दिवसांनी
कीड    : उंदीर     
व्यवस्थापनाचे उपाय : शेतातील सर्व बिळे ओल्या मातीने बंद करावीत. दुसऱ्या दिवशी जी बिळे उघडी दिसतील त्यात सलग ३ दिवस गोडेतेल लावलेला धान्याचा भरडा गव्हाच्या कणकीच्या गोळ्या ठेवाव्यात. चौथ्या दिवशी गोडेतेल लावलेला ५० भाग धान्याचा भरडा व एक भाग झिंक फॉस्फाईड घातलेले मिश्रणाचे आमिष २० ग्रॅम कागदाच्या पुडीतून प्रत्येक बिळात ठेवावे. 

तपशील : लागवडीनंतर ९० दिवसांनी
कीड    : कांडी कीड, शेंडे कीड व पायरीला    
व्यवस्थापनाचे उपाय : ८ ते १० दिवसांच्या अंतराने उसास पाणी द्यावे. 
जमिनीलगत खालची २-३ पाने काढून अंड्यासह नष्ट करावीत. 

तपशील : लागवडीनंतर ९० दिवसांनी
कीड : हुमणी
व्यवस्थापनाचे उपाय : उन्हाळ्यात प्रथम भरपूर पाऊस पडल्यानंतर रात्रीच्या वेळी कडुलिंब, बोर, बाभूळ या झाडांवर जमा होणारे हुमणीचे भुंगेरे गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून त्यांचा नाश करावा. हा उपक्रम सामुदायिकरीत्या २-३ वेळा करावा. लिंब, बोर, बाभूळ यासारखी झाडे कार्बारील (५० टक्के) पावडर १ किलो प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावीत. 

तपशील : लागवडीनंतर १२० दिवसांनी
कीड : पायरीला, शेंडे कीड, पांढरी माशी, हुमणी
व्यवस्थापनाचे उपाय : किडीची अंडी अथवा इतर अवस्था असलेली पाने काढून त्यावरील किडींचा नाश करावा. रात्रीच्या वेळी पर्यायी झाडावरील भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. 

तपशील : लागवडीनंतर १२० दिवसांनी
कीड :  शेंडे कीड, कांडी कीड.    
व्यवस्थापनाचे उपाय : प्रादुर्भावित उसाचे शेंडे काढून अळीसह नष्ट करावेत. हेक्टरी ४ फुले ट्रायकोकार्ड प्रत्येक १५ दिवसाला उसात लावावीत. ही प्रसारणे तोडणीपूर्वी १२ महिन्यापर्यंत चालू ठेवावीत. 

तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड : हुमणी
व्यवस्थापनाचे उपाय : रात्रीच्या वेळी पर्यायी झाडावरील भुंगेरे गोळा करून नष्ट करावेत. शिफारसीत रासायनिक उपायांचा अवलंब करावा. उसास पाण्याचा ताण पडू देऊ नये. 
    
तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड : कांडी कीड, खवले कीड, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, पायरीला
व्यवस्थापनाचे उपाय : कीडग्रस्त पाने अथवा ऊस काढून नष्ट करावेत. शक्य असल्यास उसावर एक लिटर मॅलॅथिऑन प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. उसाची उंची वाढल्यामुळे फवारणी करणे शक्य नसल्यास जैविक घटकांचा वापर करावा.
 
तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड :  कांडी कीड    
व्यवस्थापनाचे उपाय : ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी मित्रकिटकाचे प्रौढ ३ लाख प्रति हेक्टरी सोडावेत. 

तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड :  खवले कीड
व्यवस्थापनाचे उपाय : कायलोकोरस निग्रिटस या भक्षक कीटकांचे १५०० प्रौढ प्रति हेक्टरी सोडावेत. 

तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड :  पिठ्या ढेकूण    
व्यवस्थापनाचे उपाय : क्रिप्टोलिमस मॉन्ट्रोझायरी या भक्षक कीटकांचे १५०० प्रौढ प्रति हेक्टरी सोडावेत. 

तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड : पांढरी माशी
व्यवस्थापनाचे उपाय : क्रायसोपर्ला कार्निया या भक्षक कीटकांचे १००० प्रौढ प्रति हेक्टरी सोडावेत. 

तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड : पायरीला
व्यवस्थापनाचे उपाय : इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्र कीटकांचे १ हजार जिवंत कोष अथवा १ लाख अंडी प्रति हेक्टरी लावावेत. 

तपशील : लागवडीनंतर १५० दिवसांनी
कीड : वाळवी
व्यवस्थापनाचे उपाय : ७ - १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. 

तपशील : लागवडीनंतर १८० दिवसांनी    
कीड : पायरीला, खवले कीड, पांढरी माशी आणि कांडी कीड    
व्यवस्थापनाचे उपाय : वरीलप्रमाणे जैविक कीड नियंत्रण करावे. 

तपशील : लागवडीनंतर २१० दिवसांनी
कीड : हुमणी     
व्यवस्थापनाचे उपाय : बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी चांगल्या कुजलेल्या शेणखतात अथवा मळीत मिसळून जमिनीतून द्यावे व त्यानंतर हलके पाणी द्यावे. 

तपशील : लागवडीनंतर २१० दिवसांनी
कीड : पायरीला, कांडी कीड, पांढरी माशी, खवले कीड, पिठ्या ढेकूण
व्यवस्थापनाचे उपाय : लागवडीनंतर १५० दिवसांप्रमाणे उपाययोजना करावी. 

तपशील : लागवडीनंतर २४० दिवसांनी
कीड : पायरीला व शेंडे कीड     
व्यवस्थापनाचे उपाय : अंडी गोळा करून त्यांचा नाश करावा. इपिरिकॅनिया मेलॅनोल्युका शेतात सोडावीत. या काळात उसास जादा पाणी देऊ नये व शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. प्रादुर्भावीत उसाचे शेंडे काढून अळीसह नष्ट करावेत. आयसोटीमा जावेन्सीस या परोपजीवी कीटकाच्या १२५ माद्या प्रति हेक्टरी टप्याटप्याने सोडाव्यात. शिफारसीप्रमाणे रासायनिक उपाय करावेत. 

तपशील : लागवडीनंतर २७० दिवस ते तोडणीपर्यंत    
कीड : कांडी कीड, खवले कीड, पिठ्या ढेकूण, पांढरी माशी, पायरीला, उंदीर    
व्यवस्थापनाचे उपाय : किडींचा खूप प्रादुर्भाव असेल व पांगश्‍या न फुटणाऱ्या भागात उसाचे पाचट काढावे आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय योजावेत.
 
तपशील : तोडणीच्या वेळी    
कीड :  मूळ कुरतडणारी अळी
व्यवस्थापनाचे उपाय : किडींच्या अवस्था नष्ट करण्याकरिता उसाची तोडणी जमिनीलगत करावी. 

तपशील : तोडणीनंतर
कीड : पायरीला    
व्यवस्थापनाचे उपाय : उसाचे पाचट जाळण्याऐवजी गोळा करून इपिरिकॅरिया मेलॅनोल्युका या परोपजीवी मित्रकिटकाचे संरक्षण करावे. 

तपशील : तोडणीनंतर
कीड : पांढरी माशी
व्यवस्थापनाचे उपाय : प्रादुर्भाव क्षेत्रातील पाचट जाळून टाकावे. 

तपशील : तोडणीनंतर
कीड : खवले कीड
व्यवस्थापनाचे उपाय : ज्या उसाचा खोडवा घ्यावयाचा आहे त्या उसाचे बुडखे जमिनीलगत अथवा जमिनीखाली छाटावेत. प्रादुर्भावग्रस्त उसाचा खोडवा घेऊ नये. 

तपशील : तोडणीनंतर
कीड : मूळ पोखरणारी कीड, हुमणी
व्यवस्थापनाचे उपाय : उसाच्या खोडक्या गोळा तरून नष्ट कराव्यात. किडींच्या अथवा नष्ट करण्यासाठी रोटाव्हेटर व सबसॉईलरचा वापर करावा. 

तपशील : खोडवा
कीड : जमिनीतील किडी
व्यवस्थापनाचे उपाय : किडींचा जीवनक्रम संपविण्यासाठी व प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकापेक्षा जास्त खोडवे घेऊ नयेत. 

तपशील : खोडवा 
कीड : पांढरी माशी     
व्यवस्थापनाचे उपाय : सखल भागात खोडवा घेऊ नये. 

तपशील : खोडवा 
कीड : सर्व किडी
व्यवस्थापनाचे उपाय : उशिरा तुटलेल्या उसाचा खोडवा घेऊ नये. योग्य पिकांची फेरपालट करावी. हिरवळीच्या खतांची पिके घ्यावीत. 

तपशील : खोडवा 
कीड : लष्करी अळी     
व्यवस्थापनाचे उपाय : पाचटाचे अाच्छादन असलेल्या उसास ढगाळ वातावरणात जास्त पाणी देऊ नये. शिफारसीप्रमाणे रासायनिक उपाय करावेत.

संपर्क : ०२१६९- २६५२३३
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
राज्यात नीचांकी हरभरा खरेदीमुंबई : राज्यातील हरभरा उत्पादक...
सीमेवरील तणावाचा केळी निर्यातीला फटकारावेर, जि. जळगाव : जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळ...
ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल :...जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून...