रब्बी हंगामात कोणत्या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा?
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

 

अत्यल्प पावसावर येणारी रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती 
    रब्बी ज्वारी+ करडई ः ज्या क्षेत्रावर रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते त्याठिकाणी ६ः३ या ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धतीने लागवड करावी. 

 करडई+ हरभरा ः मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.  ६ः३, ३ः३ किंवा २ः४ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास जास्त फायदा होतो.

 जवस+ हरभरा ः मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस. ६ः३ किंवा ३ः३ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा होतो.

 

अत्यल्प पावसावर येणारी रब्बी हंगामातील आंतरपीक पद्धती 
    रब्बी ज्वारी+ करडई ः ज्या क्षेत्रावर रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेतली जाते त्याठिकाणी ६ः३ या ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धतीने लागवड करावी. 

 करडई+ हरभरा ः मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस.  ६ः३, ३ः३ किंवा २ः४ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास जास्त फायदा होतो.

 जवस+ हरभरा ः मध्यम ते भारी जमिनीसाठी शिफारस. ६ः३ किंवा ३ः३ ओळींच्या प्रमाणात घेतल्यास अधिक फायदा होतो.

बागायती आंतरपीक पद्धती 
 गहू+ हरभरा : मध्यम ते भारी जमिनीमध्ये ६ः३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास फायदा होतो.

 गहू+ मोहरी ः मध्यम ते भारी जमिनीमध्ये ६ ओळी गहू व ३ ओळी मोहरीची लागवड करावी.

पूर्वहंगामी उसात घ्यावयाची आंतरपिके 
   पूर्व हंगामी उसाची लागवड ऑक्‍टोबर - नोव्हेंबर या दरम्यान करतात. या उसामध्ये मुख्यत्वेकरून रब्बी हंगामात घेतली जाणारी पिके उदा. बटाटा, कांदा, लसूण, कोबी, फ्लॉवर इ. आंतरपीक घेतात. पट्टा अथवा जोड पद्धतीत (७५-१५० सेंमी) आंतरपिकाच्या २ ओळी घ्याव्यात.
 
 पूर्व हंगामी+ कांदा : उसामध्ये कांद्याच्या रोपाची लागण सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सेंमी अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी.  

पूर्वहंगामी ऊस+ बटाटा 
सलग लागवड पद्धत ः जमिनीच्या प्रकारानुसार उसाची लागवड ८० सेंमी १०० सेंमी व १२० सेंमी केली जाते. उसाची व बटाट्याची एका वेळी लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीवर प्रथम बटाटे १०० सेंमी अंतरावर सरळ रेषेमध्ये १५ ते २० सेंमी अंतरावर ठेवावे व त्यानंतर दोन बटाट्याच्या ओळीमधून रिजर चालवावा. जेणेकरून अंथरलेले बटाटे हे वरंब्याखाली आपोआप झाकले जातात. तसेच रिजरमुळे ऊस लागवडीसाठी सऱ्या तयार होतात आणि या सऱ्यामध्ये ऊस लागवड करता येते. उसात बटाटे आंतरपीक पद्धतीत सर्वसाधारणपणे बटाटा पिकांचे १५० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.

 जोड ओळ पट्टा पद्धत ः २.५ फुटावर सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यात उसाची लागण करून तिसरी सरी मोकळी सोडल्यास दोन जोड ओळीत ५ फुटांचा पट्टा तयार होतो. अशा पट्ट्यातच बटाटा, हरभरा किंवा कांदा यांची लागवड करावी.

संपर्क ः डॉ. वासुदेव नारखेडे, ९८२२९९२८६४
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

इतर अॅग्रोगाईड
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
मधमाश्यांच्या प्रकारानुसार असते...मधमाश्यांच्या कुटुंबाचे विभाजन झाले, की त्यांची...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
शेळी, मेंढीची कोणती जात निवडावी?राज्यातील शेळ्या व मेंढ्यांच्या जातींचा विचार...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
औषधी, चवदार कार्बी अँगलोंग आले जगामध्ये भारत आल्याच्या उत्पादनात अग्रेसर आहे....
तंत्र कांदा साठवणुकीचे...जून ते ऑक्‍टोबर या काळात कांद्याची काढणी होत नसते...
कोकम झाडाचे व्यवस्थापन कसे करावेकोकमच्या झाडाला जुन्या झालेल्या फांदीला फुले...
सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट गांडूळ खत...बनचिंचोली (जि. नांदेड) येथील बळवंतराव देवराव पऊळ...
बांबू लागवडबांबू लागवड करायच्या ठिकाणी उन्हाळ्यात ३ x३ मीटर...
वांगी लागवड तंत्रज्ञान वांगी पिकाबाबत महत्त्वाचे : ...
मिरची लागवड तंत्रज्ञान मिरचीचे महत्त्व  नवनवीन सुधारित वाण आणि...
कांदा पीक संरक्षण रोग नियंत्रण :  तपकिरी करपा :...