Agriculture stories in Marathi, Inter cropping systems in Rabbi season , AGROWON, Maharashtra | Agrowon

आंतरपीक पद्धतीतून वाढवा उत्पन्न
डॉ. आनंद गोरे, डॉ. गणेश गायकवाड
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

आंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते. मशागतीचा खर्च कमी होतो. जमिनीची धूप कमी होते. जिरायती लागवड क्षेत्रात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून प्रतिएकरी अधिक उत्पादन, आणि आर्थिक फायदा मिळविणे शक्‍य आहे.

जिरायती शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनविण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. रब्बी हंगामासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जमीन व पावसाचे प्रमाण यानुसार विविध आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे. 

आंतरपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते. मशागतीचा खर्च कमी होतो. जमिनीची धूप कमी होते. जिरायती लागवड क्षेत्रात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून प्रतिएकरी अधिक उत्पादन, आणि आर्थिक फायदा मिळविणे शक्‍य आहे.

जिरायती शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर बनविण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. रब्बी हंगामासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जमीन व पावसाचे प्रमाण यानुसार विविध आंतरपीक पद्धतीची शिफारस केली आहे. 

 • आंतरपीक पद्धतीत कडधान्य पिके निवडावीत. उदा. हरभरा हे आंतरपीक म्हणून निवडल्यास या पिकांच्या मुळावरील गाठीमध्ये असणारे जीवाणू वातावरणातील नत्र जमिनीतून पिकांसाठी उपलब्ध करुन देतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. 
 • कडधान्य वर्गातील पिकांमुळे जमिनीची जैविक, भौतिक व रासायनिक सुपिकता टिकवून ठेवण्यास मदत होते. 
 • आंतरपीक पद्धतीमुळे बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या विपरीत परिणामांची तीव्रता कमी करून विविध नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर करून उत्पादनात स्थिरता मिळते. तसेच लागवड केलेल्या पिकांपैकी एका तरी पिकास चांगला दर मिळून आर्थिक फायदा होतो. 
 • जमिनीचा प्रकार आणि वार्षिक पाऊसमान लक्षात घेऊन आंतरपीक पद्धतीची निवड करावी. 
 • मध्यम व खात्रीच्या पावसाच्या भागात व भारी जमीनीत व जेथे जलधारणा शक्ती आहे अशा ठिकाणी रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही पिके घ्यावीत. 
 • मध्यम जमिनीत सूर्यफूल, करडई या पिकांची लागवड करावी. 
 • मध्यम खोल व ओलावा टिकवून ठेवणाऱ्या जमिनीत रब्बी ज्वारी, करडई, हरभरा तसेच रब्बी ज्वारी+करडई (६ः३), करडई+हरभरा (६ः३) या आंतरपीक पद्धतीने लागवड करावी. 
 • लागवडीसाठी शिफारस केलेल्या जातींची निवड करावी. प्रतिहेक्‍टरी बियाणांचे योग्य प्रमाण ठेवावे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
 • दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून हेक्‍टरी रोपांची योग्य संख्या ठेवावी. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. वेळेवर आंतरमशागत करावी. हलकी कोळपणी करुन भेगा बुजवाव्यात. जेणे करून ओलावा टिकवून ठेवता येईल.

हरभरा+करडई आंतरपीक पद्धती :
( ६ः३,४ः२,३ः१,२ः१)

 • हरभरा+करडई पीक निव्वळ किंवा आंतरपीक पद्धतीत घेता येते. पावसावर अवलंबून असणाऱ्या भागात हरभरा+करडई (४ः२, ३ः१ किंवा २ः१) या प्रमाणात आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा. 
 • हरभरा+करडई ही एक चांगली आंतरपीक पद्धती आहे. एक तेलबिया पीक व एक कडधान्य वर्गातील पीक यात समाविष्ट आहे.
 • यामध्ये हरभरा+करडई ६ः३ याप्रमाणेही लागवड करता येते. यामध्ये हरभरा पिकाची उत्पादन क्षमता तसेच चांगला दर यामुळे शाश्‍वत उत्पादन आणि चांगला आर्थिक फायदा होतो.

करडई+हरभरा : (६ः३, ३ः३, २ः४)
करडईचे क्षेत्र अधिक असलेल्या ठिकाणी करडई+हरभरा ही आंतरपीक पद्धती ६ः३ किंवा ३ः३ किंवा २ः४ ओळींच्या प्रमाणात घेता येते. ही पद्धत मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य आहे.

जवस आणि हरभरा किंवा 
करडई आंतरपीक पद्धती :

यामध्ये जवस+हरभरा (४ः२), जवस+करडई (४ः२) किंवा (३ः१), जवस+मोहरी (५ः१) या प्रमाणात घेता येते. यामध्ये मध्यम किंवा मध्यम ते भारी या आंतरपीक पद्धतीची निवड करावी.

रब्बी ज्वारी+करडई : (६ः३)

 • या आंतरपीक पद्धतीमध्ये रब्बी ज्वारी+करडई (६ः३) या प्रमाणे आंतरपिकांची पेरणी करावी. रब्बी ज्वारीचे मुख्य उत्पादन (धान्य) व कडबा उत्पादन यामुळे तसेच याची उत्पादनक्षमता, गरज व दरामुळे ओळींची संख्या अधिक आहे. 
 • यामध्ये करडई पिकाचा फायदा असा होतो की, थंडी जास्त पडल्यास ज्वारीचे उत्पादन कमी झाल्यास थंडीमध्ये करडईची वाढ चांगली होऊन चांगले उत्पादन मिळते. ज्वारीच्या कमी उत्पादनामुळे होणारे नुकसान भरून निघते.

रब्बी ज्वारी+हरभरा :
(६ः३) किंवा (३ः६), (२ः४)

 • यामध्ये रब्बी ज्वारीची उत्पादनक्षमता व जेथे जनावरे आहेत तेथे कडब्याची गरज म्हणून रब्बी ज्वारीच्या ओळी जास्त ठेवल्या आहेत. परंतु, जेथे कडब्याची गरज नाही आणि हरभऱ्यास चांगला बाजारभाव आणि चांगले उत्पादन देणाऱ्या जाती असल्यामुळे हरभरा+रब्बी ज्वारी ६ः३ किंवा ४ः२ याप्रमाणे लागवड करता येऊ शकते. 
 • हरभरा पीक थंडीमध्ये चांगले उत्पादन देते. अशा वेळी थंडीमध्ये ज्वारीवर विपरीत परिणाम झाला तर हरभरा पिकाच्या उत्पादनातून ते नुकसान भरून निघू शकते.

बागायती आंतरपीक पद्धती :
१) गहू+हरभरा (६ः३)

मध्यम ते भारी जमिनीमध्ये गहू+हरभरा ६ः३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतली जाते. 

२) गहू+मोहरी  (६ः३) :
मध्यम ते भारी जमिनीमध्ये गहू+मोहरी आंतरपीक पद्धतीमध्ये ६ः३ याप्रमाणे लागवड करावी.

आंतरपीक पद्धतीमध्ये हेक्‍टरी बियाणे प्रमाण
पीक पद्धती पिके व पेरणीसाठी लागणारे बियाणे (किलो/हेक्टरी) पिके व पेरणीसाठी लागणारे बियाणे (किलो/हेक्टरी)
रब्बी ज्वारी+हरभरा आंतरपीक रब्बी ज्वारी हरभरा
६ः३ प्रमाणे     ६.७ ते ७  किलो         १० किलो
४ः२ प्रमाणे ६.७ ते ७  किलो         १० किलो
२ः१ प्रमाणे ६.७ ते ७  किलो         १० किलो
हरभरा+रब्बी ज्वारी आंतरपीक      हरभरा रब्बी ज्वारी
६ः३ प्रमाणे     २० ते २१ किलो ३.३ ते ३.५ किलो
४ः२ प्रमाणे     २० ते २१ किलो ३.३ ते ३.५ किलो
२ः१ प्रमाणे २० ते २१ किलो ३.३ ते ३.५ किलो
करडई+हरभरा आंतरपीक   करडई     हरभरा
६ः३ प्रमाणे     १० किलो     १० किलो    
३ः३ प्रमाणे     ७.५ किलो     १५ किलो
हरभरा+करडई आंतरपीक  हरभरा     करडई
६ः३ प्रमाणे     २० ते २१ किलो     ५ किलो
४ः२ प्रमाणे     २० ते २१ किलो     ५ किलो
३ः१ प्रमाणे २३ किलो     ४ किलो
२ः१ प्रमाणे     २० ते २१ किलो     ५ किलो
जवस+करडई ४ः२ आंतरपीक     जवस २० किलो करडई ५ किलो
जवस+करडई ३ः१ आंतरपीक     जवस २२.५ ते २३ किलो करडई ३.७५ ते 
४ किलो

संपर्क : डॉ. आनंद गोरे, - ७५८८०८२८७४
(अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...