Agriculture stories in Marathi, mango crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

आंबा पीक सल्ला
डॉ. भरत साळवी, महेश कुलकर्णी
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

आंबा पिकाचे वार्षिक चक्र काढणीनंतर म्हणजे जून महिन्यात 
सुरू होते. यावेळी झाडाला सेंद्रिय तसेच रासायनिक खताच्या संतुलित मात्रा द्याव्यात. पावसाचे पाणी झाडाला मिळाले की पालवी येते. ही पालवी पावसातील उपलब्ध सूर्यप्रकाशात हळूहळू प्रकाशसंश्‍लेषण क्रिया करून पुढील हंगामासाठी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये मोहर येण्यास तयार झालेली आढळते. त्यामुळे या हंगामात खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

आंबा पिकाचे वार्षिक चक्र काढणीनंतर म्हणजे जून महिन्यात 
सुरू होते. यावेळी झाडाला सेंद्रिय तसेच रासायनिक खताच्या संतुलित मात्रा द्याव्यात. पावसाचे पाणी झाडाला मिळाले की पालवी येते. ही पालवी पावसातील उपलब्ध सूर्यप्रकाशात हळूहळू प्रकाशसंश्‍लेषण क्रिया करून पुढील हंगामासाठी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये मोहर येण्यास तयार झालेली आढळते. त्यामुळे या हंगामात खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

  • प्रकाश संश्‍लेषण क्रिया गतिमान होण्यासाठी फांद्यांची विरळणी करावी, सुकलेल्या तसेच रोगट फांद्या काढून टाकाव्यात. फांदीवर बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून १ टक्के बोर्डोमिश्रण किंवा कॉपर अाॅक्सी क्लोराईड २.५ ग्रॅम प्रती लिटर याप्रमाणे फवारणी पूर्ण झाडावर करावी.
  • बांडगुळे झाडावर दिसताच ती पूर्णपणे काढावीत. बांडगुळे मोठी असल्यास ती फांदीसकट कापून टाकावीत व कापलेल्या भागांवर बोर्डोपेस्ट (१० टक्के - १० किलो चुना अधिक १० किलो मोरचूद प्रति १०० लिटर) पाणी लावावी.
  • पावसाळा संपलेला असल्याने बागेची सफाई करणे आवश्‍यक आहे. झाडाच्या बुंध्यातील तण काढून टाकावे. खत दिलेल्या भागापासून ते खोडापर्यंतचा पट्टा तणमुक्त करावा. बागेत वाढलेले इतर तण मजुरांच्या उपलब्धतेनुसार ग्रासकटरच्या साहाय्याने काढून घ्यावे.
  • नवीन पालवी आली असल्यास तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे पालवी कमकुवत होते परिणामी मोहर लांबू शकतो. प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) (९ मिलि प्रती १० लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.
  • समुद्रालगतच्या काही भागांमध्ये मोहर आलेला आढळतो पूर्ण मोहरलेल्या झाडावर ५० पीपीएम (५० मिलीग्रॅम प्रती लिटर) जीब्रेलीक ॲसीडची फवारणी करावी, त्यामुळे पुनमोहराची प्रक्रिया थांबते तसेच जिब्रेलिक ॲसिडची (५० पीपीएम) दुसरी फवारणी मोहरीच्या आकाराची फळे दिसू लागल्यावर करावी.

संपर्क : डॉ. भरत साळवी, ९४२३२९६०००
(कृषी महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
पैशाकडेच जातोय पैसाभारतातील काही उद्योगपतींची संपत्ती एका वर्षात...
वाढवूया मातीचा कससंयुक्त राष्ट्रसंघाच्या २०११ च्या अन्न व कृषी...
जमीन आरोग्यपत्रिकेच्या गुणात्मक कामाकडे...पुणे  : राज्यात शेतकऱ्यांना जमीन...
'शुगरकेन हार्वेस्टर'ला अनुदान देण्यास...पुणे  : राज्यात ऊसतोडणीसाठी वापरल्या...
भरपाईबाबत समित्यांचे निष्कर्ष बियाणे...पुणे : राज्यात गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान...
कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाहीनागपूर : यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी...
साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात...मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर...
उस्मानाबाद ९.४ अंशांवरपुणे ः उत्तरेकडून थंड वारे कमी-अधिक प्रमाणात वाहत...
कृषीचा पतपुरवठा यंदा वाढण्याचे संकेतनवी दिल्ली ः देशातील शेतीसमोरील प्रश्न दिवसेंदिवस...
सीआयबीआरसी, कृषी, आरोग्य विभागावर...अमरावती ः विषबाधाप्रकरणी राज्य सरकारने नेमलेल्या...
खारपाणपट्ट्यात पेरू, लिलीसह बहुपीक शेतीखारपाणपट्ट्यात प्रयोगशील शेती करणे जिकिरीचे,...
वाया जाणारा भाजीपाला, शेणापासून...भाजीपाला व जनावरे बाजार यांच्यासाठी सातारा...
कोरडवाहू शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची...सोलापूर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत...
बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात...
आव्हान पाणी मुरविण्याचेठिबक सिंचन अनुदानासाठी यावर्षी विक्रमी निधी...
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...