agriculture stories in marathi, Modern dairy farm, | Agrowon

दुग्धव्यवसायाला दिशा देणारे मॉडर्न डेअरी फार्म
मनोज कापडे
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कोट

संगमनेर भागातील तरुण शेतकरी एमडीएफ तंत्राचा वापर करून दुग्ध हा मुख्य व्यवसाय म्हणून पाहू लागले आहेत. या व्यवसायात तरुणांचा सहभाग वाढविण्याचा 'राजहंस'चा प्रयत्न आहे

रणजितसिंह देशमुख

आदर्श व्यवस्थापन (उदा. मुक्त गोठ), आधुनिक तंत्रज्ञान, कमी उत्पादन खर्च, संकरित गाईंची जोपासना या चतुःसूत्रीतून नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अर्थात ‘राजहंस’ आपल्या सभासद शेतकऱ्यांसाठी ‘माॅडर्न डेअरी फार्म’ची संकल्पना राबवत आहे. सुमारे शंभर गोठे या पद्धतीने तालुक्यात उभे राहिले आहेत. त्याद्वारे शुद्ध, दर्जेदार दुधाची निर्मिती होऊन शेतकऱ्यांचे अर्थकारण मजबूत होण्यास मदत झाली आहे.
.
खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश, निरोगी जनावरे, दूध उत्पादनात वाढ, संगीतमय वातावरण, फॉर्गर्स, दुधाची वेळ होताच रांगेत आपोआप पुढे येणाऱ्या गाई, सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी दोन तास काम. या किंवा यातील बहुतांश बाबींची व्यवस्था नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादकांडे पाहण्यास मिळते. त्यांच्या गोठ्यात राबवली जातेय मॉडर्न डेअरी फार्म (एमडीएफ) ही संकल्पना. संगमनेर तालुका दूध उत्पादक व प्रक्रिया संघ अर्थात ‘राजहंस’चे विद्यमान चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत दूरदृष्टीने ‘एमडीएफ’ ही पद्धत तालुक्यात रुजविली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा वापर करावा यासाठी त्यांनी या तंत्राचा अभ्यास केला. स्वतःच्या शेतातही ‘एमडीएफ’ पद्धतीनेच गोठा व्यवस्थापन सुरू केले. त्यानंतर शेतकऱ्यांत या तंत्राचा प्रसार करण्यास सुरवात केली.

काय आहे एमडीएफची चतुःसूत्री

 • 'आदर्श व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान, कमी उत्पादन खर्च, संकरित गाईंची निवड व जोपासना ही एमडीएफची चतुःसूत्री. मुक्त गोठा पद्धतीवर विशेष भर
 • त्याद्वारे दूध उत्पादनात दहा टक्क्यांपर्यंत वाढ

युवा शेतकऱ्याचा अनुभव
सुनील भाऊसाहेब राऊत हा ३२ वर्षांचा तरुण म्हणतो, की वर्षानुवर्षे छोटा गोठा चालविला. आता ‘एमडीएफ’ तंत्राचा वापर करतो. दहा लाख रुपये कर्ज काढून साडेतीन लाख रुपयांचा गोठा बांधला. सोळा गाईंचे संगोपन करून महिन्याला एक ते सव्वा लाख रुपयांची उलाढाल करतो. या तंत्रात मनुष्यबळ कमी लागते. भरपूर दूध, उत्कृष्ट शेणखत आणि निरोगी कालवडी असा फायदा मिळतो.

कर्जासाठी पुढाकार
खरं तर शेतकऱ्यांला बॅंका आपल्या दारात सहजासहजी उभ्या करीत नाहीत. पण ‘राजहंस’ने आपल्या सभासदांचा प्रश्न चुटकीसारखा सोडवला आहे. तो असा.

 • कॅनरा, इंडियन ओव्हरसिज, युनियन बॅंक आदींसोबत करार
 • एमडीएफ’साठी कर्ज हवे असल्यास संबंधित शेतकरी प्रस्ताव तयार करतो. त्याला कर्ज देण्याची शिफारस सोसायीटीकडून होते.
 • पुढे ‘राजहंस’कडून ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते.
 • असा प्रस्ताव बॅंकेत दाखल होतो. प्रकरण मंजुरीचा पाठपुरावा राजहंसचे कर्मचारी घेतात.
 • एमडीएफ’ तंत्राने गोठा बांधल्यानंतर सोसायटीच्या खात्यातून थेट संघ कर्जवसुली करून बॅंकेला भरणा करतो. यामुळे बॅंकेलाही हमी मिळते. शेतकऱ्याकडून काही कारणास्तव हप्ता थकला तरी कारवाई न करण्याचे पत्र संघाकडून बॅंकेला दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याची ही अडचण दूर होते.

शेतकऱ्यांना दिले ‘व्हिजन’
केवल संकल्पना मांडून संगमनेर तालुका दूध संघ थांबला नाही. याविषयी देशमुख म्हणाले, की सहकारात शेतकऱ्यांना सल्ला देणारे भरपूर असतात. पण आम्ही एमडीएफ संकल्पना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर राबवली. सुमारे दोनशे शेतकऱ्यांना घेऊन एनडीडीबीची सहल घडवली. पंजाब, गुजरात आदी राज्यांतील गोठे दाखवले. गोठ्याची रचना (डिझाइन), बांधणी या बाबींसाठी सहकार्य केले. सवलतीच्या दरात मिल्किंग मिशन, चाफकटर यांचा पुरवठा केला.

महिला शेतकऱ्यांचा विशेष सहभाग
‘राजहंस’ने महिला सक्षमीकरण योजना राबवली. यात महिलांना दुग्ध व्यवसाचे आधुनिक तंत्र समजावून दिले. तालुक्यातील सावरगाव तळ भागात २३ गाईंचा गोठा 'एमडीएफ’ तंत्रानुसार चालविणाऱ्या कांचनताई बाळासाहेब फापाळे अवघ्या दहावी शिकलेल्या असूनही दरमहा हजारो रुपयांची उलाढाल यशस्वी करतात. त्यांच्या गोठयाचे उद्घाटन करण्यासाठी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री शेतावर आले होते. कांचनताई म्हणाल्या, की पारंपरिक गोठ्यातील दहा गाईंची निगा ठेवण्यात पूर्ण दिवस जायचा. उत्पन्नही कमी मिळायचे. आता एमडीएफ व त्यातीव मुक्त गोठ्यामुळे कष्ट कमी झाले. दररोजचे एकूण शंभर लिटर दूध संकलित होते. काही गाई दररोज ३० ते कमाल ३५ लिटर्सपर्यंत दूध देतात. सकाळी व संध्याकाळी दोन तास काम करून उर्वरित वेळ शेत आणि कुटुंबाला देऊ शकते. मुक्त गोठ्यामुळे गाईंचे आजार पळाले. त्या भरपूर पाणी, चारा घेतात. निरोगी राहतात. त्याचा फायदा दूधवाढीत झाला.

महिलांना प्रशिक्षण

 • संघाच्या वार्षिक बैठकांनाही महिलांना बोलाविले जाते.
 • आतापर्यंत २१०० महिलांना प्रशिक्षण
 • त्यांचा एक लाखांपर्यंत अपघात विमा उतरविला.

एमडीएफची वैशिष्ट्ये
एमडीएफची संकल्पना बांधापर्यंत नेण्याचे काम ‘राजहंस’च्या पशुसंवर्धन विभागाकडून सुरू आहे. विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. डी. एकशिंगे म्हणाले, की जनावरांची पैदास, आहार, संगोपन-संवर्धन आणि रोगनिवारण अशा चारही बाबी आम्ही हाताळतो. दूध उत्पादन, आहार आणि प्रसूती या काळातील विविध नोंदी ठेवल्या जातात. जनावरांची निगा राखण्यासाठी एरवी कन्सल्टंट नेमला तर हे काम चार ते पाच हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र संघाने ६० 'स्वयंरोजगार केंद्राधिकारी' नेमले आहेत. साधारण वीस गाईंसाठी प्रति गाय ६५ रुपये या माफक शुल्कात शेतकऱ्यांना त्याद्वारे सल्ला सेवा मिळते. यात कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण अशा विविध कामांचा समावेश असतो. संघाकडे प्रयोगशाळा व दोन पशुवैद्यक आहेत.
-सध्या एमडीएफ तंत्राचे परिसरात शंभरपर्यंत गोठे उभारले आहेत. मुक्त पद्धतीचे सुमारे दोन हजार गोठे संगमनेर भागात उभे राहिले आहेत. हा तालुकाच निर्भेळ दुधाचे आगार झाला आहे.

एमडीएफ तंत्रज्ञान-अर्थकारण दृष्टिक्षेपात
वीस गाईंसाठी अपेक्षित (आकडे रुपयांत)

 • अंदाजे जागा- दोन गुंठे
 • शेड-२७ बाय ५३ फूट : खर्च साडेतीन लाख रु.
 • मिल्किंग मशिन- ६० हजार, चाफ कटर : २५ हजार
 • २० संकरित गाई (प्रतिगाय अंदाजे ६० हजार रुपये) : १२ लाख
 • गोठ्यासाठी प्रति मजूर मासिक : ८ हजार
 • एकूण चारा प्रतिदिन ५०० किलोप्रमाणे : दरमहा ३० हजार
 • वैद्यकीय सेवा-औषधोपचार : दरमहा तीन हजार
 • गोठा देखभाल : दरमहा दोन हजार

उत्पन्नाची बाजू

 • वीसपैकी दहा गाईंचे दूध गृहीत धरल्यास प्रति गाय २० लिटर व २५ रुपये प्रति लिटर दरानुसार दररोजचे २०० लिटर्स दूध संकलित. महिन्याचे अपेक्षित एकूण उत्पन्न दीड लाख रुपये
 • मुक्त गोठ्याद्वारे शेणापासून दरमहा पाच ते दहा हजार रुपयांप्रमाणे उत्पन्न मिळू शकते.
 • वर्षात पाच कालवडी झाल्यास प्रति २० हजार रुपयांप्रमाणे विक्रीतून वार्षिक एक लाख रुपये मिळू शकतात.

संपर्क : पशुसंवर्धन विभाग,
संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघ- ०२४२५- २२५५१०
 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...