Agriculture stories in Marathi, mulberry cultivation | Agrowon

तुती लागवड तंत्र
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

हलकी, मध्यम व भारी अशा कोणत्याही प्रकाराच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते. जमिनीचा सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा. चिबड व पाण्याचा निचरा न होणारी जमीन तुती लागवडीसाठी निवडू नये.जून-जुलै महिन्यांपर्यंत जमीन तयार करून लागवड करावी. चांगले कुजलेले शेणखत पसरून द्यावे. एम-५, एस-३६, एस-१३ आणि एस-५४ या जातींची वाढ चांगली होते.

हलकी, मध्यम व भारी अशा कोणत्याही प्रकाराच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते. जमिनीचा सामू ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा. चिबड व पाण्याचा निचरा न होणारी जमीन तुती लागवडीसाठी निवडू नये.जून-जुलै महिन्यांपर्यंत जमीन तयार करून लागवड करावी. चांगले कुजलेले शेणखत पसरून द्यावे. एम-५, एस-३६, एस-१३ आणि एस-५४ या जातींची वाढ चांगली होते.

 म्हैसूर येथे व्ही-१ ही सुधारित जात विकसित करण्यात आली आहे. खताची वाढीव मात्रा व चांगल्या दर्जाच्या जमिनीमध्ये ही जात लागवडीस अत्यंत फायदेशीर आहे. चॉकी कीटक संगोपनासाठी तुती लागवडीच्या दहा टक्के क्षेत्रामध्ये एस-३० किंवा एस-३६ या तुतीच्या जातीची लागवड करून अत्यंत पोषक पानांचा वापर अळ्यांसाठी करावा.

 साधारण सहा ते आठ महिने जुने व बागेस पाणी दिलेले तुतीचे बेणे म्हणून वापर करावा. या फांद्या रंगाने भुरकट व आकाराने १०-१५ मि.मी. जाडीच्या १८ ते २० सें.मी. लांबीच्या आणि तीन ते चार डोळे असलेल्या असाव्यात. कलमे तीक्ष्ण हत्याराच्या साह्याने, डोळ्यालगत तिरपा काप घेऊन; तर वरच्या भागाचा काप सिकेटरच्या साह्याने डोळ्याच्या वर आडवा घ्यावा. लागवड करताना कलमाचे दोन भाग जमिनीच्या आत; तर एक भाग जमिनीच्या वर राहील व कलम उलटे लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी. 

 पट्टा पद्धतीने ५ x ३ x २ फूट अंतराने लागवड केल्याने भरपूर सूर्यप्रकाश व दोन ओळींतील अंतर जास्त असल्यामुळे पाल्याची प्रत सुधारते. पाल्याच्या उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचन करायचे झाल्यास पट्टा पद्धतीत अधिक सोयीचे होते. माती परीक्षणानुसार पिकाला खतमात्रा द्यावी.

संपर्क  ः ०२४५२- २२९०००
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

 

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...