Agriculture stories in Marathi, news regarding increasing demand of cactus fruit,Agrowon, Maharashtra | Agrowon

निवडुंगाच्या फळांना वाढती मागणी
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

आत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित वनस्पती म्हणून निवडुंगाकडे बघितले जायचे. परंतु निवडुंगाच्या काही जाती मानवी खाद्यासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आल्यामुळे या जातींची लागवड अमेरिकेतील शेतकऱ्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू केली. त्यामुळे आता निवडुंगाची फळे आणि प्युरी अमेरिकेतील बाजारपेठांत दिसू लागली आहे.  

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील शेतकऱ्यांनी अमेरिका आणि कॅनडामधील बाजारपेठांची मागणी लक्षात घेऊन खाण्यासाठी योग्य निवडुंगाची लागवड सुरू केली. त्याची स्वतंत्र बाजारपेठही विकसित झाली आहे. निवडुंगाच्या फळांना खाण्यासाठी शहरी भागात मागणी वाढत आहे.

यंदाच्या वर्षी कॅलिफोर्निया राज्यातील हवामान बदलामुळे निवडुंगाचे उत्पादन थोडे उशिरा सुरू झाले. निवडुंगाचा हंगाम आॅगस्ट ते मार्च या कालावधीत असतो. परंतु यंदा आॅक्टोबरपासून निवडुंगाच्या फळांच्या काढणीस सुरवात झाली. यंदा तापमानात मोठी वाढ झाली. त्यानंतर हवामानात बदल होऊन बेमोसमी पाऊसही झाला. अतिउष्णता आणि त्यानंतर पावसानंतर थंड वातावरणामुळे  निवडुंगाच्या फळांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला, असा येथील निवडुंग उत्पादक शेतकऱ्यांचा अनुभव आहे.यंदाच्या वर्षी आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडुंगाच्या फळांचे फारसे उत्पादन हाती लागले नाही, परंतु आॅक्टोबरनंतर मात्र फळांच्या उत्पादनात वाढ मिळू लागली आहे.

डिसेंबर-जानेवारीमध्ये थंडीचा कालावधी असल्याने पुन्हा फळांच्या उत्पादनवार परिणाम होणार आहे. त्याचा फळाची गुणवत्ता आणि त्यातील साखरेवर परिणाम होईल असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. येथील काही शेतकरी निवडुंगाच्या फळांची प्युरी तयार करतात. आरोग्यदायी गुणधर्मामुळे प्युरीलादेखील फळांइतकीच मागणी आहे. निवडुंगाच्या फळांना अमेकिरेच्या बरोबरीने कॅनडा आणि इटालीमधून मागणी वाढलेली आहे. 

इतर औषधी वनस्पती
पोटदुखीवर गुणकारी वाघेटीवाघेटीच्या काटेरी वेली जंगलात डोंगरकपारीला मोठ्या...
औषधी करटोली१. शास्त्रीय नाव :- Momordica dioica Roxb.ex....
कोवळी भाजी- एक पौष्टिक रानभाजीशास्त्रीय नाव : Chlorophytum borivilianum...
कोरफड, वाळा लागवडीविषयी माहिती द्यावी.स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा...
तंत्र शिंगाडा उत्पादनाचे...शिंगाडा हे उपवासाच्या काळात विशेष मागणी असलेले...
निवडुंगाच्या फळांना वाढती मागणीआत्तापर्यंत कोरडवाहू, वाळवंटातील दुर्लक्षित...
पित्तशामक कोकमकोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतुमय...
अडुळसा लागवड कशी करावी?अडुळसा लागवड  अडुळसा हे सदैव हिरवेगार...
अाैषधी म्हणूनही उपयुक्त मिरे, वेलचीस्वयंपाकात गरम मसाल्याचा वापर होत असतो. फक्त...
मुळव्याध, संधीवातावर गुणकारी सुरणसुरणाचा कंद म्हणजे जमिनीत वाढणाऱ्या खोडाचा एक...
सौंदर्यवर्धक, वेदनाशामक ब्राह्मी,...त्वचाविकार अाणि केसांच्या अारोग्यासाठी ब्राह्मी...