Agriculture stories in Marathi, news regarding use of charcoal as soil amendment, Agrowon, Maharashtra | Agrowon

जमीन सुधारणेसाठी ‘बायोचार’ ठरले फायदेशीर
कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

शेतातील टाकाऊ पदार्थांवर ऑक्सिजनविरहित वातावरणात पायराॅलिसिस ही क्रिया केल्यानंतर बायोचारची (सेंद्रिय काेळसा) निर्मिती होते. वालुकामय व चुनखडीयुक्त जमिनीत बायोचारचा वापर केल्यास त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांवर चांगला परिणाम होत असल्याचे जपानमधील संशोधकांना दिसून आले आहे.

शेतातील टाकाऊ पदार्थांवर ऑक्सिजनविरहित वातावरणात पायराॅलिसिस ही क्रिया केल्यानंतर बायोचारची (सेंद्रिय काेळसा) निर्मिती होते. वालुकामय व चुनखडीयुक्त जमिनीत बायोचारचा वापर केल्यास त्यांच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मांवर चांगला परिणाम होत असल्याचे जपानमधील संशोधकांना दिसून आले आहे.

जपानमधील ग्रामीण अभियांत्रिकी संशोधन संस्थेअंतर्गत कृषी पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था कार्यरत आहे. या संस्थेतील संशोधकांनी बायोचारसंबंधी संशोधन केले. जपानमधील ग्रामीण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या संशोधन प्रबंधात याबाबत माहिती देण्यात आली आहे. वालुकामय व चुनखडीयुक्त जमिनींमध्ये बायोचार वापराने जलधारण क्षमता, सामू, अन्नद्रव्यांचे शोषण करण्याची क्षमता, नत्र व स्फुरदाची उपलब्ध करण्याची क्षमता आदी गुणधर्मांवर चांगला परिणाम दिसून आला.
सेंद्रिय पदार्थांचे उच्च तापमानावर (४०० अंश सेल्सिअस आणि त्यापुढे) उष्णता देऊन विघटन केले जाते. एवढ्या उच्च तापमानावर सेंद्रिय पदार्थ जाळल्यानंतर मिळणाऱ्या कोळशास बायोचार म्हणतात. संशोधकांनी जापनीज सेडार, सायप्रस लाकडाचे तुकडे, बांबूचे तुकडे, भाताचे तूस, उसाचे बगॅस, कुक्कुटपालन उद्योगातील टाकाऊ पदार्थ, सांडपाण्यातील गाळ आदी पदार्थांवर ४००, ६०० आणि ८०० अंश सेल्सिअस इतक्या उच्च तापमानावर पायरॉलिसिस क्रिया केली. त्यानंतर मिळालेल्या बायोचारचा वालुकामय व चुनखडीयुक्त जमिनींमध्ये वापर केला. मिळालेल्या निष्कर्षांवरून बायोचारचा भूसुधारक म्हणून वापर केल्यास फायदा होतो असे दिसून झाले. भारतात दरवर्षी कुक्कुटपालन उद्योगातील टाकाऊ पदार्थांचे प्रमाण २८ ते ३० दशलक्ष टन इतके आहे. विविध शहरात सांडपाण्याची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. सर्व टाकाऊ पदार्थांवर पायराॅलिसिस पद्धतीने प्रक्रिया करून बायोचारची निर्मिती केल्यास शेती, रोजगारनिर्मिती व स्वच्छ परिसर निर्मितीसाठी मोठा फायदा होऊ शकतो. 

असे आहेत निष्कर्ष : 

  • लाकडाचे तुकडे व बगॅस बायोचारच्या वापरामुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली. 
  • ४०० अंश सेल्सिअस तापमानावर पायरॉलिसिस केलेल्या लाकडाच्या तुकड्यांपासून मिळालेल्या बायोचारच्या वापरामुळे अन्नद्रव्यांचे शोषण करण्याची क्षमता वाढली. 
  • ८०० अंश सेल्सिअस तापमानावर पायरॉलिसिस केलेल्या लाकडाच्या तुकड्यांपासून मिळालेल्या बायोचारच्या वापरामुळे जमिनीची नायट्रेट स्वरूपातील नत्र धरून ठेवण्याची क्षमता वाढली. म्हणजेच त्यामुळे विविध कारणांमुळे जमिनीतून नत्रयुक्त खतांचे वाहून जाणे किंवा अस्थिरीकरण यांचा वेग मंदावला. 
  • कुक्कुटपालन उद्योगातील टाकाऊ पदार्थांच्या पायरॉलिसिसनंतर मिळालेल्या बायोचारमुळे जमिनीच्या सामूमध्ये सुधारणा झाली. तसेच फॉस्फेट स्वरूपातील स्फुरद पिकांना पुरविण्याची क्षमता वाढली.

इतर इंधन शेती
ऊस पिकातील खोडकिडीचे नियंत्रणसद्यस्थितीत उसाच्या लागवडी संपल्या आहेत. विविध...
सौर ऊर्जेवर आधारीत उपकरणांची माहिती..सौर वाळवणी यंत्र : साठवणीसाठी धान्य योग्य...
सोलर टनेल ड्रायरबाबत माहिती द्यावी.सोलर टनेल ड्रायरमध्ये सफेद मुसळी, पान पिंपरी, हळद...
तंत्र कोळसा उत्पादनाचे...कार्बनच्या प्रमाणावर कोळशाचे औष्णिक मूल्य ठरते....
जमीन सुधारणेसाठी ‘बायोचार’ ठरले फायदेशीरशेतातील टाकाऊ पदार्थांवर ऑक्सिजनविरहित वातावरणात...
पीक अवशेषांचे ब्रिक्वेटिंग शेतकऱ्यांसह...शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या पीक अवशेषांची...
वाया शेतमालापासून स्वस्तात इथेनॉल...उत्तराखंडमधील काशीपूर येथे नुकतीच शेतीमधील वाया...