ईशान्य फाउंडेशन रुजवतेय शाश्वत शेतीची बीजे

 ईशान्य फाउंडेशन रुजवतेय शाश्वत शेतीची बीजे
ईशान्य फाउंडेशन रुजवतेय शाश्वत शेतीची बीजे
ईशान्य फाउंडेशन ही संस्था तळोजा औद्योगिक वसाहत परिसर, तसेच पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील ४७ गावे, पाड्यांमध्ये विविध उपक्रम राबविते. संस्थेतर्फे फळबाग लागवड, पशुपालन, आरोग्य तपासणी, व्यावसायिक प्रशिक्षण आणि महिला सबलीकरण असे विविध उपक्रम राबविले जातात.
ईशान्य फाउंडेशन ही दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. आणि स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लि. या कंपन्यांचे सीएसआर उपक्रम राबविणारी स्वयंसेवी संस्था आहे. तळोजा औद्योगिक वसाहत परिसर आणि पुणे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील ४७ गावे आणि पाड्यांमध्ये संस्था प्रामुख्याने शेती आणि पूरक उद्योगामध्ये शाश्वत उत्पन्न वाढविण्यासाठी उपक्रम राबविते. संस्थेतर्फे फळबाग विकास (वाडी), पशुधन विकास आणि विस्तार, आरोग्य तपासणी, व्यावसायिक प्रशिक्षण, शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन, सामजिक समस्यांबद्दल जाणीव जागृती, महिला विकास आणि सबलीकरण असे विविध उपक्रम राबविले जातात. तळोजा औद्योगिक वसाहतीच्या परिसरातील दुर्गम भागात संस्थेच्या प्रयत्नातून आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावत आहे. याचबरोबरीने शाश्वत उत्पन्नवाढीच्या कार्यक्रमातून शेती आणि पूरक उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी तयार होत आहेत.
वाडी कार्यक्रम
  • शाश्वत उत्पन्नवाढ आणि रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या गरजू कुटुंबांसाठी संस्थेने वाडी प्रकल्प राबविला. प्रत्येक कुटुंबास तीस केसर आंबा कलमे, अवजारे, खते, कीडनाशके दिली जातात. सध्या वाडी प्रकल्पात ३२६ आदिवासी शेतकरी आणि ८२ इतर मागासवर्गीय गटातील शेतकरी आहेत.
  •  भाजीपाला मागणी आणि पुरवठा यांचा अभ्यास करून शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे सुधारित आणि संकरित बियाणे किंवा रोपांचा पुरवठा केला जातो. 
  •   भाजीपाल्याच्या बरोबरीने सध्या दोन एकरांवर मोगरा लागवड, विदेशी भाजीपाला लागवड केली आहे. ५६ शेतकऱ्यांनी पपई, शेवगा, जांभूळ लागवड केली आहे. 
  •   कुटुंबांतील प्रत्येकाला फळझाडांच्या लागवडीसाठी आखणी, खड्डे खोदणे, खड्डे खत- मातीने भरणे, कलमाची लागवड, कीड- रोगांची ओळख आणि नियंत्रणाचे उपाय, खतांचा वापर, कीडनाशक फवारणी, जीवामृत निर्मिती, भाजीपाला रोपवाटिका आणि लागवड, फळझाडांच्या रोपवाटिकेबाबत वाडीवर प्रशिक्षण दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीनंतर पीक व्यवस्थापन करणे सोपे जाते. 
  •   शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख, उत्पादित शेतमालाची विक्री व्यवस्था, पूरक उद्योगाची माहिती होण्यासाठी आंतरराज्य व परिसरात अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाते. 
  •   सत्तेचाळीस गावांतील ६३० शेतकऱ्यांना मोबाईलवर एसएमएसद्वारे शेतीपूरक माहिती पाठविली जाते.  
  •   आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून ४०८ शेतकरी कुटुंबांनी भाजीपाला लागवड केली आहे. वाडी कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी १२,३६० केसर आंबा कलमांची लागवड केली आहे.
  •   शेतकरी कुटुबाला भाजीपाला विक्रीतून साधारणतः वर्षाला १०,००० ते २२,००० रुपये उत्पन्न मिळेल अशा पद्धतीने कायमस्वरूपी रोजगारनिर्मितीचे काम संस्था करत आहे.
  • दुग्धविकास कार्यक्रम 

  • गरजू कुटुंबांना संकरित गाय दिली जाते. सोबत विविध प्रकारची खाद्ये आणि औषधांचा पुरवठा. 
  •   संपूर्ण कुटुंबाला गाय, कालवड संगोपनाचे प्रशिक्षण. चारा व्यवस्थापन आणि नियोजनाची माहिती.
  •   पशुपालकांसाठी प्रशिक्षण आणि अभ्यास दौरा.
  •   गाय, कालवडीचे पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण आणि आरोग्य तपासणी.
  •   नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक गायीचा विमा.
  •   संबंधित कुटुंबाला महिन्याला दूध व शेणखत विक्रीतून साधारणतः ६,५०० ते ८,५०० रुपयांचे उत्पन्न मिळेल अशा पद्धतीने कायमस्वरूपी रोजगारनिर्मितीवर संस्थेचा भर.
  •   दुभत्या गाईंची संख्या वाढविण्यासाठी संस्थेने पाले खुर्द (ता. पनवेल, जि. रायगड) येथे कृत्रिम रेतन केंद्र सुरू केले. त्यामुळे दुधाळ गाई शेतकऱ्यांच्या गोठ्यात तयार होत आहेत. 
  •   संस्थेने आतापर्यंत २२२ कुटुंबांना २६० दुधाळ जर्सी गायी दिल्या आहेत. प्रतिवर्षी ४१ गावांच्यामध्ये संस्थेतर्फे गायी आणि म्हशींमध्ये कृत्रिम रेतन करण्यात येते. रेतनानंतर दोन महिन्यांनी गायी, म्हशींची गर्भतपासणी करून नोंद ठेवली जाते.
  •           आरोग्यविषयक उपक्रम 

  •  संस्थेतर्फे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट (पनवेल) यांच्या साहाय्याने प्रत्येक वर्षी तीन वेळा डोळे तपासणी शिबिराचे आयोजन.
  •  दरवर्षी शंभरावर गरजू लोकांवर मोतीबिंदू शस्रक्रिया. तसेच ४५० हून अधिक  गरजू लोकांना चष्मे बनवून वाटप केले जाते. संस्थेतर्फे दरवर्षी साधारणपणे ४०० ते ५०० आजारी व्यक्तींची  मोफत आरोग्य तपासणी करून औषधांचे वाटप.
  •  एमजीएम हॉस्पिटलच्या (कामोठे) सहयोगाने मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधी, गरजूंना मोफत श्रवण यंत्रांचे वाटप. हॉस्पिटलच्या माध्यमातून मोठ्या आजारावर उपचार व योग्य मार्गदर्शनाची सोय.
  •  
    शिक्षणासाठी मदत 
     गुणवान गरजू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपाची मदत केली जाते. याचबरोबरीने विद्यार्थांचा गौरव केला जातो. रोजगार संधी व शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले जाते.
    महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण  
     ग्रामीण भागाची गरज लक्षात घेऊन व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या अभ्यास करून दरवर्षी ८० महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षणवर्गाचे आयोजन केले जाते. यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. 
    अभ्यास दौरे, प्रशिक्षणाचे आयोजन 
     शाश्वत विकास, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, महिला विकास व सबलीकरण, सामजिक उन्नती हे विषय सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी विविध गावे, पाड्यांवर महिला मेळावे, शेतकरी मेळावे, महिला प्रशिक्षण, शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यांचे आयोजन केले जाते. यासाठी दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लि. आणि स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लि. या कंपन्यांची मदत मिळते. ईशान्य फाउंडेशनच्या विश्‍वस्त पारुल मेहता, शैलेश मेहता आणि अशोक शाह यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेचे कार्यकर्ते सामाजिक विकास आणि परिवर्तन करण्याचे काम विविध गावांमध्ये करीत आहेत.
    परसबागेची उभारणी
    आरोग्याच्या दृष्टीने हिरव्या भाजीपाल्याचे महत्त्व लक्षात घेऊन ५५० कुटुंबांना परसबाग लागवडीसाठी लागणाऱ्या भाजीपाला बियाण्याचे किट संस्था दरवर्षी देते. त्यामुळे पुरेसा विविध प्रकारचा भाजीपाला कुटुंबाला मिळतो.  
    संपर्क - प्रमोद जगताप ः ९४२३९२८९२३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com