Agriculture stories in Marathi, oat fodder crop cultivation technology , AGROWON, Maharashtra | Agrowon

ओट चारा पीक लागवड तंत्रज्ञान
सुधीर सूर्यगंध
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे पीक आहे. यामध्ये ८ ते ९ टक्के प्रथिने असतात. 

जमीन : मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.

पूर्वमशागत :  एक नांगरट करावी. दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणी :  पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. हेक्‍टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे पीक आहे. यामध्ये ८ ते ९ टक्के प्रथिने असतात. 

जमीन : मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.

पूर्वमशागत :  एक नांगरट करावी. दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणी :  पाभरीने ३० सें.मी. अंतरावर पेरणी करावी. हेक्‍टरी १०० किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.

सुधारित जाती : फुले हरिता, केंट, जे.एच.ओ.-८२२ या जातींचा वापर लागवडीसाठी करावा.

खते : पूर्वमशागतीच्या वेळेस प्रतिहेक्‍टरी १०-१२ बैलगाड्या शेणखत जमिनीत मिसळावे. प्रतिहेक्‍टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर २५ दिवसांनी ४० किलो नत्र, तसेच पहिल्या कापणीनंतर ४० किलो नत्र प्रतिहेक्‍टरी द्यावे.

आंतरमशागत : पेरणीनंतर पहिली खुरपणी ३० दिवसांनी करून तणाचा प्रार्दुभाव होणार याची काळजी घ्यावी.

पाणी व्यवस्थापन : या पिकास १० ते १२ दिवसांनी पाणी देण्याची व्यवस्था करावी.

उत्पादन : या पिकाचे दोन कापण्यांचे ५०० -६०० क्विंटल प्रतिहेक्‍टरी इतके उत्पादन मिळते. 

संपर्क : सुधीर सूर्यगंध - ९८२२६११९३४
(लेखक डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन) आहेत.)
 

इतर चारा पिके
जनावरांसाठी उपयुक्त प्रथिनयुक्त द्विदल...प्रथिने पुरवठा करणाऱ्या चारा पिकांमध्ये विशेषतः...
चाराटंचाईमध्ये हायड्रोपोनिक्स चाऱ्याची...अत्यल्प पर्जन्यमानामुळे चारा उत्पादनात लक्षणीय घट...
वेळेवर करा ओट चारापिकाची लागवडओट हे एक महत्त्वाचे एकदल वर्गीय चारापीक आहे. ओट...
लागवड लसूणघासाची...लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगला निचरा होणारी,...
प्रथिनांचा उत्तम स्राेत ः गुणवंत चारापीकराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने...
सकस चाऱ्यासाठी बाजरी, दशरथ, मारवेलबाजरीचा हिरवा तसेच वाळलेला चारा पौष्टिक असतो....
पीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...
मुरघास कसा तयार करावा ?मुरघास बनविण्यासाठी एकदल पिके - जसे की मका,...
पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा...जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
योग्य प्रमाणात वापरा सुबाभळीचा चारासुबाभूळ हे विविधोपयोगी बहुवर्गीय द्विदल...
लसूणघास लागवड कशी करावी?लसूणघास हे पीक वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये...
चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड फायदेशीरमका पिकाचा चारा अत्यंत सकस, रुचकर असतो. मका...
बरसीम चारा पिकाची लागवडबरसीम हे द्विदलवर्गीय चारापीक आहे. पाण्याचा...
लुसर्न चारा पीक लागवड तंत्रज्ञान लुसर्न हे दुभत्या जनावरांना मानवणारे वैरणीचे...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीमबरसीम पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी. हेक्‍टरी २५...
ओट चारा पीक लागवड तंत्रज्ञान ओट हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे चाऱ्याचे...
संकरित नेपिअर चारा पीक लागवड तंत्रज्ञानसंकरित नेपिअर हे बहुवार्षिक, भरपूर व चांगले...
बाजरी चारा पीक लगवड तंत्रज्ञान बाजरी हे पीक पालेदार, रसाळ, गोड व मऊ असते....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...