Agriculture stories in Marathi, Oilseed processing, AGROWON, Maharashtra | Agrowon

तेलबिया प्रक्रिया उद्योगात आहेत संधी
डॉ. एस. डी. कुलकर्णी
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल काढण्यासाठी सॉल्व्हंट प्लांटची सुरवात झाली. अशाप्रकारे काढलेले तेल रसायनांच्या मदतीने शुद्ध करून बाजारात उपलब्ध केले जाऊ लागले.

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल काढण्यासाठी सॉल्व्हंट प्लांटची सुरवात झाली. अशाप्रकारे काढलेले तेल रसायनांच्या मदतीने शुद्ध करून बाजारात उपलब्ध केले जाऊ लागले.

  अलीकडे तेलघाणीतील तेलाचा वापर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे तेलबिया प्रक्रियाचा कुटीर ते मध्यम स्तरीय उद्योग ही एक चांगली संधी तयार झाली आहे. २०१६-१७ या वर्षात देशामध्ये तेलबियांचे उत्पादन २३२.८ लाख मेट्रिक टन अनुमानित आहे. 
याचबरोबरीने जवस, कारळे, सरकी, खोबरे तसेच भाताच्या कोंड्याच्या तेलाचा समावेश होतो. यापासून ६९.६० लाख टन खाद्यतेल मिळते.

  खाद्यतेलाची बाकीची गरज पूर्ण करण्यासाठी आपण ते आयात करतो. तेलबियापासून तेल काढणे एवढाच एक तेलबिया प्रक्रिया उद्योग नसतो. बऱ्याचदा उद्योग म्हणजे मोठी जागा, त्यावर उभा केलेला कारखाना, त्यामध्ये काम करणारे मजूर इ. असे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. परंतु, आता वेगवेगळे उद्योग उभे राहात आहेत. 

काही तेलबिया आपण पूर्ण दाण्याच्या रूपात खाद्योपयोग करतो. शेंगदाणे, सोयाबीन, जवस, सूर्यफूल, तीळ इ. मात्र उपयोग करण्यासाठी प्रत्येक तेलबियांवर वेगवेगळी प्रक्रिया करणे आवश्‍यक असते. अशा प्रकारचा प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी जास्त जागा अथवा भांडवल लागत नाही.

भारतामध्ये तेलबियांचे उत्पादन
(वर्ष २०१६-१७) (आकडे लाख टनांत)

तेलबिया उत्पादन खरीप अनुमानित उत्पादन रब्बी एकूण उत्पादन
भुईमूग ४५.० १७.०   ६२.०
सोयाबीन ९५.० -- ९५
सूर्यफूल  १.० ३.५ ४.५
तीळ ४.० ३.५ ७.५
मोहरी ६३.० -- ६३.०
करडई -- ०.३० ०.३०
एकूण १४५.० ८७.८० २३२.८०

संपर्क -  डॉ. एस. डी. कुलकर्णी ९७५२२७५३०४
(लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
उभारणी दूधप्रक्रिया उद्योगाचीप्रक्रिया प्रकल्पामध्ये दूध संकलन, गुणवत्ता...
प्रक्रियेसाठी भाताचा कोंडाभात कोंड्यामधील पोषक घटकांचे सक्रिय स्वरूप...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
प्रक्रिया उद्योगात मक्याला मागणी मक्याचा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वापर वाढतो आहे....
AGROWON_AWARDS : ज्वारी उत्पादनांची...अॅग्रोवन स्मार्ट कृषी उद्योजक पुरस्कार...
प्रक्रिया, औषधीनिर्मितीमध्ये जांभळाला...जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे. त्याच्या...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
बिटापासून बर्फीनिर्मिती लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे...
हळदीपासून मूल्यवर्धीत पदार्थांची...हळद ही अन्नपचन, पित्तशामक व रक्तशुद्धी करणारी आहे...
फळे, भाज्यांचा वापर करून दुग्धजन्य...विभागनिहाय उपलब्ध असणाऱ्या फळांना व भाज्यांना...
अंकुरित धान्यांपासून बेकरी उत्पादनेअंकुरलेल्या धान्यामध्ये अधिक पोषक तत्त्वे असतात....
अन्नप्रक्रिया उद्योगातील परवाने, कायदेप्रक्रिया उद्योग स्थापन केल्यानंतर या...
प्रक्रियेद्वारा आल्याचे मूल्यवर्धनआरोग्यदायी गुणधर्मामुळे आल्यापासून बनविलेल्या...
शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना...पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे...
कांदा निर्जलीकरणास आहे वावकांदा हे भारतातील प्रमुख पीक असून, ते मुख्यत्वे...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...
हळद पॉलिश, प्रतवारी महत्त्वाचीलोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद २० ते ३० मिनिटांसाठी...
पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थअंजिरामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक...
डाळिंबापासून अनारदाना, अनाररबडाळिंबापासून तयार होणाऱ्या अनारदाना या पदार्थास...