कांदा पीक सल्ला

कांद्यावरील करपा
कांद्यावरील करपा

बहुतांश ठिकाणी खरीप कांदा रोपांची पुनर्लागवड झालेली असून, पीक जवळजवळ १५ ते ४५ दिवसांचे झाले आहे. या महिन्यात रांगडा कांद्याची रोपवाटिका तयार करणे आवश्‍यक आहे. ज्यांनी आधीच रांगडा कांद्याची रोपवाटिका केली होती, ती रोपे पुनर्लागवडीसाठी तयार आहेत. या स्थितीमध्ये पुढील मार्गदर्शिका उपयोगी ठरेल.

रांगडा कांद्यासाठी रोपवाटिका एक हेक्‍टर क्षेत्रातील रोपांसाठी पाच गुंठे (५ ते ७ किलो बियाणे) रोपवाटिका करावी.खोल नांगरट करून, अगोदरच्या पिकांची धसकटे, काडीकचरा, तण आणि दगड काढावेत. त्यात अर्धा टन चांगले कुजलेले शेणखत मिसळून, १०-१५ सें.मी. उंच, १ मीटर रुंद आणि सोयीनुसार लांब गादीवाफे तयार करावेत. तण नियंत्रणासाठी वाफ्यावर पेंडीमिथॅलिन २ मि.लि. प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे.

बीज प्रक्रिया ः करपा रोग नियंत्रण ः कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे. मर रोग नियंत्रण ः ट्रायकोडर्मा व्हीरीडी १.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे. पेरणीपूर्वी नत्र, स्फुरद, पालाश ४ः१ः१ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात खते द्यावीत. बियाण्याची लागवड ओळींमध्ये ५० मि.मी. किंवा ७५ मि.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीनंतर कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावेत. त्यानंतर थोडे पाणी द्यावे. पाणी देण्याकरिता ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करणे उपयुक्त ठरते.पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून, २ किलो प्रति ५०० वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.

पूर्व मशागत

  • शेताची नांगरणी करून व कुळवाच्या पाळ्या देऊन मोठी ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी.
  • वाफे तयार करण्यापूर्वी हेक्‍टरी १५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ७.५ टन कोंबडी खत किंवा ७.५ टन गांडूळखत पसरून जमिनीत चांगले मिसळावे.
  • गादीवाफे १५ सें.मी. उंच आणि १२० सें.मी. रुंद असे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये ४५ सें.मी. इतके अंतर ठेवावे. रुंद गादी वाफ्यांची पद्धत ठिबक आणि तुषार सिंचनाकरिता सोयीची आहे.
  • ठिबक सिंचनासाठी, प्रत्येक गादीवाफ्यामध्ये इनलािइन ड्रिपर असणाऱ्या १६ मि.मी. जाडीच्या दोन लॅटरलचा वापर करावा. ताशी ४ लिटर उत्सर्जन क्षमतेच्या दोन ड्रिपर मधले अंतर ३०-५० सें.मी. असावे.
  • तुषार सिंचनासाठी, २० मि.मी. जाडीच्या लॅटरलमध्ये ताशी १३५ लिटर पाणी ६ मीटर अंतरावर फेकणारे नोझल असावे.
  • रोपांची पुनर्लागवड

  • हेक्‍टरी नत्र ११० किलो, स्फुरद ४० किलो, पालाश ४० किलो व गंधक (जमिनीतील प्रमाणानुसार) १५ ते ३० किलो याप्रमाणे द्यावे. एकूण नत्रापैकी ४० किलो नत्र व स्फुरद, पालाश, गंधक यांच्या संपूर्ण मात्रा रोपांच्या पुनर्लागवडीवेळी द्याव्यात. उर्वरित नत्राच्या मात्रा दोन समान हप्त्यांत पुनर्लागवडीनंतर ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात.
  • ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत असाल, तर पुनर्लागवडीवेळी ४० किलो नत्र देऊन उर्वरित नत्र समान हप्त्यांत विभागून ठिबक सिंचनाद्वारे ६० दिवसांपर्यंत द्यावे.
  • अॅझोस्पिरीलम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) प्रत्येकी ५ किलो प्रतिहेक्‍टर याप्रमाणे द्यावे.पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळेस तणनाशकांची फवारणी (प्रतिलिटर पाणी) करावी. ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ टक्के ईसी) १.५ ते २ मि.लि. किंवा  पेंडीमिथॅलीन (३० टक्के ईसी) ३.५ ते ४ मि.लि.
  • दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून ३५-४० दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्यांकडील १/३ भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा.
  • रोप प्रक्रिया ः पुनर्लागवडीपूर्वी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्याकरिता, कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर या द्रावणात रोपांची मुळे बुडवून घ्यावीत.पुनर्लागवडीवेळी व पुनर्लागवडीनंतर तीन दिवसांनी पाणी द्यावे.     खरीप कांद्याचे व्यवस्थापन

  • नत्र खताचा पहिला हप्ता २५ किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा.
  • पुनर्लागवडीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी.
  • नत्र खताचा दुसरा हप्ता २५ किलो प्रतिहेक्‍टर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
  • पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्ये ५ मि.लि./ लिटर या प्रमाणात द्यावीत.
  • नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरिया १० ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारणी करावी.
  • सतत तीन दिवस पाऊस, ८५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक सापेक्ष आर्द्रता आणि ढगाळ वातावरण असल्यास काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते.
  • काळा करपा नियंत्रणः (फवारणी प्रतिलिटर पाणी)
  •     मॅन्कोझेब २.५ ग्रॅम
  • यासोबत फूलकिडीचा प्रादुर्भाव असल्यास
  •     मिथोमिल ०.८ ग्रॅम
  • वरील फवारणीने नियंत्रण न मिळाल्यास
  •     फवारणी प्रतिलिटर पाणी
  •     प्रोफेनोफॉस १ मि.लि. + हेक्‍साकोनॅझोल १ ग्रॅम किंवा फिप्रोनील १ मि.लि. + प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम
  • टीप ः पहिल्या फवारणीनंतर पुढील फवारणी आवश्यकतेनुसार १५ दिवसांनी करावी.                      संपर्क - डॉ. शैलेंद्र गाडगे, ०२१३५-२२२०२६ (कांदा व लसूण संशोधन संचलनालय, राजगुरुनगर, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com