Agriculture stories in Marathi, orange crop advisory , Agrowon. maharashtra | Agrowon

संत्रा पीक सल्ला  
 डॉ. दिनकरनाथ गर्ग
रविवार, 29 ऑक्टोबर 2017
 • सध्या १५ ते २० टक्के संत्रा बागांमध्ये फळगळीची समस्या दिसून येत आहे. प्रादुर्भावित बागांमध्ये फळगळीची समस्या प्रामुख्याने देठकूज करणाऱ्या कोलेटोट्रीकम/ बॉट्रोडीप्लोडिया बुरशीचा प्रादुर्भाव आहे. तसेच प्रयोगशाळेतील परीक्षणात अल्टरनेरिया बुरशीचा प्रादुर्भावही दिसून आला आहे.
 • काही बागांमध्ये वायबहर( फळे वेडीवाकडी होणे) ची लक्षणे दिसत आहेत.
 • काही फळांमध्ये एकसारखी रंगधारणा होत नाही. त्याचप्रमाणे काही फळांच्या देठाकडील भाग पिवळा व टोकाकडील भाग हिरवा दिसत आहे.
 • सध्या १५ ते २० टक्के संत्रा बागांमध्ये फळगळीची समस्या दिसून येत आहे. प्रादुर्भावित बागांमध्ये फळगळीची समस्या प्रामुख्याने देठकूज करणाऱ्या कोलेटोट्रीकम/ बॉट्रोडीप्लोडिया बुरशीचा प्रादुर्भाव आहे. तसेच प्रयोगशाळेतील परीक्षणात अल्टरनेरिया बुरशीचा प्रादुर्भावही दिसून आला आहे.
 • काही बागांमध्ये वायबहर( फळे वेडीवाकडी होणे) ची लक्षणे दिसत आहेत.
 • काही फळांमध्ये एकसारखी रंगधारणा होत नाही. त्याचप्रमाणे काही फळांच्या देठाकडील भाग पिवळा व टोकाकडील भाग हिरवा दिसत आहे.
 • पानांवर सूक्ष्म अन्नद्रव्य विशेषतः जस्त कमतरतेमुळे पिवळसर डाग दिसत आहेत. ही लक्षणे ग्रीनिंग या रोगांशी साधर्म दर्शवणारी आहेत. 

उपाययोजना : 

 • प्रादुर्भावित झाडांवर कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.
 • २,४-डी १.५ ग्रॅम किंवा जी.ए.३ १.५ ग्रॅम, किंवा पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो ग्रॅम किंवा युरिया १.५ किलो ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे. 
 • झाडावरील वाळलेल्या फांद्यांच्या टोकाची छाटणी केल्यानंतर ताबडतोब बुरशीनाशकांची फवारणी करावी. 
 • हलक्‍या जमिनीत लागवड केलेल्या संत्रा बागेत हलके पाणी द्यावे. 
 • संत्रा झाड सुदृढ व रोगविरहित ठेवण्याकरिता मातीपरीक्षणाच्या शिफारशीनुसार मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा द्यावी. 
 • भारी चोपण माती असणाऱ्या भागामध्ये पाण्याचा निचरा करणे आवश्‍यक आहे. 

ग्रीनिंग रोग नियंत्रण  : 

 • झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी २०० ग्रॅम झाडांच्या आळ्यातील मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.

संपर्क : डॉ. दिनकरनाथ गर्ग,९८२२३६९०३०
 (राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर )

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...
सहकार विभाग आयुक्तांविना पोरकापुणे : गेल्या आठ महिन्यांपासून राज्याच्या सहकार...
आत्मा प्रकल्प संचालक चौकशीत दोषीपुणे: कृषी खात्यातील वादग्रस्त अधिकारी बी. एन....
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या ‘व्होट शेअर’...पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता...
खानदेशात पूर्वहंगामी कापूस लागवड सुरू जळगाव ः खानदेशात मुबलक जलसाठे किंवा कृत्रिम...
कोकण वगळता उष्ण लाटेचा इशारापुणे : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या...
शेतकऱ्यांनो विकते ते पिकवाः डॉ. भालेअकोला ः येत्या हंगामात पीक लागवड करताना...
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...