Agriculture stories in Marathi, planning of sugarcane plantation, Agrowon, Maharashtra | Agrowon

नियोजन ऊस लागवडीचे...
विजय माळी
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

ऊस पिकासाठी ठिबक सिंचनासाठी आराखडा तयार करीत असताना उसाची लागवड दक्षिण- उत्तर होेईल याचा विचार करावा. याचा ऊस उत्पादन वाढीसाठी फायदा होतो.

पूर्व- पश्चिम लागवडीपेक्षा  दक्षिण- उत्तर लागवड केलेल्या उसाचे उत्पादन १२ ते १५ टक्के नेहमी जास्त येते. 

दक्षिण- उत्तर लागवडीबाबत संशोधनाचे निष्कर्ष : 

ऊस पिकासाठी ठिबक सिंचनासाठी आराखडा तयार करीत असताना उसाची लागवड दक्षिण- उत्तर होेईल याचा विचार करावा. याचा ऊस उत्पादन वाढीसाठी फायदा होतो.

पूर्व- पश्चिम लागवडीपेक्षा  दक्षिण- उत्तर लागवड केलेल्या उसाचे उत्पादन १२ ते १५ टक्के नेहमी जास्त येते. 

दक्षिण- उत्तर लागवडीबाबत संशोधनाचे निष्कर्ष : 

  • याप (१९२०) यांच्या अभ्यासानुसार १०० स्क्वेअर सें.मी. उसाचे पान ताशी २.०८ मिलिग्रॅम ते १०.०१ मिलिग्रॅम कार्बन डाय- ऑक्साईडचे शोषण करते. एका उसाला तीन ते चार महिन्यांनंतर कायमस्वरूपी दोन सरींतील अंतरानुसार १२ ते १६ पाने हिरवी असतात व या पानांचे आकारमान काढले, तर ६००० ते ८००० स्क्वेअर सें.मी. एवढे असते.
  • गुंडिंग, १९४२ यांनी केलेल्या अभ्यासानुसार, एका उसासाठी दररोज ६००० स्क्वे. सें.मी. उसाच्या पानाचे आकारमान असणाऱ्या जातीसाठी (को- ८६०३२, को- ७२१९ इत्यादी) ३०२.४० ग्रॅम कार्बन डाय- ऑक्साईड, तर ८००० स्क्वे. सें.मी.साठी ४०३ ग्रॅम कार्बन डाय- आॅक्साईडची गरज असते. ते घेण्याचे प्रमाण सकाळी ८ ते १० व सायंकाळी २ ते ४ या कालावधीत सर्वांत जास्त असते. कार्बन डाय- ऑक्साईडची घनता जास्त असल्याने तो जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंतच जास्त असतो. 
  • आपल्याकडे वर्षभरामध्ये एकूण वाहणाऱ्या वाऱ्यापैकी जवळपास ६५ ते ७० टक्के वारा हा पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतो. उरलेला ३० ते ३५ टक्के वारा हा दक्षिण- उत्तर किंवा उत्तर- दक्षिण वाहत असतो. जर आपण उसाची पूर्व- पश्चिम लागवड केली, तर वाऱ्याच्या प्रवाहामुळे जमिनीलगत असणारा कार्बन डाय- ऑक्साईड वायू आपल्या शेतातून जास्त प्रमाणात वाहून जातो. 
  • जर दक्षिण- उत्तर लागवड केली, तर वाऱ्याला अडथळा निर्माण होऊन जमिनीलगत असणारा कार्बन डाय- ऑक्साईड वायू वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. परिणामी फडामध्ये कार्बन डाय- ऑक्साईड वायू जास्त प्रमाणात राहून ऊस पिकास शोषून घेण्यासाठी फायदा होतो. 
  • वारा वाहण्याचे प्रमाण सकाळी ८ ते १० व दुपारी ३ ते ५ या वेळेत जास्त असते आणि ऊस पीक कार्बन डाय- ऑक्साईड घेण्याचे प्रमाणही याच कालावधीत जास्त आहे. 
  • सिंग बी. एन. व लाल के. एन. (१९३५) या शास्त्रज्ञांच्या मते पानांमध्ये अन्न तयार करण्याचे प्रमाण वातावरणातील कार्बन डाय- ऑक्साईडचे प्रमाण कमी- जास्त होण्यावर असते. त्याचबरोबर वातावरणामध्ये उसाच्या फडाबाहेर ३२० पीपीएम व उसाच्या फडामध्ये ५०० पीपीएमपासून ते ६०० पीपीएम पर्यंत कार्बन डाय- ऑक्साईडचे प्रमाण राहते. तो पानांनी शोषून घेण्यासाठी दक्षिण- उत्तर लागवड करणे फायद्याचे ठरते.

उसाभोवताली शेवरी किंवा उंच गवताची लागवड :
साधारणपणे सर्वच ठिकाणी उसाची दक्षिण- उत्तर लागवड करणे शक्य होत नाही, यामध्ये शेताची लांबी- रुंदी, जमिनीचा उतार, सोईस्कर रस्ता, शेती करण्याचे वळण / सवय आदी बाबींचा समावेश होतो. दक्षिण- उत्तर लागवड करणे अशक्य असल्यास, पूर्व- पश्चिम लागवड केल्यास उसाच्या सर्व बाजूंनी वारा थोपविण्यासाठी शेवरी किंवा जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणारे उंच वाढणारे गवताची लागवड करावी. यामुळे ऊस उत्पादनात घट येणार नाही.
पूर्वीच्या काळात आपण ऊस लागवडीनंतर शेवरीचा ताटवा / ओळ लावत होतो. परंतु सध्या बरेचसे शेतकरी शेवरी काढण्यासाठी जादा शेतमजूर लागत असल्यामुळे किंवा आंतरमशागतीसाठी अडचण निर्माण होते म्हणून शेवरी लावत नाहीत. मात्र, शेवरी किंवा चाऱ्यासाठी उंच गवताची लागवड फायद्याची ठरते.

संपर्क : विजय माळी, ९४०३७७०६४९ 
(वरिष्ठ कृषी विद्यावेत्ता, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव)

इतर अॅग्रो विशेष
‘कर्जनिधी’चा लाभ शेतकऱ्यांना कसा मिळणार...केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्ज म्हणून ११ लाख...
अधिक नुकसान, कमी भरपाईराज्यभरात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही...
'टिळक महाराष्ट्र विद्यापीठा'तर्फे...पुणे : टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठाने ‘सकाळ’...
शेतकऱ्यांसाठी हमीभाव दिवास्वप्नचमुंबई : सध्या शेतीमाल हमीभावाच्या मुद्द्यावरून...
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढकोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा...
संयुक्त खतांच्या किमती वाढल्यानागपूर ः वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील...
हेक्टरी २९१ किलोच तुरीची खरेदीसांगली : वेळ सकाळी दहाची...जत तालुक्‍यातील शेतकरी...
सरकार कांदा खरेदी करण्याची शक्यतानवी दिल्ली : देशात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मध्य महाराष्ट्रात शुक्रवारी गारपिटीची...पुणे ः कर्नाटकाचा उत्तर भाग आणि अरबी समुद्र, गोवा...
‘हवामान स्मार्ट शेती’ प्रकल्पाला...नवी दिल्ली : हवामानाच्या लहरीपणामुळे देशातील...
माझा शेतकरी चोर आहे का ः धनंजय मुंडेरावेर, जि. जळगाव ः मराठवाड्यातील गारपीटग्रस्त...
राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवरपुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या...
खतांवरील अनुदानाबरोबरच किमतीही हव्यात...खत उद्योगाच्या प्रगतीमध्ये केंद्र सरकार व राज्य...
पंचायत तज्ज्ञ गटाचा अहवाल लवकरच सादर...पुणे  : राज्यातील ग्रामविकासाची भविष्यकालीन...
तेहेतीस वर्षांपासून ‘बोन्साय’ कलेचा...पुणे येथील प्राजक्ता काळे यांनी ३३ वर्षांपासून...
उसापेक्षा किफातशीर ठरले रताळेसोलापूर जिल्ह्यातील बाभूळगावाने रताळे पिकात आपली...
हमी नको, हवा रास्त भाव केंद्र सरकारने २०१८ चा अर्थसंकल्प सादर करताना...
राज्यात अधिकाधिक ‘सीड पार्क’...दर्जेदार बियाण्यांच्या संशोधनासाठी खासगी...
दीडपट हमीभाव : केंद्र सरकारचं लबाडाघरचं...केंद्र सरकार आकड्यांचा खेळ करून स्वतःच्या सोयीचा...
उत्पादन खर्च काढण्यात सरकारची चलाखीपुणे : केंद्र सरकार आपल्या सोयीचा उत्पादन...