गरज मधमाश्यांच्या वसाहती वाढविण्याची...

महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या किमान १२ लाख मधमाश्यांच्या वसाहतींची गरज असून, प्रत्यक्षात मात्र ८००० मधमाश्यांच्या वसाहती महाराष्ट्रात आहेत. यावरून हे लक्षात येते, मधमाशांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे झाले अाहे.
व्यावसायिक मधमाशीपालन
व्यावसायिक मधमाशीपालन

मधमाश्यांबद्दल असणारी अनास्था, अर्धवट माहिती यामुळे मधमाश्यांना म्हणावे तेवढे महत्त्व दिले जात नाही. मधमाश्यां म्हणजे मध केवळ या प्रमुख कारणामुळेच मधमाश्यांचे महत्त्व मर्यादित राहिले अाहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे आज मधमाश्यांचे अस्तित्वच संपविण्याच्या मार्गावर आहोत. मधमाश्यांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळेच ८० टक्के अन्नधान्याचे उत्पादन मिळते हे समजून घेतले पाहिजे.

सुरवात जागतिक मधमाशा दिनाची...     जागतिक पातळीवर मधमाश्यांच्या निसर्गोपयोगी आणि मानवोपयोगी गरज लक्षात घेऊन जगात प्रथम अमेरिकेतील मधमाशापालकांनी, संशोधकांनी आणि कर्तव्यदक्ष समाज घटकांनी मधमाशी दिन साजरा करायचे ठरविले. यासाठी या सर्वांनीच कृषी खात्याला तसे विनंतीपत्र पाठवून त्याचा पाठपुरावा केला. हा दिन साजरा करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी खात्याकडून अधिकृत मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न केले.      सन २००९ साली या प्रयत्नांना यश आले आणि याच वर्षी १९ ऑगस्ट रोजी जगात प्रथम अमेरिकेमध्ये मधमाशी दिन साजरा करण्यात अाला. मधमाशी दिनानिमित्त अमेरिकेतील सर्व बागांमध्ये सजावट करण्यात आली. मधापासून तयार केलेले खाद्यपदार्थ, सरबते यांची विक्री, मधमाशीविषयक चित्रे, मासिके, भित्तिचित्रे, मधमाशीपालनाचे साहित्य व उपकरणांचे प्रदर्शन, व्याख्याने, विविध स्पर्धा, मधमाशांविषयीचे विविध चित्रपट व माहितीपटांचे प्रदर्शन, मधविक्री इत्यादी विविध प्रकारांनी हा दिवस मोठ्या प्रमाणात दर वर्षी साजरा केला जाऊ लागला. भारतातील वसाहतींची सद्यस्थिती

  • पृथ्वीवरील जैवविविधता टिकवण्यासाठी, समाजातील प्रत्येक घटकाला मधमाशीचे महत्त्व समजून देण्यासाठी, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी अशा प्रकारचे दिवस जगभर साजरे करणे गरजेचे झाले अाहे.
  • आधुनिक मधमाशीपालनामुळे मधमाश्यांचा वापर परागीभवनासाठी होतो आणि त्यातून उत्तम मधनिर्मितीसुद्धा केली जाते. भारतातील जंगलांचा आणि शेतीचा विचार केला तर किमान एक कोटी मधमाश्यांच्या वसाहतींची गरज आहे. प्रत्यक्षात मात्र केवळ १२ लाख मधमाश्यांच्या वसाहती आहेत. 
  •  महाराष्ट्राचा विचार केला तर सध्या किमान १२ लाख मधमाश्यांच्या वसाहतींची गरज असून, प्रत्यक्षात मात्र ८००० मधमाश्यांच्या वसाहती महाराष्ट्रात आहेत. यावरून हे लक्षात येते, मधमाशांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे झाले अाहे. यासाठी समाजातून तसेच शासन स्तरावर प्रयत्न होणे अावश्यक अाहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com