रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड कशी करावी?
तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड

भुईमूग लागवडीसाठी मध्यम, पाण्याचा चांगला निचरा होणारी, मऊ, भुसभुशीत, वाळूमिश्रित व सेंद्रिय कर्ब असलेली जमीन निवडावी. अशा जमिनीत आऱ्या सहज जाऊन शेंगा चांगल्या पोसतात. जमिनीमध्ये हवा खेळती राहून, मुळांना भरपूर हवा मिळते. मुळावरील नत्रांच्या गाठींची वाढ होते. भारी चिकण मातीच्या जमिनी ओलसरपणा कमी झाल्यावर कडक होतात. तसेच काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहण्याची शक्‍यता असते. अशा जमिनीत भुईमुगाची लागवड करू नये.

रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत करावी. त्यानंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. लागवडीसाठी एस.बी. - ११, टी.ए.जी. - २४, टी.जी. - २६  या जातींचे  हेक्‍टरी १०० किलो बियाणे लागते. तर फुले प्रगती, फुले व्यास, फुले उनप, जे.एल. - ५०१, फुले भारती  या जातींचे  हेक्‍टरी १२० ते १२५ किलो बियाणे लागते.
पेरणीपुर्वी प्रति किलो बियाणास  ३ ग्रॅम मॅन्कोझेब किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम आणि २५ ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत सुकवून त्वरित पेरावे.

पेरणी करताना दोन ओळीतील अंतर ३० सेंमी व दोन रोपांतील अंतर १० सेंमी ठेवावे. जमीन ओलवून नंतर वापशावर पाभरीने अथवा टोकण पद्धतीने पेरणी करावी.  टोकण पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे कमी लागून उगवण चांगली होते.

 संपर्क-  ०२५७- २२५०८८८
(तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव)

इतर तेलबिया पिके
रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड कशी करावी?रब्बी हंगामात भुईमुगाची लागवड भुईमूग...
करडई लागवड तंत्रज्ञान करडईचे महत्त्व :  महाराष्ट्र राज्याचे...
सुर्यफुल पीकसंरक्षणसुर्यफूल पीक संरक्षण :  बीजप्रक्रिया...
सूर्यफूल हे योग्य आंतरपीकआंतरपीक पद्धती : जर मुख्य पिकाचा कालावधी १२० ते...
भुईमूग लागवड तंत्रज्ञान भुईमूग हे सर्वांत जुने तेलबिया पीक महाराष्ट्रात व...
सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान हवामान :  तीनही हंगामात लागवड शक्‍य...
तेलबिया प्रक्रिया उद्योगात आहेत संधीखाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया...
कोरडवाहूसाठी जवसाचे ‘लातूर -९३’ वाण...कमी कालावधीचे, कमी खर्चामध्ये उत्पादन शक्य असलेले...