agriculture stories in marathi, RAJENDRA MUCHUNDDI success story | Agrowon

झोपडीत राहणारा मजूर झाला प्रगतीशील बागायतदार
अभिजित डाके
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष. इच्छा असूनही प्रगतीशील शेतीची वाट त्यामुळे खुंटलेली. वडिलांनी तब्बल पंचवीस वर्षे तर मुलानेही काही काळ मजुरी केली. पण प्रयत्न, धैर्य, चिकाटी हे गुण असल्यास अडथळे दूर सारून प्रगतीला कारणीभूत ठरतात. अनेक वर्षे झोपडीत राहून आज स्वतःची विकसित केलेली डाळिंब शेती आणि त्या आधारे घर उभारून कुटुंबाला समाधानी बनवणारे शेतकरी म्हणजे सोन्याळ (जि. सांगली) येथील राजेंद्र मधुगौंड्डा मुचंड्डी. त्यांची ही यशकथा.

पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष. इच्छा असूनही प्रगतीशील शेतीची वाट त्यामुळे खुंटलेली. वडिलांनी तब्बल पंचवीस वर्षे तर मुलानेही काही काळ मजुरी केली. पण प्रयत्न, धैर्य, चिकाटी हे गुण असल्यास अडथळे दूर सारून प्रगतीला कारणीभूत ठरतात. अनेक वर्षे झोपडीत राहून आज स्वतःची विकसित केलेली डाळिंब शेती आणि त्या आधारे घर उभारून कुटुंबाला समाधानी बनवणारे शेतकरी म्हणजे सोन्याळ (जि. सांगली) येथील राजेंद्र मधुगौंड्डा मुचंड्डी. त्यांची ही यशकथा.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍याच्या पूर्व भाग दुष्काळीच. तालुक्यातील लोकांना म्हणूनच मजुरीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सोन्याळ येथील राजेंद्र मुचंड्डी यांची बोलकी व्यथाच तालुक्याचे चित्रच स्पष्ट करते. आमची साडेतीन एकर माळरान जमीन. पाणी नसल्याने कुसळदेखील उगवत नव्हते. कुटूंब चालवायचं म्हटलं तर पैसा पाहिजे. वडिलांनी तब्बल २५ वर्षे दुसऱ्यांच्या दारी चाकरी केली. त्या वेळी वर्षाला ३० रुपये हाती पडायचे. कुटुंबाची फरफट व्हायची. झोपडीत राहायचो. जगण्यासाठी पैसा लागतो एवढचं माहिती होतं. केवळ वडिलांच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणं कठीण होतं. मग आम्ही भावांनी डाळिंबाच्या बागेत मोलमजुरी करायला सुरवात केली.

मजुरी करता करता प्रशिक्षण

तशी आमची शेती होतीच. पण पाण्याशिवाय काहीच शक्य नव्हतं. सलग सात वर्षे डाळिंब बागेत मजुरीचे कष्ट उपसणे सुरू होते. डाळिंबाची काढणी, पॅकिंग करणे ही कामे अंगवळणी पडली होती. हळूहळू कोणता बहार धरायचा, कशा पद्धतीने डाळिंब पिकाची निगा राखायची याचे ज्ञान मिळवत गेलो. आपल्याच माळरानात आपणच डाळिंब पिकवली तर? असा विचार पुढे येऊ लागला. त्यातून आर्थिक झळा कमी होणार होत्या. मग त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले. राजेंद्र सांगत होते. कधी तरी कर्नाटक भागातील डाळिंबाच्या शेतात जाऊन काम केल्यानं तिथल्या काही गोष्टी शिकायला मिळाल्या. पिकाचा अभ्यास पक्का होत गेला.

जगण्याची उमेद, डाळिंबाचा श्रीगणेशा

खरं तर पुढं कसलाच आशावाद दिसत नव्हता. पण कुटूंब चालवणं भाग होतं. जगण्याची उमेद हवी तरच आपण यशस्वी होऊ हे सांगताना मधुगौंडा मुचंड्डी (वय ६८) यांच्या डोळ्यात अश्रू तरारले होते.
सन २०१० च्या दरम्यान अखेर डाळिंब लागवडीचे धाडस केले. भगवा वाणाची सुमारे दीड एकरांत लागवड झाली. पाणी नसलं तरी मागे हटून चालणार नव्हते. सुरवातीच्या काळात टॅंकरने पाणी देऊन बाग जगविली. हळूहळू बाग उत्पादन देऊ लागली. डाळिंबातलं उत्पन्न आणि आत्तापर्यंत पैपे गोळा केलेलं एकत्र करायला सुरवात केली.

जिद्दीने काम करीत राहिलो

पाणीटंचाईचं सावट कायम होतंच. त्यामुळे बोअर घेण्याचा निर्णय घेतला. पण पाणीच लागले नाही. त्यामुळे निराश झालो. तरीपण जिद्द सोडली नाही. सुमारे ४० हून अधिक बोअरवेल शेतात मारल्या. जमवलेले काही लाख रुपये त्यात खर्च केले. अखेर प्रयत्नांना यश आलं. दोन बोअर्सना पाणी लागलं. आनंद झाला. पण हे पाणी कायमस्वरुपी टिकेल का याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे स्वःखर्चातून शेततळे उभारण्याचे ठरवले. बोअरचे पाणी त्यामध्ये साठवून शेतीला ते देण्याचे नियोजन केले आहे.
राजेंद्र यांनी आपली कथा विषद केली.

ज्ञानाची देवाणघेवाण

आज सुमारे आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून मुचंड्डी डाळिंबाच्या शेतीत स्थिरस्थावर झाले आहेत.
परिसरातील मित्र मंडळी त्यांच्या शेतात एकत्र येतात. व्यवस्थापनाबाबत सविस्तर चर्चा होते.
कोणत्या बहारात काय दर मिळतो, कोणत्या व्यापाऱ्याकडे विक्री करायची अशा चर्चा होतात.
पाणी, खत व्यवस्थापन हेदेखील त्यात विषय असतात. आज मुचंड्डी दरवर्षी मृग बहारातील डाळिंब घेतात. उशिरा हस्त बहार घेण्यासंबंधीचा प्रयोगही त्यांनी ॲग्रोवनमध्ये वाचला. त्यानुसार आटपाडी तालुक्‍यातील प्रगतशील शेतकऱ्यांची भेट घेऊन अधिक माहिती घेणे पसंत केले. अभ्यास करून हादेखील प्रयत्न यंदा केला आहे. आपल्या शेतीतील जडणघडणीत ॲग्रोवन व मित्रपरिवार यांचा मोलाचा वाटा असल्याचे ते सांगतात. आज दीड एकरातील डाळिंब हेच त्यांचे पैसे देणारे पीक आहे. जोडीला
खरीप, रब्बी हंगामातील पिके असतातच.

अलीकडील वर्षांतील उत्पादन (एकूण क्षेत्रातील) व दर (प्रति किलो)
सन २०१७ - साडेपंधरा टन.......७० रु.
सन २०१६ - १४ टन..... ५० रु.
सन २०१५ - १० टन ६५ रु.

 

अनेक वर्षे झोपडीत राहिलो. मजुरी केली. आता स्वतःची बाग कसतो. पाण्याचा आधार झाला आहे. शेततळे उभारले आहे. पक्के घर बांधले आहे. दोन टू व्हीलर्स घेतल्या आहेत. कुटुंबाला सुस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. समाधान कमावले आहे. तेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. शेतीत कधी नफा तर कधी तोटा होत असतोच. पण आपण न थांबता पुढे जात राहिले पाहिजे.
- राजेंद्र मुचंड्डी - ९७६४६०५३२१

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
अंडी उबवण केंद्राद्वारे बचत गट होताहेत...पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
शेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...
ग्रामीण आरोग्यासोबत जपला शेतकरी...देशात सशक्‍त आणि आरोग्यसंपन्न पिढी घडावी, या...
दुष्काळात दोनशे टन मूरघास निर्मितीतीन भावांत मिळून शेती फक्त वीस गुंठे. पण...
योग्य व्यवस्थापन ठेवले केळीशेतीत सातत्य...परसोडी (ता. कारंजा घाडगे, जि. वर्धा) हे पाण्याची...
प्रयोगशीलतेचा वसा जपुनी दुष्काळाला...नाशिक जिल्ह्यातील पेठ हा आदिवासी, दुर्गम तालुका....
शून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...
उत्तम नियोजनामुळेच दुष्काळातही तरलो काही काळ दुष्काळाचा येणारच याचा अंदाज बांधून आडूळ...
काटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...
शेवग्याच्या नैसर्गिक शेतीने दुष्काळातही...जळगाव जिल्ह्यातील पहूर (ता. जामनेर) येथील वयाची...
वसुंधरा करताहेत स्वच्छता अन्..."क्‍लीन टू ग्रीन" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...
जिद्दीतून उभा केला गीर दूध व्यवसायएकसळ (जि. सातारा) येथील विनोद शेलार या तरुणाने...
दुष्काळात रेशीम ‘चॉकी’ सेंटरने दिली...सततची दुष्काळी परिस्थिती, गारपीट, बाजारभाव यांची...
फायदेशीर ठरला जैव कोळसानिर्मिती उद्योग शेतातील काडीकचरा, भुस्सा आदींच्या प्रक्रियेतून...
तंजावूरच्या अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान...शेतीमाल दरांतील सातत्याच्या चढ-उतारांमुळे...
उपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव जातेगाव (ता. शिरूर) पुणे हे उपक्रमशील व प्रयोगशील...