Agriculture stories in Marathi, rejuvanation of old orchard , Agrowwon, Maharashtra | Agrowon

पुनरुज्जीवनानंतर फळबागांचे व्यवस्थापन
शशांक भराड, प्रवीण देशमुख
रविवार, 31 डिसेंबर 2017

फळबागांचे पुनरुज्जीवन करताना, तसेच त्यानंतरही बागांची काळजी घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे छाटणीनंतर योग्य पद्धतीने झाडांचा विकास होण्यास मदत होते.

पुनरुज्जीवन करताना डिसेंबर- जानेवारी किंवा एप्रिल-मे 
महिन्यात झाड निवडावे. त्यानंतर पुढीलप्रकारे नियोजन करावे. 

पुनरुज्जीवन करताना घ्यावयाची काळजी 

फळबागांचे पुनरुज्जीवन करताना, तसेच त्यानंतरही बागांची काळजी घेणे आवश्‍यक असते. त्यामुळे छाटणीनंतर योग्य पद्धतीने झाडांचा विकास होण्यास मदत होते.

पुनरुज्जीवन करताना डिसेंबर- जानेवारी किंवा एप्रिल-मे 
महिन्यात झाड निवडावे. त्यानंतर पुढीलप्रकारे नियोजन करावे. 

पुनरुज्जीवन करताना घ्यावयाची काळजी 

  • निवडलेल्या झाडाला जमिनीवरून २.५ ते ३ मीटर उंचीवर काप देण्यासाठीचा भाग पांढऱ्या खडूने चिन्हांकित करावा.
  • चिन्हांकित केल्यावर पृष्ठभागावर करवतीच्या सहाय्याने काप द्यावा. काप देताना झाडांच्या खोडावर व सालीला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • काप दिलेल्या पृष्टभागावर बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावी. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.

पुनरुज्जीवन केल्यानंतर करावयाचे व्यवस्थापन 

  • पुनरुज्जीवन केलेल्या झाडांची व्यवस्थित सर्व बाजूंनी वाढ होणे आवश्‍यक असते. त्यासाठी नवीन आलेल्या फुटव्यांची तात्पुरती छाटणी करावी. बागेत नांगरणी करून झाडाभोवती सिंचनासाठी आळे तयार करावे.
  • प्रतिझाड चांगले कुजलेले शेणखत ३० ते ४० किलो याप्रमाणात द्यावे. नवीन पालवीची उगवण होण्यासाठी गरजे इतक्या पाणीपुरवठ्याची उपलब्धता करावी.
  • फळ झाडांच्या आजूबाजूने १०० मायक्रॉन जाडीच्या काळ्या प्लॅस्टिकच्या कागदाचे आच्छादन करावे.
  • जुन - जुलै महिन्यात नवीन आलेल्या फुटव्यांपैकी मोजकेच फुटवे वाढू द्यावेत. बाकीच्या फुटव्यांची तात्पुरती छाटणी करावी. 
  • सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात उगवलेल्या जोमदार फुटव्यांची काळजी घेऊन बाकीच्या अनुत्पादक फुटव्यांची छाटणी करावी.
  • छाटणी केलेल्या नवीन उत्पादनक्षम फुटव्यांची दोन वर्षांपर्यंत काळजी घ्यावी. योग्यप्रमाणात अन्नद्रव्य व पाणीव्यवस्थापन करावे. तसेच कीड- रोगांपासून संरक्षण करावे. फुटव्यांना दोन वर्षे कालावधीनंतर फळधारणेस सुरवात होते. 

संपर्क : शशांक भराड, ९६५७७२५७११
(उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख 
कृषी विद्यापीठ, अकोला)

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...
कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी...नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार...
रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे...नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाख टन खते उपलब्ध...पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली...
अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे... अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत...
मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या... औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत...
परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४०... परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या...
परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे... परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगरमधील २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना... नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर...
नाशिक विभागातील ११०० गावांची "जलयुक्त... नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी...
सार कसं सामसूम तरंग नाही तलावात...शेती कोरडवाहू. तरीही स्वबळावर दुग्ध व्यवसायातून...
बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ‘पॉक्‍सो’ कायद्यात...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...