शेती, शिक्षण अन् आरोग्यावर भर

शोषखड्डायुक्त तसेच गटारमुक्त गाव करण्याचा निर्धार करत कराड तालुक्‍यात सांडपाणी व्यवस्थापनामध्ये आम्ही आघाडीवर आहोत. किरपे गाव आता निर्मल व हागणदारीमुक्त होत आहे.
उपक्रम सरपंचांचे
उपक्रम सरपंचांचे
नागपूर येथे झालेल्या अॅग्रोवन सरपंच महापरिषदेतून मला ग्रामविकासाच्या विविध संकल्पना समजल्या. ग्रामविकासाठी नेमके कसे नियोजन करायचे याची माहिती महापरिषदेतील विविध तज्ज्ञ तसेच प्रयोगशील सरपंचांकडून मिळाली. सरपंचपदाची जबाबदारी आल्यावर सुरवातीच्या काळात बऱ्याच गोष्टी कशा पद्धतीने राबवयाच्या हे अवगत नव्हते.        सरपंचपदाचा गावाच्या विकासासाठी उपयोग झाला पाहिजे, या दृष्टीने नावीन्यपूर्ण काहीतरी करायचे हा ध्यास घेऊन कामास सुरवात केली.  मी पहिल्यांदा गावातील लोकांचे आरोग्य आणि सांडपाणी व्यवस्थापनाविषयी काम हाती घेतले. उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन गाव गटारमुक्त करण्याचा निश्‍चय केला. पुर्वी गावामध्ये गटारे तुंबून राहात होती. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधी यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. हे लक्षात घेऊन मनरेगांतर्गत ८० व लोकसहभागातून ३० असे एकूण ११० शोषखड्डे घेतले. यामुळे अस्वच्छतेच्या प्रश्नावर मात करता आली. शोषखड्डायुक्त तसेच गटारमुक्त गाव करण्याचा निर्धार करत कराड तालुक्‍यात सांडपाणी व्यवस्थापनामध्ये आम्ही आघाडीवर आहोत. किरपे गाव आता निर्मल व हागणदारीमुक्त होत आहे. 
शिक्षण, शेतीविकासाला प्राधान्य ः 
सरपंच महापरिषदेमुळे ग्रामविकासाच्या दृष्टीने चार वर्षाचे नियोजन करता आले. लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी डिजिटल केली. या शाळांना ‘आयएसओ'' मानांकन मिळाले आहे. जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी पाच हजार लिटर क्षमतेची टाकी बांधली.       गावातील बहुतांशी कुटुंबे शेतीवर अवलंबून असल्याने शेतीविषयक प्रशिक्षणाचे अायोजन केले जाते. याचबरोबरीने आरोग्य शिबीर, स्त्रियांसाठी हिमोग्लोबीन, साखर, रक्तदाब तपासणी शिबिर गावामध्ये घेण्यात आले. गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी चार विद्युतपंप होते. यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात येत होते. यामुळे गावात जमा होणारा कर कमी पडत होता. यासाठी चार पैकी दोन पंप काढून त्याठिकाणी हातपंप बसवले. यामुळे वीज बिलामध्ये बचत झाली. या बचतीतून ज्येष्ठ नागरिकांसाठी गावामध्ये सर्वाजनिक ठिकाणी ३० सिमेंटची बाकडी बसवली आहेत. 
ग्राम सुधारणा, वृक्षारोपणावर भर ः 
दलितवस्ती सुधारणेंतर्गत साडेपाच लाखांचे क्राॅंक्रिटीकरण केले आहे. गावातील स्मशानभूमी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. चौदाव्या वित्त अयोगाच्या निधीतून आरोग्य, शिक्षण, उपजीविका, महिला व बालकल्याण, अनुसूचित जाती व इतर बाबीवरती आराखडा बनवला असून प्राधान्यक्रम ठेवून कामे सुरू आहेत. या निधीतून चारही वर्षी वृक्ष लागवड व संगोपनाबाबत तरतूद केली आहे.  पहिल्यावर्षी प्रत्येक कुटुंबास दोन झाडांचे वाटप केले. तसेच ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दुर्तफा २०० झाडांची लागवड केली आहे. यामुळे गावाच्या वैभवात भर पडली आहे. मनरेगांतर्गत नॅडेप, गांडूळखत प्रकल्प, विहिरी या योजनांचा गावासाठी पुरेपूर लाभ करून घेतला आहे. वीजबचतीसाठी एलईडी दिवे, मनरेगा अंतर्गत १२ शौचालये, एक किलोमीटर पाणंद रस्ते आदी कामे करण्यात आली आहेत.   
  महापरिषदेमध्ये ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करताना गावात वीजेसंदर्भात अडचण असली तर तर थेट फोन करण्याचे आवाहन सरपंचांना केले होते. आमच्या गावातील लोकवस्तीतून ११०० व्होल्ट क्षमतेची वीज वाहिनी गेली आहे. ही वीज वाहिनी धोकादायक असल्याने त्याचा मार्ग बदलण्याची आम्ही मागणी केली होती. आता ही वाहिनी बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.  
   संपर्क - संदीप माने, ९६८९००४२४३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com