पट्टा पद्धतीने बेणेप्रक्रीया करुन ऊस लागवड
पट्टा पद्धतीने बेणेप्रक्रीया करुन ऊस लागवड

ऊस पीक सल्ला

आडसाली ऊस : 

  • को - ८६०३२ या जातीसाठी माती परीक्षणानुसार प्रतिहेक्टरी ५०० किलो नत्र, २००किलो स्फुरद व २०० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. 
  • खतमात्रेपैकी १० टक्के नत्र (५० किलो) खताची तिसरी मात्रा १२ ते १६ आठवडे वयाच्या उसाला द्यावी. इतर जातींच्या उसाकरिता प्रतिहेक्‍टरी ४० किलो नत्राचा तिसरा हप्ता लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी द्यावा. 
  • नत्राची मात्रा देण्यासाठी निमकोटेड युरियाचा वापर करावा.
  • लागवडीस ६० दिवसांनी प्रतिहेक्‍टरी ५ लिटर मल्टिमॅक्रोन्यूट्रियंट (नत्र ८ टक्के, स्फुरद ८ टक्के व पालाश ८ टक्के) व मल्टिमायक्रोन्यूट्रियंट (ग्रेड-२) ५ लिटर या द्रवरूप खतांची प्रत्येकी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • लागवडीस ९० दिवस झाले असल्यास प्रतिहेक्‍टरी ७.५ लिटर मल्टिमॅक्रोन्यूट्रियंट व ७.५ लिटर मल्टिमायक्रोन्यूट्रियंटची प्रत्येकी ७५० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • लागवडीवेळेस ॲसेटोबॅक्‍टर या जीवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केलेली नसल्यास लागवडीनंतर ६० दिवसांनी द्रवरूप ॲसेटोबॅक्‍टर जीवाणू संवर्धक १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • पूर्वहंगामी ऊस : 

  • लागवडीची पूर्वतयारी करावी.
  • लागवड २० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
  • लागवडीसाठी को - ९४०१२, को- ८६०३२, को.एम - ०२६५, को.व्ही.एस.आय. - ९८०५ आणि एस.आय. - ४३४ या जातींची निवड करावी.
  • लागवडीवेळी प्रतिहेक्‍टरी ३४ किलो नत्र, ८५ किलो स्फुरद आणि ८५ किलो पालाश अशी खते द्यावीत. को- ८६०३२ या जातीसाठी लागवडीवेळी प्रतिहेक्‍टरी ४० किलो नत्र द्यावे. खते सरीमध्ये देऊन मातीआड करावीत.
  • पाणीबचतीसाठी मध्यम जमिनीत ७५ ते १५० सें.मी. पट्टा पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ७५ सें.मी. अंतराच्या जोड ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडावी. सलग पद्धतीने लागवडीसाठी हलक्‍या जमिनीत ९० सें.मी., मध्यम जमिनीत १०० सें.मी. तर भारी जमिनीत १२० सें.मी. एवढे दोन सऱ्यांतील अंतर ठेवावे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
  • बटाटा, कोबी, प्लॉवर, वाटाणा, कांदा व लसूण या आंतरपिकांची लागवड करावी.
  • तण नियंत्रण :

  • लागवडीनंतर३-५ दिवसांत वाफसा येताच हेक्‍टरी ॲट्राझीन ५ किलो किंवा मेट्रिब्यूझीन १.५ किलो प्रति १००० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फवारणी करताना जमीन तुडवली जाणार नाही याची काळजी घ्यावी.
  • कीड नियंत्रण :

  • लोकरी मावाग्रस्त उसावर मित्रकीटक असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. लोकरी माव्यासाठी डिफा मायक्रोमस यांसारख्या मित्रकीटकांचे संवर्धन करावे. 
  • रासायनिक खतांची संतुलित व शिफारशीत मात्रा वापरावी. पिकास जास्त प्रमाणात पाणी दिले जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • बेणेप्रक्रिया : 

  • मॅलॅथिऑन ३०० मि.लि. किंवा डायमेथोएट २६५ मि.लि. अधिक कार्बेन्डाझिम१०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. लागवडीपूर्वी या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवावे.
  • रासायनिक बेणेप्रक्रियेनंतर ॲसेटोबॅक्‍टर १० किलो किंवा द्रवरूप ॲसेटोबॅक्‍टर १ लिटर अधिक स्फुरद विरघळविणारे जीवाणू संवर्धक १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बेणे ३० मिनिटे बुडवावे. त्यानंतर लागवड करावी.
  • संपर्क :  डॉ. प्रमोद चौधरी, ८२७५५६३५८० (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com