सूर्यफूल हे योग्य आंतरपीक

 सुर्यफुल सर्वसमावेशक पीक पद्धती
सुर्यफुल सर्वसमावेशक पीक पद्धती

आंतरपीक पद्धती : जर मुख्य पिकाचा कालावधी १२० ते १४० दिवसाचा असेल तर ७५ ते १०० दिवसांचा कालावधी असलेले सूर्यफूल हे योग्य आंतरपीक आहे.

कार्यक्षम आंतरपीक पद्धती :

आंतरपीक ओळींचे प्रमाण
सूर्यफूल + तूर   ३ः३ किंवा २ः२
सूर्यफूल + सोयाबीन     १ः२
सूर्यफूल + भुईमूग   १ः३ किंवा २ः६
सूर्यफूल + मूग      १ः३

क्रमिक पीक पद्धती : 

  • जिरायती क्षेत्रात सोयाबीन-सूर्यफूल, डाळवर्गीय पीक-सूर्यफूल व सूर्यफूल-हरभरा.
  • बागायती क्षेत्रात भुईमुग-सूर्यफूल-तीळ, कापूस-सूर्यफूल, तूर-सूर्यफूल व ज्वारी-सूर्यफूल.
  • दुबार पीक पद्धती 

    सुर्यफुल पिकाचा समावेश असलेली दुबार पीक
    विभाग प्रकार    खरीप रब्बी उन्हाळी
    विदर्भ जिरायती ज्वारी सूर्यफूल -- 
    विदर्भ जिरायती कडधान्ये सूर्यफूल -- 
    विदर्भ जिरायती सूर्यफूल करडई -- 
    विदर्भ जिरायती सूर्यफूल हरभरा -- 
    विदर्भ बागायती  कापूस सूर्यफूल -- 
    विदर्भ बागायती ज्वारी    सूर्यफूल -- 
    विदर्भ बागायती भुईमूग  सूर्यफूल -- 
    मराठवाडा जिरायती सोयाबीन सूर्यफूल -- 
    मराठवाडा जिरायती कडधान्ये सूर्यफूल  -- 
    मराठवाडा जिरायती सूर्यफूल  हरभरा  -- 
    मराठवाडा बागायती भुईमूग  सूर्यफूल तीळ 
    मराठवाडा बागायती कापूस  सूर्यफूल  तीळ 
    मराठवाडा बागायती तूर सूर्यफूल तीळ  
    मराठवाडा बागायती  ज्वारी सूर्यफूल तीळ 
    मराठवाडा बागायती मका  घेवडा  सूर्यफूल 
    मराठवाडा बागायती सोयाबीन सूर्यफूल  सूर्यफूल 
    प. महाराष्ट्र जिरायती कडधान्ये  सूर्यफूल  -- 
    प. महाराष्ट्र जिरायती सोयाबीन सूर्यफूल -- 
    प. महाराष्ट्र बागायती कापूस सूर्यफूल --
    प. महाराष्ट्र बागायती सूर्यफूल भुईमूग --

    पीक फेरपालट : 

  • सूर्यफुलाचे पीक सतत व सलग एका जमिनीवर घेतल्यास त्या जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता भासते.  हे पीक रोगास बळी पडते, उत्पादनात हळूहळू घट येते.
  • सूर्यफूल लागवडीअगोदर जमिनीमध्ये तृणधान्ये किंवा कडधान्य पिकांची फेरपालट २ ते ३ वर्षांकरिता (प्रामुख्याने कडधान्ये पिकांनी) करावी.
  • भुईमूग किंवा सोयाबीननंतर सूर्यफूल पिकास उतारा चांगला मिळतो. 
  • पीक फेरपालट ही पद्धत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड नियंत्रणातील महत्त्वाचा घटक आहे. 
  • केवडा रोगाचे प्रमाण सलग सूर्यफूल पिकामध्ये जास्त आढळते, तर पीक फेरपालट असलेल्या जमिनीतील कमी किंवा आढळत नाही.
  • दुबार पीक पद्धतीमध्ये कडधान्यांचा समावेश केल्यास उत्पादनामध्ये वाढ होते.
  • दुबार पिके घेताना मागील पिकांच्या जमिनीतील शेष रासायनिक खतांचा विचार करून पुढील पिकाची रासायनिक खताची मात्रा ठरवावी.
  • सूर्यभूल-हरभरा या दुबार पीक पद्धतीमध्ये सूर्यफुलाची धसकटे जमिनीत गाडली तर त्याचा हरभरा पिकाच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत नाही.
  • खरीप हंगामात सूर्यफूल घेतले असेल तर रब्बी हंगामामध्ये करडई किंवा हरभरा किंवा गहू लागवड करावी.
  • खरिपात मूग किंवा उडीद पीक घेतले असेल तर रब्बीमध्ये सूर्यफुल लागवड करावी.
  • काढणी : 

  • उशिरा येणाऱ्या जाती १०० ते ११० दिवसांत तर लवकर येणाऱ्या जाती ९० ते १०० दिवसांत काढणीस तयार होतात.
  • पाने पूर्णपणे पिवळी झाली, फुलातील दाणे टणक व सुटे झाले की पीक काढणीस तयार झाले असे समजावे. फुलांच्या मागील भाग पिवळा पडतो.
  • फूल अधिक वाळल्यास बी गळून पडण्याचा संभव असतो. त्यासाठी झाडावरील पक्व फुले विळ्याने कापून एके ठिकाणी वाळत ठेवावीत.
  • मळणी :

  • फुले काढल्यानंतर २ ते ३ दिवस कडक उन्हात वाळवावीत. वाळलेली फुले काठीने बडवून किंवा चाळणीवर घासून किंवा मळणी यंत्राच्या साहाय्याने मळणी करावी.
  • उन्हात दोन दिवस बियाणे वाळवावे. बियाणातील ओलाव्याचे प्रमाण ९ ते १० टक्के इतके ठेवावे. त्यामुळे साठवण आणि उगवण शक्ती वाढते.
  • महात्मा कृषी विद्यापीठाने ‘फुले सूर्यफूल मळणी यंत्र’ विकसित केले आहे.
  • सरासरी उत्पादन : 

    जिरायती विभाग - १००० ते १२०० किलो/हेक्‍टर खात्रीचा पाऊसमान विभाग - १२०० ते १५०० किलो/हेक्‍टर बागायती क्षेत्र - २००० ते २५०० किलो/हेक्‍टर

    शेतकऱ्यांच्या परंपरागत तंत्रापेक्षा सुधारित तंत्राने मिळणारी उत्पादनातील सरासरी वाढ :

    सुधारित तंत्र   परंपरागत तंत्रावर सुधारित मिळणारी उत्पादनातील वाढ (%)
    सुधारित वाण   ३८
    शिफारस खत मात्र     २३
    शिफारस अंतर       ४२
    बीजप्रक्रिया       ९
    विरळणी      १६
    जैविक खते     १०
    तण नियंत्रण    २४
    पीक संरक्षण   २५
    गंधक व बोरॉनचा वापर   ३५

    तेल प्रक्रिया : 

    तेल काढण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी बियांमधील फोलपट काढून टाकणारे यंत्र म्हैसुरच्या अन्न तंत्रविज्ञान संस्थेने तयार केले आहे.

    आहारात उपयोग : 

  • तेलामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्व ‘अ’ आणि ‘ई’असते.
  • बियांत साधारणतः ३५ ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण. तेलामध्ये ६८ टक्‍के लिनोलिक आम्ल, तर २० ते ४० टक्के ओलिक आम्ल.
  • पेंडीचे उपयोग : 

  • मानवी खाद्य मिश्रणासाठी वापरतात. पेंडीचे पीठ तयार करता येते.
  • पेंडीमध्ये ४० टक्के प्रथिने आहारदृष्ट्या इतर प्रथिनांच्या तोडीची आहेत.
  • पेंडीत कोणताही अपायकारक घटक नाही. म्हणून याचा वापर मुख्यत्वे गाय, शेळी, मेंढी इत्यादी रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात करतात.
  •   बुंधा, पाने, फुलांच्या भुशाचा उपयोग :

  • सूर्यफूल झाडापासून मूरघास तयार करता येते. हा मूरघास जनावरे अत्यंत चवीने खातात.
  • वाळलेली बोंडे व झाडे जनावरे चवीने खातात.
  • झाडाचा बुंधा, पाने, फुलांच्या भुश्‍श्‍यापासून कंपोस्ट तयार करून पिकांना दिले तर नत्र, स्फुरद, पालाश इत्यादी अन्नद्रव्येउपलब्ध होतात. जमिनीचा पोत सुधारतो.
  • झाडाचा बुंधा, पानांच्या लगद्यापासून कागद तयार करतात.
  • बुंध्यातील गराचा उपयोग पार्सलचे खोके, शोभेचे छप्पर, बाटलीची बुचे इत्यादी उपयुक्त वस्तू बनविण्यासाठी केला जातो.
  • फुलांचा भुसा पशू व पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून वापरतात.
  • खोड व भुशापासून मिळणाऱ्या पेक्‍टिनमध्ये मिथॉक्‍सीलचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याला फळांपासून मिळणाऱ्या  पेक्‍टिनपेक्षा जास्त मागणी असते.
  • इतर उपयोग : 

  • औषधी वनस्पती म्हणून उपयोग. गराचा उपयोग बेंड, पुळीवर लेप देण्यासाठी करतात.
  • अंग मॉलिशसाठी सूर्यफूल तेलाचा वापर होतो.
  • सूर्यफुलामधील रसामुळे उंदरांना विषबाधा होते.त्यामुळे उंदीर नियंत्रणाकरिता याचा वापर होतो. 
  • मधमाशी पालनासाठी उपयुक्त
  • तेलाचा उपयोग रंग, वॉर्निश, प्लॅस्टिक वस्तू निर्मितीमध्ये होतो.
  • डिझेलबरोबर योग्य प्रमाणात सूर्यफुलातील अल्कोहोल व फरफ्युरलचे मिश्रण करून इंधन म्हणून उपयुक्तता तपासली जात आहे.
  • क्षेत्र आणि उत्पादन : 

  • २०००-०१ मध्ये देशातील लागवड क्षेत्र १०.७१ लाख हेक्‍टर, तर उत्पादन ६.५४ लाख टन, उत्पादकता ६०५ किलो प्रतिहेक्‍टरी.
  • सन २०११-१२ मध्ये लागवड क्षेत्र ५.१६ लाख हेक्‍टर होते. 
  • देशातील लागवड क्षेत्र :

  • लागवडीमध्ये कर्नाटक (४२ टक्के), आंध्र प्रदेश (२८ टक्के) व महाराष्ट्र (१३ टक्के) ही राज्ये आघाडीवर. या राज्यात  देशाच्या एकूण क्षेत्रापैकी ८३ टक्के क्षेत्र, तर ८० टक्के उत्पादन.
  • तमिळनाडू, हरियाना, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांतही लागवड वाढत आहे.
  • लागवडीतील समस्या : 

  • पीक फेरपालट, विरळणीचा अभाव.
  • असंतुलित रासायनिक खतांचा अभाव.
  • जल व मृदसंधारणाकडील दुर्लक्ष.
  • खरिपामध्ये फुलावस्थेमध्ये पडणारा पाऊस व ढगाळ हवामानामुळे बीजधारणा कमी.
  • उन्हाळ्यामध्ये परागकण अति तापमानामुळे सुकल्यामुळे बीजधारणा कमी.
  • बोंड अळी, रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव, त्यामुळे पसरणारा नेक्रॉसीस हा रोग उत्पादनात घट आणतो.
  • पक्ष्यांपासून नुकसान.
  • लवकर तयार होणाऱ्या कमी कालावधीच्या जातीचा अभाव. 
  • दर्जेदार व जातिवंत, भेसळरहित बियाण्याचा अभाव.
  • लागवडीस वाव : 

  • विविध हवामान विभाग तसेच माती प्रकारात पिकाची जुळवून घेण्याची क्षमता चांगली.
  • प्रकाश असंवेदनशीलता असल्यामुळे कोणत्याही हंगामामध्ये लागवड शक्‍य.
  • कमी कालावधीचे (७० ते १०० दिवस) पीक असल्यामुळे आपत्कालीन पीक नियोजनात उपयुक्त.
  • जास्तीत जास्त बियाणे व तेलाची उत्पादन क्षमता.
  • उत्कृष्ट प्रतीचे खाद्य तेल 
  • कमी बियाणे, साधी मशागत, कमी पाण्याची आवश्‍यकता यामुळे लागवड खर्चात बचत.
  • जास्त बियाणे पैदासीचा दर (१ः८०).
  • निश्‍चित व योग्य बाजारभाव. 
  • ठराविक वाढीचे, एक बोंडाचे व फांदी नसलेले पीक असल्यामुळे मातीमधून शोषलेल्या अन्नद्रव्यांचा अपव्यय टळतो.
  • डॉ. अनिल राजगुरू, संदीप कदम संपर्क : ०२१७- २३७३२०९ (लेखक अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com