जिरायती भागात वेळेवर करा पेरणी
डॉ. भगवान आसेवार, एम. एस. पेंडके
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. योग्य वेळी पेरणी केल्यामुळे उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त उपयोग होऊन पिकांची जोमदार वाढ होते. 

जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. योग्य वेळी पेरणी केल्यामुळे उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त उपयोग होऊन पिकांची जोमदार वाढ होते. 

रब्बी पिकांची पेरणी केल्यानंतर पाऊस पडण्याची खात्री नसते. बियाण्यांची उगवण क्षमता ओलाव्यावर अवलंबून असते.  खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बी पिकांसाठी पूर्वमशागत करताना वखरणी अथवा नांगरणी जास्त प्रमाणात केल्यास जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे रब्बी पिकांची उगवण, वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादन घटते. त्यामुळे पूर्वमशागतीची कामे करताना पृष्ठभागातील ओलावा जास्त प्रमाणात कमी होणार नाही.

  • रब्बी पिकांच्या दृष्टीने कार्यक्षम जलसंधारणाच्या उपायामध्ये शक्‍यतो जमिनीचा पृष्ठभाग भुसभुशीत करून अथवा सरीसदृश उपचाराचा उपयोग करून, खरीप हंगामात पडणाऱ्या विशेषतः उशिरा पडणाऱ्या पावसाचे परिणामकारकरीत्या मूलस्थानी संधारण करावे. 
  • उभ्या पिकातील जलसंधारणाच्या उपायाशिवाय रब्बी हंगामासाठी खास राखून ठेवलेल्या क्षेत्रात बळीराम नांगराने उभी-आडवी मशागत करावी. त्यानंतर क्षेत्र तणविरहित व भुसभुशीत राखण्याकरिता वखराच्या एक-दोन हलक्‍या पाळ्या द्याव्यात. जलसंधारणाकरिता हे उपयुक्त ठरते.
  • सपाट अथवा कमी उताराच्या भारी जमिनीत रब्बी पिकांच्या पेरणीपूर्वी १०x१० मीटरचे चौरस वाफे करून त्यामध्ये पेरणी करावी. मध्यम उताराच्या जमिनीवर ५ ते १० मीटर अंतरावर बैलचलित रिजरने आडवी जलसंधारण सरी काढून दोन सरींमधील भागात पेरणी करावी. जलसंधारण, उत्पादनवाढीस त्याची मदत होते. 

योग्य वेळी पेरणी : 

  • योग्य वेळी पेरणी केल्यामुळे उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्ये आणि इतर साधनांचा जास्तीत जास्त उपयोग होऊन पिकांची जोमदार वाढ होते. अधिक उत्पादन मिळते. 
  • योग्य वेळी पेरणी केलेल्या पिकांवर रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. 
  • ब्बी ज्वारीची पेरणी सप्टेंबरच्या शेवटचा आठवडा ते ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपवावी. 
  • करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात संपवावी. हरभरा पेरणी ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी.
  • सध्याच्या कालावधीत पाऊस एकसारखा सुरू असेल आणि जमिनीमध्ये पेरणी योग्य परिस्थिती नसेल, तर अशा परिस्थितीत रब्बी हंगामातील पिकांची पेरणी ३० ऑक्‍टोबरपर्यंत करता येते.

जमिनीच्या प्रकारानुसार पिके व पीकपद्धती

जमीनीचा प्रकार खोली (सें.मी.) उपलब्ध ओलावा (मि.मी.) पीकपद्धती
मध्यम
 
२२.५ - ४५ ६०-६५ सूर्यफुल, करडई
मध्यम खोल

१)४५-६० 

२) ६०-९०

८०-९० 

१४०-१५०

रब्बी ज्वारी, करडई, 
रब्बी ज्वारी+ करडई (६ः३) आंतरपीक 
रब्बी ज्वारी, करडई, हरभरा 
रब्बी ज्वारी+करडई (६ः३) 
करडई+हरभरा (६ः३) 
खोल ९०पेक्षा जास्त १६० पेक्षा जास्त रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पिके तसेच मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन (खरीप) नंतर रब्बी ज्वारी, करडई, हरभरा लागवड करावी.
सुधारित आणि संकरित जाती
पीक सुधारित/ संकरित जाती
रब्बी ज्वारी मालदांडी ३५-१, एसपीव्ही-६५५, एसपीव्ही-८३९, फुले यशोदा (एसपीव्ही-१३५९), परभणी मोती (एसपीव्ही-१४११), स्वाती (एसपीव्ही-५०४) 
सूर्यफूल मॉर्डन, एससीएच-३५, ई.सी.६८४१४, सिद्धेश्‍वर (एल.एस.- ११)
करडई भीमा, शारदा, तारा, एन-६२-८, नारी-६, पीबीएनएस-१२ 
हरभरा विजय, बीडीएन-९-३, विशाल जी-४, जी-१२, आयसीसीव्ही - २ 

डॉ. भगवान आसेवार : ९४२००३७३५९, 
एम. एस. पेंडके : ९८९०४३३८०३

(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफी योजनेस प्रारंभ...राज्य सरकारची...मुंबई : कर्जमाफी देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या...
वाढत्या लोकसंख्येसाठी व्हर्टिकल फार्म...भारतासारख्या उच्च लोकसंख्या असलेल्या देशांसाठी...
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...