Agriculture stories in Marathi, timely sowing of rabbi crops, Maharashtra | Agrowon

योग्य वेळेत करा रब्बी पिकांची पेरणी
डॉ. आनंद गोरे, डॉ. गणेश गायकवाड
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

रब्बी पिकांची जिरायती आणि बागायती क्षेत्रात योग्य कालावधीत लागवड करावी. लागवड करताना जल-मृद संधारणाच्या उपाययोजना कराव्यात. शिफारसीत खतमात्रा द्यावी. सुधारित यंत्राने लागवड करावी.

रब्बी पिकांची जिरायती आणि बागायती क्षेत्रात योग्य कालावधीत लागवड करावी. लागवड करताना जल-मृद संधारणाच्या उपाययोजना कराव्यात. शिफारसीत खतमात्रा द्यावी. सुधारित यंत्राने लागवड करावी.

रोपांची प्रतिहेक्‍टरी योग्य संख्या असणे हे जिरायती शेतीत उत्पादनवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यासाठी बियाण्यांचे योग्य प्रमाण व योग्य अंतरावर पेरणी करावी.  पेरणी योग्य खोलीवर आणि पुरेशा ओलाव्यात केल्यास उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. याकरिता पिकाप्रमाणे शिफारस करण्यात आलेले बियाण्याचे प्रमाण व रोपांच्या दोन ओळीतील अंतर ठेवण्यात यावे.
रासायनिक खतांचा वापर :

  • जिरायती परिस्थिती रासायनिक खतांची उपयोगिता, रासायनिक खते कशा पद्धतीने दिली, यावर अधिक अवलंबून असते. त्यासाठी रासायनिक खते रब्बी हंगामातील पूर्वमशागत झाल्यावर, पेरणीपूर्वी १ किंवा २ दिवस अगोदर सुधारित तिफणीच्या मदतीने १२ ते १५ सेंमी खोलीवर पेरून द्यावी. 
  • रासायनिक खते पुरेशा ओलीत पडून ती पिकाला जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतात.

बियाण्यांची खोल पेरणी :

  • पावसाचे प्रमाण कमी असल्यास पृष्टभागावरील जमिनीत ओलाव्याचे प्रमाण कमी असते. परंतु जमिनीतील खालच्या थरात पुरेशा प्रमाणात ओलावा असतो. 
  • रब्बी पिकांची पेरणी ८ ते १० सेंमी एवढी खोल करावी. म्हणजे बी चांगल्या ओलीत पडून उगवण चांगली होते. अशा पद्धतीची खोल पेरणी करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सुधारित तिफण तयार केली आहे. या तिफणीने बी १० ते १२ सेंमी खोल पेरता येते. तसेच १५ सेंमी खोलीपर्यंत रासायनिक खते पेरून देता येते.

सुधारित पीकपद्धती :
रब्बी ज्वारी+करडई 

  • ही आंतरपीक पद्धती ज्या क्षेत्रात रब्बी ज्वारी मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, अशा क्षेत्रासाठी शिफारस करण्यात आलेली आहे. 
  • वातावरणातील उष्णतामानाच्या तफावतीमुळे ज्वारी अथवा करडई सलग पिकात येणारी घट आंतरपीक पद्धतीत कमी होऊन उत्पादनात स्थिरता येते. 
  • ही आंतरपीक पद्धत ६ः३ या ओळीच्या प्रमाणात शिफारस करण्यात आलेली आहे. इतर शिफारशी ज्वारीच्या सलग पीकपद्धतीसारख्याच आहेत.

करडई+हरभरा :

  • मध्यम ते भारी जमिनीसाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस करण्यात आलेली आहे. 
  • ४ः२ अथवा ६ः३ ओळीच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती घेतल्यास जास्त फायदा होतो.
पिकनिहाय पेरणीची वेळ
पीक     पेरणीचा योग्य कालावधी
रब्बी ज्वारी ३० सप्टेंबर ते २० ऑक्‍टोबर
सूर्यफूल     २० सप्टेंबर ते १० ऑक्‍टोबर
करडई     ३० सप्टेंबर ते १० ऑक्‍टोबर
हरभरा     ३० सप्टेंबर ते २० ऑक्‍टोबर
जवस     २० सप्टेंबर ते १० ऑक्‍टोबर

 संपर्क : डॉ. आनंद गोरे - ९५८८६४८२४२
(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर अॅग्रो विशेष
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
हरवले जलभान कोनाड्यात‘नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’...
मोदी लाटेचे गारुडसतराव्या लोकसभेचे भवितव्य स्पष्ट झालेले आहे. खरे...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
चंदन लागवडचंदन मध्यम उंच आणि परोपजीवी प्रजाती आहे....
हुमणीच्या प्रौढ भुंगे­ऱ्यांचा सामुदायिक...गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये हुमणी अळीचा...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
जलदारिद्र्य निर्देशांकातही आपली पिछाडीचएखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार...
पांढऱ्या सोन्याची काळी कहाणीजागतिक पातळीवर कापसाखाली असलेल्या क्षेत्राच्या एक...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...