Agriculture stories in Marathi, treatment to improve milk shelf life , Agrowon ,Maharashtra | Agrowon

दुधाची टिकवण क्षमता वाढीसाठी अत्याधुनिक प्रक्रिया
संतोष चोपडे, प्रशांत वासनिक, नीळकंठ पवार
सोमवार, 27 नोव्हेंबर 2017

स्पोअर्स आणि जिवाणूंमुळे दूध लवकर खराब होते. उष्ण कटिबंधामध्ये लवकर दूध खराब होत असल्याने नुकसानही मोठे असते. ते टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. 

स्पोअर्स आणि जिवाणूंमुळे दूध लवकर खराब होते. उष्ण कटिबंधामध्ये लवकर दूध खराब होत असल्याने नुकसानही मोठे असते. ते टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे. 

दुध व दुग्धजन्य पदार्थ हे भारतीयांच्या आहारातील अविभाज्य घटक आहेत. १५५.५ दशलक्ष टन दूध (१९ टक्के) उत्पादनासह भारताचा जागतिक पातळीवर प्रथम क्रमांक लागतो. भारत सरकारने २०२३-२४ आर्थिक वर्षापर्यंत दुग्ध उत्पादन ३०० दशलक्ष टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. खासगी कंपन्यांद्वारे ३० टक्के दूध प्रक्रियेमध्ये येते, उर्वरित दूध हे असंघटित क्षेत्र वापरते. देशातील एकूण दूध उत्पादनापैकी ५४ टक्के दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात, तर उर्वरित ४६ टक्के दुधाची द्रवरूपात विक्री होते. या दुधाच्या साठवणीचा कालावधी अत्याधुनिक प्रक्रियांद्वारे ३० ते ९० दिवसांपर्यंत वाढवता येते.

दूध टिकविण्यासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या पद्धती : 

  • सामान्यतः पाश्चरायझेशन (होमोजिनेशन प्रक्रियेसह किंवा विना) अतिउच्च तापमानावर प्रक्रिया केली जाते. पाश्चरायझेशन प्रक्रियेदरम्यान दुधाला ७२ अंश सेल्सिअस तापमानामध्ये १५ सेकंद तापवतात. त्यामुळे हानिकारक जिवाणूंचा नाश होतो. दूध ५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये कमाल ७ दिवसांपर्यंत टिकू शकते. मात्र, भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून, वाहतुकीदरम्यान होणाऱ्या तापमानातील बदलामुळे दुधाची टिकवणक्षमता कमी होते.
  • १३० ते १४० अंश सेल्सिअस या अतिउच्च तापमानावर अर्धा ते दोन सेकंदांपर्यंत दूध तापवणे. या प्रक्रियेत दुधातील सर्व सूक्ष्मजीव नष्ट होतात. दूध रेफ्रिजरेशनशिवाय सहा महिन्यांपर्यंत राहू शकते. मात्र, अतिउष्णतेमुळे दुधाची चव (जळका वास) बदलते, काही प्रमाणात दुधातील जीवनसत्त्वे नष्ट होतात. परिणामी हे दूध भारतीय बाजारपेठेत तितकेसे यशस्वी झाले नाही.

टिकवणक्षमतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान :
दुधाची टिकवणक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे चवीमध्ये कोणताही बदल न होता दुधाची टिकवणक्षमता ३० ते ९० दिवस (४ अंश सेल्सिअस) आणि २१ ते ३० दिवस (८ अंश सेल्सिअस) वाढवता येते. 

दूधप्रक्रियेसाठी अत्याधुनिक पद्धती : 

  • अप्रत्यक्ष उष्णता प्रक्रिया : उष्णतेच्या वहनासाठी नळ्या किंवा प्लेटचा वापर. उष्णता १२५ अंश सेल्सिअस. १-३ सेकंद.
  • प्रत्यक्ष उष्णता प्रक्रिया : वाफेचा प्रवाह त्यात सोडणे. १२५ अंश सेल्सिअस. १-३ सेकंद.
  • सूक्ष्म गाळण यंत्रणा (मेम्ब्रेन प्रक्रियेद्वारे) : मेम्ब्रेन छिद्राचा आकार ०.८ ते १.२ मायक्रॉन. तापमान ९० ते ११० अंश सेल्सिअस. ३ ते ४ सेकंद.
  • विलगीकरण यंत्राच्या साह्याने सूक्ष्मजीव दुधापासून वेगळे करणे. त्यासाठी दोन सेपरेटर्स व ७४ अंश सेल्सिअस तापमान. १५ ते ३० सेकंद.
  • वरीलपैकी मेम्ब्रेन प्रक्रिया आणि विलगीकरण यंत्राचा वापर 

म्हशीच्या दुधासाठी मोठ्या प्रमाणात होतो. त्याविषयी अधिक माहिती घेऊ.
सूक्ष्म गाळण यंत्रणा (मेम्ब्रेन प्रक्रिया) : 
याला मायक्रो फिल्ट्रेशन असे म्हणतात. यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उष्णता प्रक्रियेच्या तुलनेमध्ये कमी हाताळणी होते. सेपरेटरद्वारे दुधातील मलई वेगळी केली जाते. त्यानंतर सूक्ष्म गाळण यंत्रणेतून (मेम्ब्रेनमधून) पाठवले जाते. त्यामुळे ९९.५ टक्के दुधातील सूक्ष्मजीव वेगळे केले जातात. त्यानंतर मलई ९० ते ११० अंश सेल्सिअस तापमानाला ५ ते ६ सेकंदांसाठी तापविली जाते. यानंतर मलई व मलईविरहित दूध योग्य प्रमाणात एकत्र करून प्रमाणित दूध बनवतात. त्यानंतर त्यावर होमोजनायझेशन आणि पाश्चरायझेशन प्रक्रिया करून ५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड करतात. हे थंड दूध स्वच्छ वातावरणात पॅक करतात.  

विलगीकरण यंत्राद्वारे दुधातील सूक्ष्मजीव वेगळे करणे : 
दुधापासून स्पोअर्स व सूक्ष्मजीव वेगळे करण्यासाठी विलगीकरण यंत्राचा (सेपरेटरचा) वापर केला जातो. विलगीकरण यंत्राच्या २० हजार फेरे प्रतिमिनिट या वेगामुळे सूक्ष्मजीव व स्पोअर्स (अधिक घनता) दुधापासून वेगळे केले जातात. हे प्रक्रिया केलेले दूध पाश्चराइज्ड करून थंड केले जाते. प्रक्रियेनंतर दूध स्वच्छ वातावरणात पॅक करतात.

 
दूध प्रक्रिया

प्रक्रिया      तापमान (अंश सेल्सिअस)     वेळ 
(सेकंद)  
टिकवण क्षमता 
(शेल्फ लाइफ)
पाश्चराइज्ड     ७२     १५    ७ दिवस (५ अंश से.)
अतिउच्च तापमान     १३५ ते १५०    ०.५ ते ४    ४ ते ६ महिने (पॅकिंग)
स्टरलाइजेशन    ११० ते १२०     ६०० ते १८००     ६ ते १२ महिने (पॅकिंग)

वरील अत्याधुनिक प्रक्रियांमुळे गायींसह म्हशींच्या दुधाची साठवण अधिक करणे शक्य होते. अगदी एक दिवसाचा साठवण कालावधी वाढल्यास लाखो लिटर दूध वाहतुकीवरील ताण कमी होतो. खर्चात बचत होते. विक्रीच्या संधी वाढतात. एकूणच, दूध खराब होण्याचे प्रमाण कमी होते.

संपर्क : संतोष चोपडे, ९०११७९९२६६ 
(दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर जिल्हा लातूर)
 

टॅग्स

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उठलेला बाजारसंसदेचे आणि राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन...
न्यायाच्या प्रतीक्षेत आदिवासी शेतकरी राज्यातील आदिवासी भागात लाखो शेतकरी आपल्या...
तूर, हरभरा खरेदीचे तीनतेरापुणे : राज्यात यंदाच्या हंगामात (२०१७-१८)  ...
सरकारी खरेदीच्या खेळखंडोब्यामुळे...पुणे : आधारभूत किमतीने शेतमाल खरेदीचा...
विदर्भात पोचली ‘एचटी’ची पाकिटे?नागपूर : गेल्या हंगामात पुरवठा झालेल्या अनधिकृत ‘...
तूर खरेदीत कर्नाटकची महाराष्ट्रावर आघाडीपुणे : तूर खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्र...
राज्य सहकारी संघ पदाधिकारी निवडणूक...पुणे  : महाराष्ट्र राज्य सहकारी संघ...
सरकारी खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी...राज्यात गेल्या वर्षी खरेदी केलेली तूर...
गोदाम नसल्यामुळे शेतीमाल खरेदीला ब्रेकराज्य सरकारने `नाफेड` या नोडल एजन्सीच्या...
शासकीय खरेदीचे दुखणे अन् भावांतराची...राज्यात यंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांतील...
उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना...नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी...
शेतीमाल खरेदीतील भ्रष्टाचार रोखणे आवश्यकपुणे : सरकारने हमीभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी...
तत्काळ चुकाऱ्याची केवळ घोषणाचअकोला ः या हंगामात हमीभावाने सुरू असलेली खरेदी...
तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी...
अन्नदात्यासाठी राज्यभरात ‘अन्नत्याग’पुणे ः राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येचा...
कृषिसेवक परीक्षा संशयास्पद; विद्यार्थी...पुणे : कृषिसेवक पदाच्या ९०३ जागांसाठी राज्यात...
उसाला निर्यातक्षम केळीची जोडसांगली जिल्ह्यातील तुंग हा उसाचा हुकमी पट्टा. या...
जगभरात अवशेषमुक्त मालालाच मागणीपुणे : निर्यातीत युरोपीय देशांप्रमाणे अन्य...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी :...नवी दिल्ली  : २०१९ मध्ये सत्तेत आल्यास...