Agriculture stories in Marathi, water conservation in Karathi village, AGROWON | Agrowon

काऱ्हाटीच्या रानमळ्यात पाण्याचा सुकाळ
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

काही महिन्यांपूर्वी प्यायलाच पाणी नव्हते. जनावरे जगवणे मुश्‍किल झाले होते. जनावरांना चाराही विकत आणावा लागत होता. मात्र हे चित्र आता बदलले आहे. सकाळ रिलीफ फंडातून सहा महिन्यांपूर्वी ओढा खोलीकरणाचे काम झाल्याने पाण्याचा सुकाळ झाला आहे, असे काऱ्हाटी रानमळा (ता. बारामती, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

काही महिन्यांपूर्वी प्यायलाच पाणी नव्हते. जनावरे जगवणे मुश्‍किल झाले होते. जनावरांना चाराही विकत आणावा लागत होता. मात्र हे चित्र आता बदलले आहे. सकाळ रिलीफ फंडातून सहा महिन्यांपूर्वी ओढा खोलीकरणाचे काम झाल्याने पाण्याचा सुकाळ झाला आहे, असे काऱ्हाटी रानमळा (ता. बारामती, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी सांगितले. 

पानसरेवाडीच्या शिवेपासून सुरू होणारा कण्हेरओढा गेल्या काही वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व विसरला होता. इथे ओढा आहे हे सांगावे लागत होते इतका उथळ झाला होता. त्यामुळे पावसाचे आलेले पाणी वरचेवर वाहून जात होते. परिणामी, विहिरी व कूपनलिकांना पाणी नव्हते. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते.

ओढा खोलीकरणापूर्वी या भागासाठी टॅंकरद्वारे पाणी घ्यावे लागत होते.
मात्र, सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशनने पोकलॅन यंत्र मोफत उपलब्ध करून दिले. लोकवर्गणीच्या जोडीला अजित पवार यांच्याकडून निधी मिळाल्याने सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या ओढ्याचे पात्र खोल व रुंद झाले. ओढ्याचे पुनरुज्जीवन झाल्याने पाऊस झाला की पाणी मुरू लागले. त्यामुळे परिसरातील भूजल पातळी वाढली, अशी माहिती येथील शेतकऱ्यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या पावसामुळे खोलीकरण केलेल्या ओढ्यात पाणीसाठा झाला आहे. पात्राच्या दुतर्फा सुमारे अर्धा किलोमीटरच्या अंतरावरील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पात्रालगतच्या विहिरी पूर्ण भरल्या आहेत. सहा महिन्यांपासून जनावरांच्या चाऱ्याची पिके व अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ओढा खोलीकरणाचे काम झाले नसते तर आज पाणीटंचाईला आम्हाला सामोरे जावे लागले असते, अशी माहिती राजेंद्र राऊत, सचिन शिंदे यांनी दिली. 

इतर बातम्या
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
विदर्भातील संत्रा पट्ट्यात आंबिया...नागपूर ः विदर्भातील वाढत्या तापमानाचा संत्रा...
सांगलीत ९९ लाख क्विंटलवर साखर उत्पादनसांगली : जिल्ह्यातील सोळा साखर कारखान्यांनी ८२...
पाणीटंचाईमुळे पुणे जिल्ह्यातील ३६...पुणे   : उन्हाच्या झळा वाढत असल्याने...
जत तालुक्यात बेदाणा उत्पादनात ३५ टक्के...सांगली : पावसाळ्यात पावसाची दडी, परतीच्या पावसाचा...
जनावरांच्या छावणीत बांधली गेली ‘...नगर : दुष्काळ पाचवीलाच पूजलेला, पिण्याचे पाणी...
बुलडाणा जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईबुलडाणा : जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी आलेले...
अकोला, बुलडाण्यात वाढीव मतदान कुणाला...अकोला  : लोकशाहीचा उत्सव म्हणून गणना...
शिरुर तालुक्यात रानडुकरांकडून उभ्या...रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्‍...
पाथर्डी, पारनेरमध्ये सर्वाधिक टॅंकरने...नगर : जिल्ह्यात पाणीटंचाईचे गंभीर परिणाम...
राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही...नगर  : मुस्लिम समाजाला भीती दाखविण्यासाठी...
सातारा जिल्ह्यात ३३६५ हेक्टरवर उन्हाळी...सातारा  ः जिल्ह्यातील पूर्व भागात तीव्र...
पाणीपुरवठ्यासाठी खानदेशात ५०७ विहिरी...जळगाव : पाणीटंचाई दूर करण्यासाठी खानदेशात सुमारे...
स्ट्रॉबेरी उत्पादनवाढीवर शेतकऱ्यांनी भर...भिलार, जि. सातारा  : स्ट्रॉबेरी महोत्सव हा...
नुकसानीचा अहवाल शासनाकडे, भरपाईकडे लक्षजळगाव : खानदेशात वादळासह अवकाळी पावसाने केळी...
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या...
अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी; तर...जालना ः  पक्षाविरोधात काम केल्यामुळे अब्दुल...
विजयदादा यांना तेव्हा स्थिरीकरण आठवले...सोलापूर : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी...
मराठवाड्याचा पाणी प्रश्‍न सोडविणार :...पैठण, जि. औरंगाबाद   : पश्चिम घाटातून...
मोदीजी, महाराष्ट्र तुम्हाला धडा...मुंबई : आमच्या महाराष्ट्राच्या मातीतील...