राज्यात आठवडाभर पावसाची शक्‍यता

राज्यात आठवडाभर पावसाची शक्‍यता

महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील; तसेच बंगालच्या उपसागराच्या लगतच्या पूर्व किनारपट्टीवर १००६ हेप्टापास्कल हवेचा कमी दाब राहण्यामुळे त्या भागावर ढगांची दाटी होईल. रविवारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात ते मुंबई व पुढे पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यावरील हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतील. सोमवारी  ओदिशाजवळ पूर्वकिनाऱ्यावर चक्राकार वारे वाहतील व लहान वादळाची निर्मिती होईल. हवेचे दाब १००४ हेप्टापास्कलने कमी होऊन मराठवाडा, पूर्व विदर्भ, दक्षिण कोकण व दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरवात होईल. त्या वेळी पूर्व किनाऱ्यावर चक्राकार वादळी वारे सुरूच राहतील आणि आर्द्रतेचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा महाराष्ट्राच्या पूर्व भागात करतील. त्यातून ढगांचा गडगडाट, विजा चमकणे हे सुरूच राहील. येत्या मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण भारत मध्य व पूर्व भारतावर पावसाचे प्रमाण वाढेल आणि एकसारखा पाऊस काही काळ सुरू राहील. गुरूवारपर्यंत संपूर्ण भारतात पाऊस होईल. त्यापूर्वी मंगळवारी मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेश भागावर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे तयार होतील. शनिवारी मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या भागात; तसेच नाशिक - धुळे भागावर ढगांची दाटी निर्माण होऊन जोरदार पावसाची शक्‍यता राहील. रविवारी मुंबई, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाडा, विदर्भ व पुणे, नगर जिल्ह्यात पावसाचा जोर राहील. सोमवारी उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर राहील. मंगळवारी मुंबई व ठाणे भागात पावसाचा जोर राहील. एकूणच येत्या शनिवार ते गुरूवार या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण निर्माण होईल.पुढील शनिवारी पावसाचे वातावरण निवळेल. येत्या गुरूवार आणि शुक्रवारी दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहणे शक्‍य आहे.  कोकण सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर व मुंबई परिसरात पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा ठाणे जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर उर्वरित जिल्ह्यात अग्नेयेकडून राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर उर्वरित जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान २४ अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९१ टक्के तर उर्वरित जिल्ह्यात ८२ ते ८७ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८१ टक्के आणि उर्वरित जिल्ह्यात ती ६१ ते ७४ टक्के राहील. या आठवड्यात पावसाचे प्रमाण मुंबई, ठाणे परिसरात अधिक राहणे शक्‍य आहे. उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी ६० मिलिमीटर तर जळगाव जिल्ह्यात ६५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असेल; नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात २७ ते ३३ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३५ मिलिमीटर राहील तर नाशिक व धुळे जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व जळगाव जिल्ह्यात २३ ते २४ अंश सेल्सिअस; तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५९ टक्के राहील. मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी  ५० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, उर्वरित सर्वच जिल्ह्यात त्याच दिवशी ७ ते ११ मिलिमीटर राहील. कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५७ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ अमरावती जिल्ह्यात रविवारी १९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यात ४ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस आणि अमरावती जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. अकोला जिल्ह्यात कमाल तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७५ टक्के राहील. मध्य विदर्भ वर्धा व नागपूर जिल्ह्यात रविवारी १० ते ११मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे तर यवतमाळ जिल्ह्यात ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९५ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील. पूर्व विदर्भ गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात ६ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गोंदिया जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९६ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के राहील. दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र नगर जिल्ह्यात रविवारी ३० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून उर्वरित जिल्ह्यात ८ ते १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस; तर पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९५ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ७५ टक्के राहील; तर उर्वरित जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७७ टक्के राहील तर उर्वरित जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ६० टक्के राहील. या आठवड्यात पावसाचे प्रमाण मध्यम राहील.

कृषी सल्ला :

  • पूर्वहंगामी उसाची लागवड करावी.
  • हरभरा, सूर्यफूल, मोहरी, रब्बी ज्वारीची पेरणी करून सारे व पाट पाडावेत.
  • करडई, रब्बी ज्वारी पिकात कोळपणी करावी.
  • संपर्क : डॉ. रामचंद्र साबळे  (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com