लागवड खपली गव्हाची

खपली गव्हाची जात ः एमएसीएस २९७१
खपली गव्हाची जात ः एमएसीएस २९७१

खपली गव्हाची काळी कसदार तसेच हलक्या, चोपण जमिनीमध्ये लागवड करता येते. सुधारित जातींची निवड करावी. पेरणी दक्षिण-उत्तर दिशेने करावी. त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळून उत्पादनामध्ये वाढ होते. 

  • खपली गव्हास साधारण १० अंश ते २३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. वाढते तापमान आणि पाण्याचा ताण खपली गव्हाच्या जाती सहन करतात. 
  • काळ्या व कसदार तसेच हलक्या, चोपण जमिनीमध्येसुद्धा चांगला येतो. जमिनीचा सामू ६ ते ८ पर्यंत असावा. क्षारपड जमिनीमध्ये खपली गहू तग धरतो. 
  • निचऱ्याच्या जमिनीत लागवड करावी. त्यामुळे पीक लोळत नाही. 
  • जमीन चांगली मशागत करावी. जमिनीत पुरेसे  शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे किंवा गांडूळ खत २ टन प्रती हेक्टरी कुळवणीच्या वेळी मिसळावे. 
  • हेक्टरी ६० किलो नत्र, ६० किलो स्फुरद, ४० किलो पालाश पेरताना द्यावे. उर्वरित अर्धे नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे. माती परीक्षण करून खते द्यावीत.
  • बियाणे 

  • खपली गहू टरफलासहीत पेरला जातो. एक हेक्टरसाठी १०० किलो बियाणे लागते.
  • टोकण पद्धतीसाठी ४० ते ५० किलो बियाणे पुरेसे होते.
  • बीजप्रक्रिया ः (प्रति किलो बियाणे)

  • थायरम ३ ग्रॅम 
  • अॅझोटोबॅक्टर २५ ग्रॅम, स्फुरद विरघळविणारे जिवाणूसंवर्धक     २५ ग्रॅम गुळाच्या पाण्यात मिसळावे. या द्रावणाची प्रतिकिलो बियाण्यास प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाणे सावलीमध्ये  वाळवून पेरणी करावी.
  •  सुधारित जाती           

  • डीडीके १००९  -              ३८- ४० क्विंटल/हेक्टरी
  • डीडीके १०२५  -              ३९-४२ क्विंटल/हेक्टरी
  • डीडीके १०२९ -               ४०-४४ क्विंटल/हेक्टरी
  • एम.ए.सी.एस. २९७१ -     ४६-५० क्विंटल/हेक्टरी
  • एच. डब्लू १०९८  -          ४५-५० क्विंटल/हेक्टरी
  • टीप ः खपली गहू साधारणपणे १०५ ते ११० दिवसांत तयार होतो. आघारकर संशोधन संस्थेने एम.ए.सी.एस. २९७१ ही खपलीची अधिक उत्पन्न देणारी, बुटकी जात प्रसारीत केली आहे. या जातीच्या लागवडीची शिफारस वेळेवर पेरणीसाठी महाराष्ट्र, कर्नाटक या भागामध्ये केली आहे.

    पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी 

  •  उगवण क्षमता तपासताना १०० दाणे ओल्या गोणपाटावर रांगेमध्ये ठेवावेत. गोणपाट झाकून ठेवावे, त्यास रोज सकाळी गोणपाट ओलसर होईपर्यंत पाणी मारावे.
  •  साधारणपणे ४ ते ५ दिवसांनी गोणपाट उघडून मोड आलेले दाणे मोजावेत. त्यावरून बियाणे उगवण क्षमतेचा अंदाज घ्यावा.
  • पेरणी :

  •   दोन ओळीतील अंतर २३ सें.मी. ठेवून पेरणी करावी. बियाणे ५ सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये, त्यामुळे बियाण्याची उगवण क्षमता कमी होते. जमिनीमध्ये पुरेसा वापसा असताना पेरणी करावी. 
  •  पेरणी दक्षिण-उत्तर दिशेने करावी. त्यामुळे पिकास पुरेसा सूर्यप्रकाश मिळून उत्पादनामध्ये वाढ होते. उभी आडवी पेरणी करू नये. एकेरी पेरणीमुळे आंतरमशागत करणे सुलभ होते.
  •  पेरणी दोन चाड्याची पाभर किंवा सुधारित खते व बियाणे पेरणी यंत्राने करावी. यामुळे पेरणीबरोबरच रासायनिक खतेदेखील देता येतील. 
  •  जमिनीच्या उतारानुसार २.५ ते ४ मीटर रूंद आणि ७ ते २५ मीटर लांब सारे पाडावेत. उताराला आडव्या दिशेने पाट पाडावेत. पेरणी केल्यानंतर लगेच पाणी दिल्यामुळे उगवण चांगली होते. 
  •  टोकण पद्धतीत सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा. उताराच्या दिशेने बरंबे करून त्यावर बियाणे टोकण करावी.
  •  वैशिष्ट्ये 

  • पौष्टिक, वात-पित्तशामक, शक्ती वाढविणारा.
  •  मधुमेह, हृदयविकार, आतड्यांचा कर्करोग, बद्धकोष्टतेवर     परिणामकारक.
  •  हाडांची झीज भरून निघते. दातांच्या तक्रारी कमी करण्याचा गुणधर्म.
  •  चपाती चवीला सरबती जातीपेक्षा गोडसर असते. 
  •  तांबेरा रोगप्रतिकारक.
  •  एक क्विंटल खपलीपासून सत्तर किलो गहू निघतो.
  •       आरोग्यास उत्तम ः

  •  १२ ते १५ टक्के प्रथिने, ७८ ते ८३ टक्के कर्बोदके आणि तंतूचे     प्रमाण १६ टक्के. 
  •  खपलीचा उत्कृष्ट रवा बनतो. चांगल्या प्रतीचा पास्ता व इतर उपपदार्थासाठी हा गहू चांगला आहे.
  • गहू ओलावून, जाड भरडून, गूळ मिसळून खीर करता येते. शेवया, कुरडया इत्यादी पदार्थ  बनवले जातात.
  •   संपर्क . बी. के. होनराव, , ९४२३००३१३७ (अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, अानुवांशिक आणि वनस्पती पैदास विभाग, आघारकर संशोधन संस्था, पुणे )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com