agriculture stories in marathi, wheat new variety research | Agrowon

सागरी तणामुळे मिळेल विषाणूजन्य रोगांसाठी प्रतिकारक गहू जात
सतीश कुलकर्णी
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

गहू पिकामध्ये येणाऱ्या स्ट्रिक मोझाइक विषाणूमुळे येणाऱ्या रोगांना प्रतिकारक गुणधर्म गहूवर्गीय सागरी तणामध्ये आढळून येतात. हे गुणधर्म गहू पिकामध्ये आणणे शक्‍य असून, त्यासाठी अमेरिकेतील साउथ डाकोटा राज्य विद्यापीठामध्ये दोन वर्षांचा संशोधन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकी कृषी विभागाने  २.५ लाख डॉलर इतके अनुदान दिले आहे.

गहू पिकामध्ये येणाऱ्या स्ट्रिक मोझाइक विषाणूमुळे येणाऱ्या रोगांना प्रतिकारक गुणधर्म गहूवर्गीय सागरी तणामध्ये आढळून येतात. हे गुणधर्म गहू पिकामध्ये आणणे शक्‍य असून, त्यासाठी अमेरिकेतील साउथ डाकोटा राज्य विद्यापीठामध्ये दोन वर्षांचा संशोधन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पासाठी अमेरिकी कृषी विभागाने  २.५ लाख डॉलर इतके अनुदान दिले आहे.

२०१४ मध्ये प्रा. वांगलोंग ली यांच्या एका प्रयोगामध्ये गहूवर्गीय सागरी तणांवर व्हिट स्ट्रिक विषाणूंचा प्रादुर्भाव होत नसल्याचे आढळले होते. त्यावर अधिक काम करताना त्यांनी त्यातून संकर तयार केले. २०१६ मध्ये झालेल्या प्रयोगामध्ये या संकरित रोपांच्या ओळीही विषाणूंचा प्रादुर्भावापासून मुक्त राहिल्या. त्याच वेळी त्यांच्या मूळ गहू जाती मात्र रोगाला बळी पडल्या होत्या.

त्याविषयी माहिती देताना प्रा. वांगलोंग ली यांनी सांगितले, की इतिहासामध्येही अनेक वेळा गहू पिकाच्या नव्या जाती पैदास करण्यासाठी विविध सजातीय किंवा विजातीय प्रजातींचे साह्य घेतलेले आहे. उदा. गहू पिकामध्ये येणाऱ्या तांबेरा, पिवळा तांबेरा, भुरी रोगांसाठी प्रतिकारक जाती विकसित करताना मोहरीतील जनुकांचा वापर केला होता.

संकराचे असे होतील फायदे ः
विषाणूचा प्रतिकार हा तापमानासाठी संवेदनशील नसल्याचे दिसून आले. कारण सध्या गहू पिकामध्ये विषाणू प्रतिकारक असलेले जनुक हे ६४.४ अंश फॅरनहीटपेक्षा अधिक तापमानाला कार्य करत नाही. मात्र, या नव्याने विकसित केलेल्या जातींमध्ये ८२ अंश फॅरनहीटपर्यंतही प्रतिकारकता दिसून आली.
सागरी तण आणि संकरित गहू जाती अधिक पाण्यासाठीही सहनशील आहेत. गहू पिकामध्ये पाणी साचून राहण्याची समस्या आर्कान्सास आणि लुझीयाना राज्यामध्ये व बांगलादेशामध्येही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी ही गहू जात फायदेशीर ठरू शकेल.

सागरी गहूवर्गीय तणांची काडी ही तुलनेने टणक आहे. ती सॉफ्लाय या माशीलाही प्रतिकारक ठरू शकते. ही कीड मोंटाना, डाकोटा राज्यांच्या उत्तरेकडे संपूर्ण, तर दक्षिणेकडील काही भागांमध्ये वसंत ऋतूमधील आणि कोलोरॅडो आणि नेब्रास्का या राज्यांतील हिवाळी गहू पिकांसाठी त्रासदायक ठरते. ती गहू पिकाच्या पोकळ कांडीमध्ये अंडी घालते. त्यामुळे गहू रोप कोलमडते.

सध्या ही प्रतिकारकता नेमक्‍या कोणत्या जनुकांमुळे येते, यावर संशोधन केले जात आहे. नेमके ते जनुक गहू पिकामध्ये अंतर्भूत करता येईल. त्यासाठी सागरी गहू तणाचे जनुकीय विश्‍लेषण केले असून, त्याची तुलना गहू जनुकीय संरचनेशी केली जात आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
....अन्यथा एक जूनपासून आर-पारची लढाई औरंगाबाद : शेतकरी संपाच्या वेळी मागण्या मान्य...
ऊसदरातील कपात रद्द करण्याची साताऱ्यातील... सातारा  ः साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा... नगर ः येथे सुरू असलेल्या ‘सकाळ - अॅग्रोवन’ कृषी...
‘निर्यातक्षम उत्पादनासाठी डाळिंबाचा...नगर  : डाळिंबाची सर्वच ठिकाणी लागवड वाढत आहे...
धुळ्यातील मुळ्याला परराज्यातून मागणी धुळे  : जिल्ह्यातील न्याहळोद व परिसरातील...
‘म्हैसाळ’च्या पाण्यासाठी होणार आंदोलन सांगली  ः म्हैसाळ योजना थकबाकीमुळे बंद आहे...
औरंगाबादेत 'रयत क्रांती'कडून पुतळा दहनऔरंगाबाद : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत...
देगाव फूड पार्कचे गुरुवारी उद्‌घाटन ः...पुणे ः प्रक्रिया उद्याेगांतून राेजगारनिर्मितीसह...
गुहागर तालुक्यात गवा रेडा पडला विहिरीतगुहागर - तालुक्यातील मुंढर आदिवाडी मध्ये...
प्रथमोपचाराने कमी होते सर्पदंशाची...निसर्गाच्या सानिध्यात शेती करताना निसर्गाचे घटक...
उत्तर महाराष्ट्रात बुधवार ते...महाराष्ट्रासह भारतावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी वेळेत...या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातील कापूस उत्पादक...
द्राक्षबागेत रिकटवेळी घ्यावयाची काळजीसध्याच्या वाढत्या तापमानामध्ये द्राक्षबागेमध्ये...
प्रतिकारकता विकसन रोखण्यासाठी होतोय...पि कांमध्ये येणाऱ्या अनेक किडी या कीटकनाशकांसाठी...
नगर येथे ‘अॅग्रोवन कृषी प्रदर्शना’स...नगर : नगर आणि शेजारच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह...
कर्जमाफीच्या सहाव्या यादीत साताऱ्यातील... सातारा  : कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यासाठी...
शाश्‍वत शेळीपालनातून साधावी प्रगती :... नगर : शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र...
खासगी बाजार समित्यांना ‘ई-नाम’ बंधनकारकपुणे: आॅनलाइन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम)...
चार जिल्ह्यांत ४३ हजार क्विंटल तूर खरेदी औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना...
जळगावमधील नदीकाठावरील गावांना... जळगाव  ः जिल्ह्यात नदीकाठावरील गावांना...