साैंदर्यवृद्धीसाठी फळांचे सेवन उपयुक्त

साैंदर्यवृद्धीसाठी फळांचे सेवन उपयुक्त
साैंदर्यवृद्धीसाठी फळांचे सेवन उपयुक्त

सर्वसाधारणपणे असा समज असतो की आजारी पडल्यावरच फळे खायची असतात. प्रत्यक्षात मात्र फळांमध्ये इतके विविध प्रकारचे गुणधर्म आहेत की निरोगी राहायचे असेल तर फळांचे सेवन आवर्जून केले पाहिजे.

विविध फळांमध्ये विविध प्रकारचे उपयुक्त पोषक घटक अाहेत. फळांचे भरपूर प्रमाणात व नियमितपणे सेवन केले, तर केवळ आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धनही होते. रोज फळे खाताना आवडणारे त्याच प्रकारचे फळ न खाता ती जरा बदलून खावीत. त्यामुळे प्रत्येकात असलेले भिन्न पोषक तत्त्व पोटात जाऊन आरोग्य व सौंदर्य या दोहोंचे वर्धन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जर उपवास केला असेल, तर नेहमीच तो फळे खाऊनच सोडावा.

कोणत्या फळात कोणते जीवनसत्त्व अ जीवनसत्त्व ः आंबा, पपई, पेरू, अननस, ताजे जर्दाळू, पॅशनफ्रूट इ. क जीवनसत्त्व ः संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरी, किवी, अननस, काळी द्राक्षे, पेरू, खरबूज, टरबूज इ. जीवनसत्त्व ‘ई’ आणि ‘के’ ः खजूर, पीच, डाळिंब, केळी, लिची, पॅशनफ्रूट, पेरू

फळांतील फायबरमुळे शरीराला होणारे फायदे

  • फायबर हे पिष्टमय पदार्थच आहेत, पण त्यांचे पचन होत नसल्यामुळे त्यांना ‘नॉन अॅव्हेलेबल कार्बोहायड्रेटस्’ म्हणतात. फळांबरोबर अख्खी सालासकट धान्ये व कडधान्ये डाळी, भाज्यांमधूनही फायबर्स मिळतातच.
  • फायबर्सचे पोटात गेल्यावर विरघळणारी आणि न विरघळणारी फायबर्स असे दोन प्रकार आहेत. विरघळणाऱ्या फायबरमध्ये ‘पेक्टिन’ आणि ‘गम’ ही दोन फायबर आहेत. पदार्थ खाल्ल्यावर फायबर्स पोट भरल्याची, समाधानाची भावना देतात. त्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी करण्यासाठी त्यांची मदत होते.
  • पोटात गेल्यावर न विरघळणाऱ्या फायबर्समध्ये ‘सेल्युलोज’, ‘हेमिसेल्युलोज’ आणि ‘लिग्निन’. पोटात अन्नाचे पचन होत असताना ही फायबर्स पाणी शोषून घेतात आणि फुगतात.
  • फायबर्स पचनक्रियेचा वेग काहीसा वाढवतात आणि मलप्रवृत्ती सुकर होण्यासाठीही मदत करतात.
  • सफरचंद, पेरू, द्राक्ष, चेरी, संत्रे, केळी, मोसंबी, किवी, कलिंगड आणि अंजिर या फळांमध्ये कमी- अधिक प्रमाणात दोन्ही फायबर आढळतात.
  • संपर्क ः कीर्ती देशमुख, ८२७५४१२०६३ विषय विशेषज्ञ गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, अकोला

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com