औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.
कंद पिके
बीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. थंड तापमानात वाढलेल्या बिटामध्ये उच्च प्रमाणात साखर व उच्च दर्जाचा रंग आढळतो. बीट हे लाल रंगाचे असल्यामुळे त्याचा वापर बीट साबण, वाइन, रंग व औषधी लोणचे करण्यासाठी करतात. बीट जेली हा पारदर्शक व अर्धघट्ट पदार्थ आहे. घरच्याघरी बिटापासून जेली बनवून लघुउद्योग स्थापन करता येतो.
साहित्य ः
बीटरस १८० मिलिग्रॅम (१०० ग्रॅम बिटापासून १८० मिली बीटरस मिळेल), पेक्टीन १.४ ग्रॅम, लिंबू रस ४ ग्रॅम, साखर ११४ ग्रॅम

- बीट धुऊन साले काढावीत व बारीक किसून घ्यावे.
- बिटाच्या प्रमाणाच्या दीडपट पाणी मिसळून १५-२० मिनिटे उकळून गाळून घ्यावे.
- बिटच्या रसात दिलेल्या प्रमाणात साखर, लिंबू रस व पेक्टीन मिसळावे.
- ढवळून जेलीचे मिश्रण व्यवस्थित शिजवावे. मिश्रणाचा टीएसएस ६५ ब्रिक्सपर्यंत आणावा
- या मिश्रणाला जेलीच्या साच्यात ओतून १०-१५ मिनिटे भरलेले साचे स्थिर ठेवावेत.
- साच्यातून जेली काढून पॅक करून साठवून ठेवावी.
बिटचे फायदे
- रक्तदाब, हृदयविकार व वजन नियंत्रित ठेवते.
- रक्तातील लाल पेशी नियंत्रित राहतात.
- मेंदू तरबेज व ताणतणाव कमी करते.
- रक्तातील लाल पेशींवर नियंत्रण करते. रक्तप्रवाह सुरळीत चालतो.
- कर्करोग, त्वचा रोग व केसांच्या विकारावर फायदेशीर
---------
संपर्क ः सोनल चौधरी, ८८०६७६६७८३
(के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)