प्रक्रिया करून टिकवा अंड्यांची गुणवत्ता

प्रक्रिया करून टिकवा अंड्यांची गुणवत्ता
प्रक्रिया करून टिकवा अंड्यांची गुणवत्ता

कोंबडीने अंडी दिल्यानंतर जी त्याची गुणवत्ता असते ती सर्वोत्तम असते. मात्र त्यानंतरही गुणवत्ता टिकविण्यासाठी अंड्यांवर विविध प्रक्रिया कराव्या लागतात. प्रक्रियेमुळे अंडी एक आठवड्यापासून ते काही महिन्यांपर्यंत टिकविता येतात. स्त्रीयदृष्ट्या अंड्यांची गुणवत्ता टिकविण्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यात ओली पद्धत, सुकी पद्धत व इतर पद्धत यांचा समावेश होतो. अंडी टिकविण्यासाठी प्रक्रिया ओली पद्धत ः या पद्धतीत लाइम वॉटर पद्धत (चुन्याची निवळी) व वॉटर ग्लास पद्धत या पद्धतींचा समावेश होतो. सुकी पद्धत ः या पद्धतीत तेल, वायू व शीत साठवणूक या पद्धतींचा समावेश होतो. इतर पद्धती :

१. ओली पद्धत अंड्याच्या आवरणावरील छिद्रे आतील बाजूने बंद करण्यासाठी त्याला द्रव माध्यमामध्ये बुडविले जाते. या पद्धतीला ओली पद्धत असे म्हणतात. अ) लाइम वॉटर पद्धत: कॅल्शियम हायड्रॉक्‍साईड अंड्यातून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनडाय ऑक्‍साईडसोबत संलग्नित होते. त्यानंतर त्याचे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते. कॅल्शिअम कार्बोनेट अंड्याच्या आवरणावरील छिद्रांना आतील बाजूने बंद करते. परिणामी अंड्यांतून होणारे कार्बनडाय ऑक्‍साईडचे उत्सर्जन थांबते. ही क्रिया पूर्ण होण्यास तासांचा कालावधी लागतो. पद्धत ः

  • एक किलो चुन्याची निवळी व एक लिटर पाणी व्यवस्थित मिसळून मिश्रण बनवावे.
  • त्यानंतर त्यात ग्रॅम मीठ मिसळून पुन्हा पाच ते सहा लिटर पाणी मिसळावे.
  • द्रावणाला मलमलच्या कापडामधून गाळून घ्यावे.
  • गाळून शुद्ध केलेल्या द्रावणामध्ये कपड्यातील थोडीशी निवळी मिसळावी.
  • अंड्यांना या द्रावणामध्ये - तास ठेवावे. त्यानंतर अंडी काढून सर्वसाधारण तापमानावर ठेवावीत.
  • फायदे या पद्धतीने अंड्यांना ते आठवड्यांपर्यंत टिकवता येते. द्रावणासाठी लागणारे साहित्य स्वस्त व सहज उपलब्ध होणारे आहे. ब) वॉटर ग्लास पद्धत यामध्ये सोडियम सिलीकेटचे ( टक्के तीव्रता) द्रावण वापरले जाते. पद्धत

  • पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असलेला उत्सर्जित कार्बनडायऑक्‍साईड काढून टाकण्यासाठी पाण्याला उकळले जाते.
  • त्यानंतर त्यात मोजलेले टक्के तीव्रतेचे सोडियम सिलीकेट मिसळले जाते. द्रावण थंड झाल्यावर त्यात अंड्यांना रात्रभर बुडवून ठेवले जाते.
  • २. सुकी पद्धत अ) तेल : यामध्ये दोन गोष्टींची दक्षता घ्यावी लागते. वापरण्यात येणाऱ्या तेलामुळे अंड्यांना कुठलाही रंग किंवा वास येऊ नये तसेच वापरण्यात येणाऱ्या तेलाचे तापमान - अंश सेल्सिअस असावे. तेलाला रंग किंवा वास येऊ नये यासाठी सहसा खनिज तेलाचा वापर केला जातो. या पद्धतीमुळे अंड्यांची गुणवत्ता - दिवसांपर्यंत टिकवता येते. अंड्यांना तेलामध्ये बुडवून किंवा अंड्यांच्या रुंद भागावर तेलाची फवारणी करुन तेल वापरता येते. ब) वायू ः अंड्यांना प्लॅस्टिक बॅगमध्ये ठेवून त्यात नायट्रोजन व कार्बन डायऑक्‍साईड हे वायू ः याप्रमाणात भरून बंद केले जाते. क) शीतगृहात साठवणूक : शीतगृहात साठवणुकीमध्ये अंड्यांना अंश सेल्सिअस तापमान व - अंश टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात ठेवले जाते. यामध्ये खोलीचे तापमान - अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाले तर अंड्यातील अल्ब्युमिन (पांढरा भाग) व बलक गोठण्याची शक्‍यता असते. या पद्धतीने अंड्यांना - महिन्यांपर्यंत टिकविता येते. ३. इतर थर्मोस्टॅबिलायझेशन या पद्धतीने अंड्यातील अलब्युमिनची गुणवत्ता टिकवली जाऊ शकते. यामध्ये अंड्यांना ऑईल बाथ मध्ये अंश सेल्सिअस तापमानावर मिनिटे किंवा अंश सेल्सिअस तापमानावर मिनिटांसाठी ठेवले जाते. या व्यतिरिक्त अंड्यांना गरम पाण्यात ( अंश सेल्सिअस) दोन ते तीन सेंकदांसाठी बुडविले जाते, यामुळे अंड्याच्या आवरणावरील जिवाणू नष्ट होतात. संपर्क : डॉ. सतीश यादव, ९००४१६८४२२ (मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com