हळद काढणी अगोदर १५ ते ३० दिवस पाणी देणे बंद करावे. पाणी बंद करताना प्रथम पाणी थोडे थोडे कमी करून नंतर पूर्णपणे बंद करावे. त्यामुळे पानातील अन्नरस कंदामध्ये लवकर उतरण्यास मदत होते. हळकुंडाला वजन, गोलाई आणि चकाकी येते. सर्वसाधारणपणे जातीपरत्वे हळद काढण्यास ७ ते ९ महिने लागतात. यामध्ये प्रामुख्याने हळव्या जातींना (उदा. आंबे हळद) तयार होण्यास लागवडीपासून ६ ते ७ महिने लागतात. नीम गरव्या जाती (उदा. फुले स्वरूपा) ७ ते ८ महिन्यांत काढणीस येतात. गरव्या जाती (उदा. सेलम, कृष्णा) ८ ते ९ महिन्यांमध्ये काढणीस तयार होतात. त्यामुळे जाती परत्वे कालावधी पूर्ण झाल्याशिवाय पाला कापू नये.
हळदीची प्रतवारी अ) जेठे गड्डे ः मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठे गड्डे (मातृकंद) म्हणतात. सदरचे गड्डे प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी वापरतात. त्यामुळे काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत. ब) सोरा गड्डा ः लागवडीसाठी वापरलेले कंद ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेले ४० ते ५० टक्के कंदांना सोरा गड्डे म्हणतात. हे काळपट रंगाचे मुळ्या विरहीत असतात. यांना हळकुंडापेक्षा दुप्पट दर मिळतो. क) बगल गड्डे ः जेठे गड्ड्याला आलेला फुटव्यांच्या खाली बगल गड्डे तयार होतात. यांस अंगठा गड्डे असेही म्हणतात. ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बेणे म्हणून करतात. ड) हळकुंडे ः बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात. प्रामुख्याने प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी याचा वापर करतात. यातील काही हळकुंडांना उपहळकुंडे येतात. त्यांस लेकुरवाळे हळकुंडे असे म्हणतात. याचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. काढणी केल्यानंतर लवकर प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणत: १५ दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी. म्हणजे प्रत व दर्जा चांगला राहतो. जातीपरत्वे सर्व साधारणपणे एकरी १५० ते २०० क्विंटल ओली हळद आणि प्रक्रिया करून ३० ते ४० क्विंटल होते. हळदीची काढणी ः पारंपरिक पद्धत ः
यंत्राद्वारे काढणी
संपर्क ः डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४ (डॉ. माळी हळद संशोधन योजना, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी आणि डॉ. कदम हे काढणी पश्चात पदव्युत्तर संस्था, रोहा, जि. रायगड येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.