agriculture story in marathi, Advantages of intercropping | Agrowon

आंतरपिकातून मिळेल चांगले उत्पादन
डॉ. वा. नि. नारखेडे, डॉ. डी. एन. गोखले
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

आंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी वेळेवर पेरणी, योग्य जातीची निवड, रासायनिक खतांचा संतुलित वापर, प्रमाणबद्ध रोपांची संख्या, तणांचे नियंत्रण, आंतर मशागत व गरजेनुसार पीक संरक्षण, तसेच मृद व जलसंधारण केल्यास अधिक उत्पादन मिळते.

आंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी वेळेवर पेरणी, योग्य जातीची निवड, रासायनिक खतांचा संतुलित वापर, प्रमाणबद्ध रोपांची संख्या, तणांचे नियंत्रण, आंतर मशागत व गरजेनुसार पीक संरक्षण, तसेच मृद व जलसंधारण केल्यास अधिक उत्पादन मिळते.

विविध पीक पद्धतीत कडधान्य पिकांचा समावेश केल्याने जमिनीचा पोत सुधारतो. या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जिवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्याने या पिकांची नत्राची गरज बऱ्याच प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय कडधान्य पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होतो. त्यामुळे आंतरपीक पद्धतीमध्ये कडधान्य पिकांचा समावेश करावा. आंतरपीक पद्धतीमध्ये चांगले उत्पादन मिळविण्यासाठी वेळेवर पेरणी, योग्य जातीची निवड, रासायनिक खतांचा संतुलित वापर, प्रमाणबद्ध रोपांची संख्या, तणांचे नियंत्रण, आंतर मशागत व गरजेनुसार पीक संरक्षण, तसेच मृद व जलसंधारण केल्यास अधिक उत्पादन मिळते.

बागायती आंतरपीक पद्धती
गहू अाणि हरभरा

  • मध्यम ते भारी जमिनीमध्ये ६:३ ओळींच्या प्रमाणात ही आंतरपीक पद्धती फायदेशीर आहे.
  • गहू अाणि मोहरी
  • मध्यम ते भारी जमिनीमध्ये बागायती क्षेत्रासाठी या आंतरपीक पद्धतीची शिफारस आहे.
  • आंतरपीक पद्धतीत ६ ओळी गहू व ३ ओळी मोहरीच्या प्रमाणाची शिफारस आहे. इतर लागवडीच्या शिफारशी गहू व मोहरीच्या सलग पीक पद्धतीसारख्या आहेत.

पूर्वहंगामी उसातील आंतरपिके
पूर्वहंगामी ऊस लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर यादरम्यान होते. या उसामध्ये मुख्यत्वे करून बटाटा, कांदा, लसूण, कोबी या पिकांची लागवड करावी.

पट्टा अथवा जोड ओळ पध्दतीत (७५-१५० सें.मी.) आंतरपिकाच्या दोन ओळी घ्याव्यात. यासाठी ऊस लागवडीनंतर ६ ते ७ दिवसांत पाणी देण्याच्या आधी, तर पिकाची टोकण अथवा पुनर्लागवड करावी. मात्र या पिकांच्या व्यवस्थापनाबाबत विशेष लक्ष द्यावे.

पूर्वहंगामी ऊस आणि कांदा

  • उसामध्ये कांद्याच्या रोपाची लागवड सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सें.मी. अंतरावर दुसऱ्या पाण्याच्या वेळी करावी.
  • या पिकाला मुख्य पिकांच्या खतमात्रेव्यतिरिक्त हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे.
  • जमिनीची सुपीकता टिकवणे आणि वाढविण्याच्या दृष्टीने कांदा हे उत्तम पीक आहे.

पूर्वहंगामी ऊस अाणि बटाटा ः
अ) सलग लागवड पद्धत :

  • जमिनीच्या प्रकारानुसार उसाची लागवड ८० सें.मी, १०० सें.मी व १२० सेंमी केली जाते.
  • ऊस आणि बटाट्याची एका वेळी लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीवर प्रथम बटाटे १०० सें.मी. अंतरावर शेतामध्ये सरळ रेषेमध्ये १५ ते २० सें.मी. अंतरावर ठेवावेत. त्यानंतर दोन बटाट्याच्या ओळींमधून रिजर चालवावा, जेणेकरून अंथरलेले बटाटे हे वरंब्याखाली आपोआप झाकले जातात, तसेच रिजरमुळे ऊस लागवडीखाली सऱ्या तयार होतात. या सऱ्यांमध्ये ऊस लागवड करता येते.
  • उसामध्ये बटाटे आंतरपीक पद्धतीत सर्वसाधारणपणे बटाटा पिकांचे १५० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.

ब) जोड ओळ पट्टा पद्धत :
जोड ओळ पट्टा पद्धतीने उसाचे उत्पादन चांगले येते.
२.५ फुटांवर सलग सऱ्या पाडून प्रत्येक दोन सऱ्यात उसाची लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडल्यास दोन जोडओळीत पाच फुटांचा पट्टा तयार होतो. अशा पट्ट्यात बटाटा, हरभरा किंवा कांदा यांची लागवड करावी.

डॉ. वा. ना. नारखेडे, ७५८८०८२१८४,
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

इतर ताज्या घडामोडी
नदी नांगरणीचे सातपुड्याच्या पायथ्याशी...जळगाव ः शिवार व गावांमधील जलसंकट लक्षात घेता...
प्रत्येक गावात नेमणार भूजल...नगर ः राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता...
अरुणाग्रस्तांच्या स्थलांतराचा तिढा कायम सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पग्रस्त आणि जिल्हा...
पाणीप्रश्नावरील आंदोलनाचे नेतृत्व करणार...नगर : ‘कुकडी’सह घोड धरणातील पाणीसाठे वाढविणे...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...पुणे : मॉन्सूनचा पाऊस लांबल्याने जिल्ह्यात...
नाशिकमध्ये आले प्रतिक्विंटल ८७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
आव्हानांवर मात करण्यासाठी कारखान्यांनी...पुणे : साखर उद्योगासाठी यंदाचे वर्ष ‘टर्निंग...
गेल्या खरिपातील सोयाबीनचे बियाणे झाले...परभणी  : २०१८-१९ च्या खरीप हंगामात...
पीकविम्याच्या नावाखाली भाजप सरकारकडून...मुंबई : शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेताना...
विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...मुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माणमंत्री...
सोयाबीन पीकविमाप्रश्‍नी शेतकरी संघर्ष...पुणे  ः गेल्या वर्षी बीड जिल्ह्यात पाऊस न...
कळमणा बाजार समितीत हरभरा ४१०० रुपयांवरनागपूर ः स्थानिक कळमणा बाजार समितीत हरभरा वगळता...
सोलापुरात हिरवी मिरची, टोमॅटोच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...