agriculture story in marathi, agrowon, all the year vegetable farming, kholmara, bhandara | Agrowon

आधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला
विनोद इंगोले
मंगळवार, 8 जानेवारी 2019

शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत तज्ज्ञ होण्याची धडपड, कारले व चवळी व जोडीला भेंडी अशी बारमाही भाजीपाला पद्धती, आधुनिक तंत्राचा शोध व वापर या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे खोलमारा (जि. भंडारा) येथील अमृत मदनकर यशस्वी शेती करताहेत. धानपट्ट्यात वेगळ्या पिकांचे प्रयोग करून अर्थकारण सुधारण्यासह गटशेती साकारण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे
 
भंडारा जिल्हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील खोलमारा गावातील शेतकरीदेखील 
पारंपरिक पद्धतीने भाताची (धान) शेती करतात. एकरी उत्पादकता, खर्च व दर यांचा मेळ घालता 

शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत तज्ज्ञ होण्याची धडपड, कारले व चवळी व जोडीला भेंडी अशी बारमाही भाजीपाला पद्धती, आधुनिक तंत्राचा शोध व वापर या गुणवैशिष्ट्यांच्या आधारे खोलमारा (जि. भंडारा) येथील अमृत मदनकर यशस्वी शेती करताहेत. धानपट्ट्यात वेगळ्या पिकांचे प्रयोग करून अर्थकारण सुधारण्यासह गटशेती साकारण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे
 
भंडारा जिल्हा भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील खोलमारा गावातील शेतकरीदेखील 
पारंपरिक पद्धतीने भाताची (धान) शेती करतात. एकरी उत्पादकता, खर्च व दर यांचा मेळ घालता 
हाती फारच कमी रक्कम राहायची. प्रपंच, मुलांची शिक्षणे, घरच्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या पैशांची सोय करताना चांगलीच ओढाताण व्हायची. त्यामुळेच गावातील शेतकरी अर्थकारण उंचावणाऱ्या पर्यायी पिकांच्या शोधात होते. त्यातीलच एक अमृत मदनकर. त्यांची वडिलोपार्जित सुमारे साडेचार एकर शेती. त्यात विहिरींचा पर्याय आहे. 

अर्थकारण सुधारणारी शेती 
अमृत यांचे वडील पूर्वी अर्धा एकरांवर भाजीपाला घ्यायचे. त्यांच्याकडून धानासोबतच भाजीपाला शेतीचा वारसा अमृत यांना मिळाला. सन २०१० मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची सूत्रे अमृत यांच्याकडेच आली. शेती व्यावसायिक दृष्टीकोनातूनच करायची असेच त्यांनी ठरवले होते. 
त्यादृष्टीने पुढील बाबींचा विचार केला. 

१) विहिरीला पाणी कमी आहे. अशावेळी कमी पाणी लागणाऱ्या, तसेच बाजारपेठेत कायम मागणी असेल अशा पिकांची निवड. त्यात भाजीपाला पिकांना पसंती 
२) भाजीपाला क्षेत्र वाढविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड 

ठिबक सिंचन तंत्राचा वापर 
तत्कालीन तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी मदनकर यांच्या शेतीला भेट दिली. त्या वेळी कमी पाण्याच्या उपलब्धतेचा मुद्दा मदनकर यांनी मांडला. त्या वेळी ठिबक करण्याचा सल्ला मिळाला. सन २०१२ साली अर्धा एकर क्षेत्र ठिबकखाली आणले. त्यासाठी अनुदानही मिळाले. पुढील काळात ठिबकचे फायदे लक्षात आल्याने त्याखालील क्षेत्र वाढवले. 

आजची पीकपद्धती व तंत्राचा वापर 

 • क्षेत्र- सुमारे चार एकर 
 • यात कारले व चवळीचे आंतरपीक 
 • विविध हंगामात लागवडीचे नियोजन 
 • उदा. १५ डिसेंबर- कारले लागवड 
 • त्यानंतर एप्रिलमध्ये दुसरी लागवड 

त्याचे होणारे फायदे 

 • वर्षभर अखंड कारले सुरू राहते. 
 • एका हंगामात समाधानकारक दर न मिळाल्यास दुसऱ्या हंगामात मिळण्याची आशा. 

लागवडीतील वैशिष्ट्ये 

 • कारली- गादीवाफा (बेड), पॉली मल्चिंग, बांबू व तारांची रचना 
 • साडेचार बाय दोन फूट अंतर. तशा पद्धतीचे बेडस 
 • आता दोन झाडांतील अंतर तीन फूट 

 उत्पादन 

 • कारले- एकरी ८ ते १० टनांपर्यंत 
 • दर- किलोला ४०, ५० रुपये ते ६० रुपये 
 •  खर्च- दीड लाख रू. 
 • नफा- सुमारे ७५ हजार ते एक लाख रुपये  

चवळी 

 • सुमारे १२० दिवसांत उत्पन्न देते 
 • एकरी उत्पादन- सात टनांपर्यंत 
 • दर- किलोला १० रुपयांपासून ४० ते ५० रू 
 • दिवाळीच्या आधी बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने त्या काळात चांगला दर. 

फायदा- कारले पिकाचा बहुतांश उत्पादन खर्च कमी करते. 
 
भेंडी 

 • सुमारे १० गुंठ्यांत. 
 • सुमारे ५५ दिवसांनी प्लॉट सुरू. 
 • दर १० रुपयांपासून ३० रुपयांपर्यंत. 
 • कारली, चवळीच्या तुलनेत कमी दर. भेंडीची काढणीही अडचणीची असल्याची समस्या. त्यामुळे पूर्वी जास्त असलेले भेंडीखालील क्षेत्र टप्‍प्याटप्‍प्याने कमी केले. 

 तंत्रज्ञानाचा वापर 

 • पॉली मल्चिंग 
 • एकरी सुमारे १६ हजार रुपये त्यावर खर्च 
 • त्याचे होणारे फायदे 
 • तण कमी येते. 
 • खतांची गरज कमी होते. 
 • मजुरी कमी. 
 • किडींचा त्रास कमी होतो. 
 • पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. 

मल्चिंगचा फायदा- दोन वर्षे त्याचा वापर होऊ शकतो. 

क्रॉप कव्हर 
मदनकर म्हणतात 
कारले पिकासाठी मी यंदापासून वापर सुरू केला. फुलोरा येण्यापर्यंत त्याचा वापर करता येतो. 
त्यानंतर परागीभवनासाठी कव्हर काढावे लागते. साधारण सहाशे मीटर्ससाठी सुमारे ३८०० रुपये खर्च येतो. बंडलापासून छोट्या पिशव्या तयार केल्या जातात. प्रती १० गुंठ्यांसाठी ६०० पिशव्यांची गरज भासते. 

मिळत असलेले फायदे 

 • ‘अल्ट्रा व्हॉयलेट’ (अतिनील) किरणे व किडींना यामुळे रोखता येते. 
 • कीडनाशकांच्या सुमारे तीन फवारण्या वाचू शकतात. 
 • झाडे निरोगी राहतात. 
 • पुढील हंगामासाठीही वापर शक्य. 

.बाजारपेठ- मुख्यत्वे भंडारा 

मार्गदर्शन-  नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील प्रज्ञा गोळघाटे 

कारले पिकातील खोलमारा 
खोलमारा हे कारले व चवळी पिकांसाठी प्रसिद्ध असलेले गाव असल्याचे मदनकर सांगतात. गावात सुमारे ५० ते ६० शेतकरी या पिकांमध्ये आहेत. त्यातून गावचे अर्थकारण सुधारले 
आहे. 

मदनकर यांच्यातील गुण व गौरव 

 • भातपट्टयात जपली प्रयोगशीलता 
 • अभ्यासवृत्ती. कृषी विभागाच्या अभ्यास दौऱ्यांमार्फत विविध प्रयोगांची पाहणी. 
 • गावचे विद्यमान सरपंच. 
 • कृषी विभागामार्फत जिल्हास्तरावर कृषिमित्र पुरस्कार. मागील वर्षी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते खासगी सोहळ्यात गौरव 
 • संघटनवृत्ती- गावातील सुमारे २० शेतकऱ्यांना एकत्र करून गटशेती. शाहू कृषक मंडळ असे त्याचे नाव. ‘आत्मा’अंतर्गत त्याची नोंदणी. गटाला शंभर एकरांवरील प्रकल्प मंजूर. त्याद्वारे भाजीपाला प्रक्रिया, दूग्ध विकासाला चालना देण्यासारखे प्रकल्प राबविण्याचे नियोजन. 

संपर्क- अमृत मदनकर- ९८२३४२६७११ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधीनेवासा (जि. नगर) येथे नऊ वर्षापूर्वी बारा...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
दर्जेदार गांडूळखताला तयार केले मार्केटकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल)...
ग्रेडिंग, कोटींगद्वारे संत्र्याचे...सालबर्डी (जि. अमरावती) येथील संत्रा उत्पादक नीलेश...
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
जरंडीच्या पाटलांनी जोपासली देशी संकरित...राज्यात, देशभरात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाखाली...
जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम...जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही...
तूप, खवा निर्मितीसह उभारली सक्षम...दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात...
मका पिकाला दुग्धव्यवसायाची जोड खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...