agriculture story in marathi, agrowon, farm management in drought situation, talkhed, motala, buldhana | Agrowon

दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती पद्धतीचा दिलासा 
गोपाल हागे
शनिवार, 9 फेब्रुवारी 2019

शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांची घालमेल होत आहे. दुष्काळी परिस्थितीचे चक्रही मागे लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तालखेड येथील भानुदास प्रल्हाद चोपडे यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर व त्यावरील खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर दिला आहे. 
 

शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांची घालमेल होत आहे. दुष्काळी परिस्थितीचे चक्रही मागे लागले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तालखेड येथील भानुदास प्रल्हाद चोपडे यांनी रासायनिक निविष्ठांचा वापर व त्यावरील खर्च कमी करून नैसर्गिक शेतीवर भर दिला आहे. 
 
बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तालुक्यातील तालखेड भाग पूर्वीपासून सधन समजला जातो. जसजसा काळ बदलत गेला आणि पावसाचे प्रमाण कमी होत गेले तशी त्याची झळ इथल्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोचली. तालखेड येथील भानुदास चोपडे यांची आठ एकर शेती आहे. त्याचबरोबर ते पाच एकर शेती भाडेतत्त्वावर करतात. त्यांचे चार भावांचे एकत्रित कुटुंब असून, पारंपरिक पिकांसोबत फळबाग, भाजीपाल्याची शेती केली जाते. 

पाण्याची टंचाई झाली भीषण 
पूर्वी सिंचनासाठी पुरेसे पाणी होते. अलीकडील तीन-चार वर्षांत या भागातील पाण्याची स्थिती बिकट झाली. दिवसभरात तास ते दीड तासच मोटरपंप चालेल इतके संकट भीषण झाले आहे. अलीकडील काळात तर दिवाळीचा हंगाम संपला की पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. लागवड केलेल्या फळबागा, उभी पिके डोळ्यांसमोर सुकताना पाहण्याची वेळ येते. 

निविष्ठांवरील खर्च केला कमी 
चोपडे कटुंबदेखील दुष्काळाच्या झळा सोसते आहे. साहजिकच शेतीतून उत्पन्न समाधानकारक नाही. पण त्यातील उत्पादन खर्च तर कमी करता येईल का याचा विचार त्यांनी केला. यंदाच्या हंगामात रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर पूर्ण टाळण्याचे ठरवले. नैसर्गिक शेतीवर भर दिला. यामुळे १३ एकरांत किमान तीन लाख रुपयांचा खर्च वाचल्याचे समाधान ते व्यक्त करतात. रासायनिक निविष्ठांच्या ऐवजी जीवामृत, दशपर्णी अर्क, सप्तधान्यांकूर अर्क या तुलनेने कमी खर्चिक पध्दतींचा वापर केला. 

दुष्काळातही समाधान 
यंदा ऑगस्टनंतर पाऊसतच झाला नाही. त्यामुळे खरीप व रब्बीत आव्हानच उभे ठाकले होते. तीन एकरात मॉन्सूनपूर्व कापूस लागवड केली होती. या कापसने दिलासा दिला. एकरी १३ क्विंटलप्रमाणे उत्पादन मिळाले. या कपाशीत मिश्र असलेल्या पिकांनाही थोडा फार हातभार लावला. दोन क्विंटल उडीद, ६० किलो तूर, २० किलो बाजरी असे उत्पादन हाती आले. कपाशीला पूर्वी रासायनिक निविष्ठांसाठी लागणारा ८ ते १० हजारांपर्यंतचा खर्च निम्म्याने तरी खाली आला. खरे तर मागील तीन- चार वर्षांत तालखेड भागात सातत्याने दुष्काळ पडत आहे. अनेकांना उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. भानुदास यांनीही उशिरा लागवड केलेल्या कापसाचे एकरी सात क्विंटलपर्यंतच उत्पादन मिळाले. 
असेच सोयाबीनबाबतही झाले. या पिकातही पूर्वी किमान आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत खर्च करून एकरी नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. यंदा दुष्काळी परिस्थितीत हेच उत्पादन सहा ते सात क्विंटलपर्यंत मिळाले. प्रमुख पिकांतील खर्च वाचवून तोटा कमी करण्यात यश मिळाल्याचे भानुदास यांनी सांगितले. 

डाळिंब बागेवरील खर्च कमी केला 
२०१३ मध्ये चोपडे यांनी तीन एकरांत डाळिंब लावले आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच छाटणी, बहर व्यवस्थापन ते करीत आले आहेत. दुष्काळी परिस्थितीत मोठा खर्च करूनही डाळिंबाला दर मिळत नाही. साहजिकच हा खर्च आता झेपण्यापलीकडे गेल्याचे ते म्हणाले. त्यातच आता पाणी कमी झाल्याचा फटका डाळिंब बागेला बसत आहे. सद्यःस्थितीत दोन दिवसांत केवळ तास ते दोन तासच पाणी मिळू शकते. विहिरीतून एक दिवसाआड तास पाणी मिळते. अशा स्थितीत ही बाग वाचविण्यासाठी पारंपरिक पद्धतींचा अवलंब सुरू केला आहे. बागेला काडीकचरा, गवत यांचे आच्छादन जमिनीत ओलावा टिकवण्याची धडपड सुरू आहे. रासायनिक खतांचा वापरही त्यांनी थांबवला आहे. नैसर्गिक पद्धतीचा वापर आता सुरू झाला आहे. बागेला घनजीवामृत तसेच कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, सप्तधान्यांकूर अर्क यांचा वापर सुरू झाला आहे. पूर्वी एकरी ५० ते ६० हजार रुपये येणारा खर्च यंदा तरी निम्म्याने कमी झाल्याचे समाधान चोपडे यांना आहे. मागील वर्षी डाळिंबाचे एकरी साडेचार ते पाच टनांपर्यंत उत्पादन मिळाले होते. यंदा ते सहा ते सात टनांपर्यंत मिळेल अशी आशा आहे. 

जनावरांचा सांभाळ 
या शेतीसाठी जनावरांचा मोठा फायदा होत आहे. दोन देशी गायी, दोन म्हशी व एक बैलजोडी 
आहे. त्यांच्यापासून शेण-मूत्र मिळते. त्याचा वापर शेतीसाठी केला जातो. 

संपर्क- भानुदास चोपडे - ९५२७०९८१०६

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
जमिनीची सुपीकता वाढवून केळीची उत्तम...नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात बारड येथील...
एकेकाळचा मजूर परिवार झाला दोनशे एकरांचा...पुणे जिल्ह्यात इंदापूर भागातील रूई गावाच्या...
महाजन बंधूंचे केळीसाठी अत्याधुनिक...तांदलवाडी (जि. जळगाव) येथील प्रेमानंद व प्रशांत...
रोजंदारी सोडून डोंगराळ भागात प्रयोगशील...तळेरान (ता. जुन्नर, जि. पुणे) या आदिवासी डोंगराळ...
कणसे यांच्या उत्कृष्ठ पेढ्यांचा कृष्णा...पुणे जिल्ह्यात वाखारी (ता. दौंड) येथे स्वतःची एक...
शहापूर झाले १४० शेततळ्यांचे गाव शहापूर (जि. नांदेड) गावाने जिल्ह्यात शेततळ्यांची...
लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श...नगर जिल्ह्यातील लोहसर (खांडगाव) येथील गावकऱ्यांनी...
शतावरी, लिंबू पिकातून पीकबदल. इंदापूर...बाजारपेठ व औद्योगिक क्षेत्राची मागणी पाहून शेतकरी...
लाडू, सुका मेव्याची लिज्जत  गोडंबीने...लाडू, सुकामेवा आदी पदार्थ तयार करण्यासाठी काळा...
बीई एमबीए तरुणाची ‘हायटेक’ शेती धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या...
दुष्काळात ठिबकवरील ज्वारीने दिला मोठा...परभणी जिल्ह्यातील ईळेगांव येथील काळे बंधूंनू...
‘सह्याद्री’ शेतकरी कंपनीकडून...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री फार्मर्स...
दुग्ध व्यवसायातून सावरले अल्पभूधारकाने...आठ वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झालं. त्यातून अल्प...
‘क्लिनिंग-ग्रेडिंग’ यंत्राद्वारे  ‘ए वन...कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील सुनील महादेव माळी...
दुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे...पिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य,...
केळीसह हळदीची तंत्रयुक्त शेती केली...जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील...
बहुवीध पीक पद्धतीमुळे दुष्काळातही...लातूर जिल्ह्यातील तेलगाव (ता. अहमदपूर) येथील...
वधारला गवारचा बाजार; दुष्काळात मोठा आधारसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पाच-सहा...