प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह व्यवसाय

बेकरीत तयार के्लेले विविध पदार्थ
बेकरीत तयार के्लेले विविध पदार्थ

वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील सावळे कुटुंबाने आपला पारंपरिक दुग्धव्यवसाय नेटक्या पद्धतीने जपला. शिवाय कुटुंबातील नव्या पिढीचे उच्चशिक्षित राजकुमार यांनी एक पाऊल पुढे टाकून बेकरी उद्योगही सुरू केला. संघर्ष, चिकाटी, समस्यांवर मात करून पुढे जाण्याची वृत्ती जपत ६० प्रकारची विविध उत्पादने तयार करीत त्यांनी या व्यवसायात चांगला जम बसवला आहे.  सह्याद्रीच्या कुशीतील मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दीवड हे दुर्गम गाव आहे. वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा असल्याने गावातील लोकांना शहरात येण्यासाठी मोठी अडचण होत असे. गावातील सावळे कुटुंबाची वडिलोपार्जित नऊ एकर शेती आहे. त्यात भात, हरभरा, गहू अशी पिके घेतली जातात. कुटुंबातील नव्या पिढीतील चार बंधू शेतीची जबाबदारी सांभाळतात. यात अंकुश, लहू, संजय व सर्वात लहान राजकुमार अशी त्यांची नावे आहेत.  दुग्धव्यवसायाला सुरवात  सर्वात धाकटे असलेले राजकुमार यांनी ‘फूड सायन्स अॅँड टेक्नॉलॉजी’ विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. नोकरी न करता घरचाच दुग्धव्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. घरच्या दुधाबरोबरच परिसरातील दूध संकलित करून पुण्यातील निगडी उपनगरातील साईनगर येथे विक्री व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात अन्य तिघेही बंधू राबत होते. प्रामाणिक कष्ट, चिकाटी व गुणवत्ता यांच्या जोरावर अल्पावधीत हा व्यवसाय विनायक दुग्धालय म्हणून नावारूपाला आला.  सध्या अंकुश गावी दुग्धव्यवसाय, लहू हे किराणा विक्री व संजय शेतीची जबाबदारी सांभाळतात.  सुरवातीचा संघर्ष, अपयश  उद्योजकतेची आवड असलेल्या राजकुमार यांनी सुरवातीच्या काळात तीन खासगी दूध कंपन्यांची एजन्सी मिळवली. त्यात चांगला जम बसवला. आर्थिक उलाढाल चांगली होत होती. मात्र, पुढे तांत्रिक कारण तसेच स्पर्धा यातून एजन्सीचे काम थांबवावे लागले. मग शिरूर व नारायणगाव येथे दूध पाश्चरायझेशन प्रकल्प सुरू केला. काही कारणांमुळे पुढे तेही काम थांबवावे लागले.  याच कालावधीत मित्र विनयकुमार आवटे, अविनाश बारगळ, सुनील बोरकर, नितीन फुलसुंदर, नवीनचंद्र बोराडे हे मित्र आणि सासरे नामदेव दाभाडे यांचे पाठबळ मिळत गेले.  पुणे येथे थेट विक्री  कितीही अपयश आले तरी हिंम्मत न हारता त्यातून मार्ग काढण्याची वृत्ती असलेल्या राजकुमार यांनी मग पुण्यातील मार्केट यार्डमधून फळे, भाजीपाला आणून त्याची निगडीमध्ये विक्री सुरू केली. अखेर पुन्हा मार्केटचे सर्वेक्षण, अभ्यास करून प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निश्चय केला. त्यातून बेकरी व्यवसायाचा पर्याय मिळाला. 

बेकरी व्यवसायाची दिशा   अन्न प्रक्रिया विषयातील शिक्षणाचे तांत्रिक पाठबळ जोडीला होते. सुरवातीला दोन अनुभवी मजूर सोबत घेतले. परंतु, लहरीपणामुळे ते मध्येच काम सोडून निघून गेले. बेकरी पदार्थ तयार करण्याचा राजकुमार यांना अनुभव नव्हता. मग पत्नी यांना सोबत घेऊन प्रयत्नवादातून त्यांनी विविध पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. सुरवातीला निगडी येथे उत्पादन व विक्री व्हायची. मात्र जागा लहान असल्याने मग निगडीपासून जवळ असलेल्या रावेत येथे विक्री केंद्र सुरू केले. आज तेथूनच व्यवसायाची सारी घडी त्यांनी बसवली आहे.  आजचा व्यवसाय दृष्टीक्षेपात 

  • मालाची गुणवत्ता व प्रत चांगली असल्याने हळूहळू मागणी वाढू लागली. सन २०१३ नंतर सुरू केलेल्या या व्यवसायात आता चांगलाच जम बसू लागला आहे. सुमारे आठ ते दहा कामगारांच्या साह्याने व्यवसाय सुरू आहे. 
  • सध्या टोस्ट, कुकीज, खारी यांचे प्रत्येकी सहा ते सात प्रकार जमेस धरून सुमारे ६० उत्पादने तयार केली जातात. 
  • -यात स्पेशल देशी तुपातील रोट, नाचणी कुकीज, मल्टी ग्रेन, ज्वारी- बाजरी कुकीज, शुजबेरी कुकीज, 
  • लादी पाव, गव्हाचा ब्रेड, पॅटीस, केक, पेस्ट्रीज, खारी टोस्ट आदींचा समावेश आहे. 
  • सर्व विक्री त्यांच्या केंद्रातूनच होते. त्याशिवाय केंद्राच्या वरच्या मजल्यावर ‘ओपन कॅफे हाउस’ 
  • उभारले आहे. तेथेही ग्राहकांना बेकरीजन्य पदार्थांची सेवा दिली जाते. 
  • 'बेकर्स व्हेव’ असे त्यांनी आपल्या विक्री केंद्राला नाव दिले आहे. 
  • दिवसाची सुमारे उलाढाल ही दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत होते. या व्यवसायातून सुमारे २० टक्के नफा मिळतो. 
  • राजकुमार यांच्या व्यवसायातील टीप्स, निरीक्षणे 

  • कामगारांची अन्‌ उपलब्धता व लहरीपणा 
  •  कोणत्याही कष्टाची तयारी असणे अपेक्षित 
  • मालाची गुणवत्ता चांगलीच ठेवावी लागते. त्यात तडजोड नाही 
  • व्यवसायातील सूक्ष्म बारकावे लक्षात घ्यावे लागतात. 
  • स्वच्छता ठेवावी लागते. 
  • ग्राहकांच्या मागणीनुसार नवे बदल करावे लागतात. 
  • -अाधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. रसायनांचा वापर कमी करावा लागतो. 
  • भविष्यातील वाटचाल 

  • कामगारांची समस्या सोडविण्यासाठी प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा विचार 
  • बेकरी पदार्थ ‘आॅनलाइन’ पद्धतीतून घरपोच देण्याचा विचार    दुग्धव्यवसायाचाही आधार  गावी दुग्धव्यवसायही सुरू आहे. घरगुती आणि अन्य ठिकाणाहून सुमारे आठशे लिटर दूध आणून त्याची निगडीतील साईनाथनगर येथे थेट विक्री केली जाते. दही, लोणी, चक्का, मलई पनीर, तूप, श्रीखंड, आईस्क्रीम आदी पदार्थ तयार केले जातात. त्यातून चांगले उत्पन्न मिळते.  कृषी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण  राजकुमार यांच्या बेकरीत कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थीदेखील अभ्यासक्रमांतर्गत प्रशिक्षणाची संधी घेतात. त्यातूनच आदर्श व्यावसायिक म्हणून राजकुमार यांनी कसे नाव कमावले आहे याची प्रचिती येऊ शकते. त्यांना आपले गाईड डॉ. एस. एस. कदम यांचे मार्गदर्शन मिळते.  संपर्क : राजकुमार सावळे- ९११२७८४५२७ 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com