चांदक-गुळूंब अोढा जोडप्रकल्पाने साधली टॅंकरमुक्ती

सर्व अधिकारी, ग्रामस्थ अशा सर्वांनी हा प्रकल्प मेहनतीने पूर्ण केला. पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता सुटल्याने टँकर बंद झाला आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर आम्ही काटकसरीने वापर करीत आहोत. - अल्पना यादव, माजी सरपंच
 चांदक गावातील या सिमेंट बंधाऱ्यांतून पाणी आणण्यात आले. चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्पात या पद्धतीने पाइपलाइन उभारण्यात आली
चांदक गावातील या सिमेंट बंधाऱ्यांतून पाणी आणण्यात आले. चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्पात या पद्धतीने पाइपलाइन उभारण्यात आली

सातारा जिल्ह्यातील चांदक-गुळुंब (ता. वाई) हा ओढा जोडप्रकल्प म्हणजे केवळ राज्यासाठीच नव्हे; तर देशासाठी ‘रोल मॉडेल’ ठरणारा आहे. या प्रकल्पामुळे चांदक-गुळुंब ही गावे टँकरमुक्त झाली अाहेत. बारमाही अर्थात बागायती पिके शेतकरी घेऊ लागली आहे. तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाले, मात्र पाण्याची टंचाई जाणवलेली नाही. या प्रकल्पाने गुळुंब ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील आनंदही पाण्याप्रमाणे अोसंडून वाहताना दिसला आहे. सातारा जिल्ह्यात माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या तालुक्यांप्रमाणे पश्चिमेकडील काही तालुक्यांत कमी पर्जन्यमान होते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागतो. वाई तालुक्यातील गुळुंब, चादकसह परिसरातील १४ गावांचा यात समावेश होतो. साधारणपणे जानेवारी महिन्यापासून या गावांमध्ये पाण्याची टंचाई भासण्यास सुरवात होते. खरे तर गुळुंब येथे पाझर तलाव होता. मात्र पर्जन्यमान कमी असल्यामुळे त्यात पाणी साठत नव्हते. तसेच तो गाळाने भरलाही होता. प्रशासनाकडून अावाहन गुळुंब हे २५०० लोकवस्तीचे गाव आहे. कायम पाणीटंचाईला सामोरे जाणाऱ्या इथल्या महिलांना पाण्यासाठी दोन ते अडीच किलोमीटर पायपीट करावी लागे. जनावरांची अशीच अवस्था होती. शेतकऱ्यांचा विहिरीही कोरड्याच पडलेल्या असायच्या. गावचे रूप पालटण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अाश्विन मुदगल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी पुढाकार घेतला. ग्रामसभेचे अायोजन करण्याविषयी सरंपच अल्पना यादव यांना सांगितले. या वेळी दुष्काळमुक्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. आवश्यक सर्व मदत प्रशासन करेल, असे अाश्वासन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिले. ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा देत श्रमदानासह पाच लाख रुपये लोकवर्गणी उभारण्याची तयारी दर्शविली. वाई ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व गुळुंब ग्रामस्थ यांच्यात बैठक झाली. त्यानुसार शेजारील चांदक गावातील साठवण बंधाऱ्यातून पाणी आणून गुळुंब गावातील पाझर तलावात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ओढा जोड शुंभारंभ चांदक ते गुळुंब गुळुंब पाझर तलाव हे अंतर ११३० मीटर आहे. या तलावाची क्षमता ४९७ टीसीएम आहे. या ओढा जोडप्रकल्पाच्या शुभारंभाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, सरपंच यांच्यासह आमदार मकरंद पाटील, माजी खासदार लक्ष्मण पाटील आदींचीही उपस्थिती होती. दोन जानेवारी, २०१५ रोजी कामाचा हा श्रीगणेशा झाला. निधीची उभारणी या प्रकल्पासाठी निधीची गरज होती. यासाठी मॅप्रो कंपनी व ज्ञानदीप सहकारी पतसंस्था यांच्याकडून प्रत्येकी २० लाख रुपये, आमदार निधीतून १५ लाख, गुळुंब ग्रामस्थांकडून पाच लाख, किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून उत्खननासाठी ३० लाख, जलयुक्त शिवार अभियानातून पाच लाख ३८ हजार, अथर्व फाउंड्रीकडून दोन लाख, सेंट पिटर्स शाळेकडून तीस हजार व सकाळ रिलीफ फंडातून गाळ काढण्यासाठी दोन लाख अशी रक्कम उभारण्यात आली. निधीचा विनियोग संकलित निधीतून चांदक येथील सिमेंट बंधाऱ्यास लागून ‘कलेक्शन चेंबर’ बांधण्यात आला. त्यातून पाइपलाइनमध्ये पाणी सोडण्यासाठी लोखंडी दरवाजा उभारण्यात आला. सर्व पाइपलाइनसाठी ५०० मीमी व्यासाच्या आरसीसी पाइप्सचा वापर केला. पाझर तलावापर्यंत त्या नेण्यात आल्या. तीन ठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसवण्यात आले. विजेचा खर्च येऊ नये यासाठी सायफन पद्धतीच्या रचनेचा वापर करण्यात आला. शेतातून मोठ्या यंत्राद्वारे चर काढण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाइपलाइन जाऊन नुकसान झाले आहे, अशांना ग्रामपंचायतीच्या वतीने भरपाई देऊ केली आहे. प्रत्येकाचे लाभले सहकार्य कोल्हापूर येथील संजय पाटील, बी. एम. पठाण यांनी यांनी प्रकल्पाची रचना केली. तसेच तत्कालीन प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, दीपा बापट, अतुल म्हेत्रे, राजकुमार साठे यांच्या गावातील ग्रामस्थांनी प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. प्रकल्पासाठी ८९ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. पाणीटंचाई दूर झाली मागील दोन वर्षांत दमदार पाऊस झाल्याने गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहिला. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने तलाव भरलेला नाही. मात्र पिण्याच्या पाण्यासाठीची टंचाई दूर झाली. गुळुंब, चांदकसह परिसरातील अनेक गावे आता जवळपास टँकरमुक्त झाली आहेत. मागील दोन वर्षे ओसंडून वाहणारा गुळुंबचा तलाव आणि त्याहीपेक्षा ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद हे जलयुक्त शिवार अभियान, ग्रामस्थाचे श्रमदान, पुढाकार यांचे यश म्हणाले लागेल. अल्पना यादव यांच्या नेतृत्वाखाली येथे तनिष्का गट कार्यरत अाहे. गटातील महिला प्रकल्पासह गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात. प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित राहावा, यासाठी विद्यमान पदाधिकारी, महिला तसेच तरुण मंडळेदेखील कार्यरत आहेत. चांदक-गुळुंब ओढा जोड प्रकल्पाचे झालेले फायदे

  • चांदक, गुळुंब यांसह अनेक गावांना पाण्यासाठी शाश्वत पर्याय झाला. पिण्यासाठी पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सुटला.
  • पाझर तलावाखाली असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या तीन तसेच कृषी क्षेत्रासाठी २८ विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली.
  • सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. यामुळे गावांसह परिसरात पीकपद्धतीत बदल झाला.
  • शेतकरी ऊस, आले, हळद आदी नगदी पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होण्याची संधी निर्माण झाली आहे.
  • पाणीटंचाईची जाणीव असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर केला जातो. नगदी पिकांसाठी ठिबक सिंचनावर शेतकऱ्यांकडून भर दिला जात आहे.
  • टँकरवर होणारा दहा लाख रुपये वार्षिक खर्च पूर्णपणे थांबला आहे.
  • चांदक टँकरमुक्त होण्यासाठी पिण्याच्या पाण्याची विहीर गुळुंबच्या तलावानजीक घेण्यात आली आहे. या विहिरीत कायम पाणी राहत असल्याने चांदकही टँकरमुक्त झाले आहे.
  • मान्यवरांकडून पाहणी राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी मे, २०१५ मध्ये प्रकल्पाला भेट देऊन प्रशासन व ग्रामस्थांचे कौतुक केले. पालकमंत्री विजय शिवतारे, कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराज पुणे विभागाचे आयुक्त यश चोक्कलिंगम यांच्यासह प्रशासन व राजकीय मंडळींनीही भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेतली. प्रतिक्रिया विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गावात नगदी पिके घेतली जात असल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होत आहे. ठिबकचा वापरही वाढला आहे. - सागर जाधव, उपसरंपच शेतीस पाणी उपलब्ध झाले. यामुळे बारमाही बागायत शेती करणे शक्य झाले आहे -आर. एम. जाधव, शेतकरी संपर्क- अल्पना यादव - ९९२२४२३३०१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com