agriculture story in marathi, agrowon sarpamch mahaparishad, alandi, pune | Agrowon

सरपंचांची ताकद एकत्र झाल्यास चमत्कार होईल : सरपंच चंदू पाटील
टीम अॅग्रोवन 
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

आळंदी, जि. पुणे : केवळ भाषणाने गाव, समाज बदलत नाही. गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्‍यकता असून, प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात केली पाहिजे. सरकारचे नियमही बदलता येतात; मात्र त्यासाठी एकजूट झाले पाहिजे. राज्यातील सरपंचांची ताकद एकत्र झाली तर चमत्कार होईल, असे मत चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड (ता. मूल) येथील सरपंच चंदू पाटील यांनी व्यक्त केले. 

आळंदी, जि. पुणे : केवळ भाषणाने गाव, समाज बदलत नाही. गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्‍यकता असून, प्रत्येकाने स्वतःपासून सुरवात केली पाहिजे. सरकारचे नियमही बदलता येतात; मात्र त्यासाठी एकजूट झाले पाहिजे. राज्यातील सरपंचांची ताकद एकत्र झाली तर चमत्कार होईल, असे मत चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड (ता. मूल) येथील सरपंच चंदू पाटील यांनी व्यक्त केले. 

अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत बोलताना पाटील म्हणाले, की निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील लोकांनी नाव पुढे केल्याने मी सरपंच झालो. शहरात वाढलो असल्याने माझी पाटी कोरी होती. गावाला तीर्थस्थळ मानून महिला आणि युवकांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान सुरू केले. यातून गावाला दीड कोटी रुपयांची बक्षिसे मिळाली. गावचा विकास झाला अन् झोपडीतील ग्रामपंचायत दुमजली झाली. पाटील म्हणाले, की सरपंचांनी भांडत बसण्यापेक्षा मार्ग कसा काढता येईल याकडे लक्ष द्यावे. शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढवावा. तसेच, टीका करण्यापेक्षा चांगली कामे करण्यावर भर द्यावा. देशाच्या नकाशावर गावाची ओळख निर्माण करण्यासाठी सरपंचांनी स्वत:मधील क्षमता जागृत केली पाहिजे. 
 
सरंपच शासन निर्णयही बदलू शकतो 
स्वच्छतेच्या कामातून मिळालेली पारितोषिकांची रक्कम स्वच्छता आणि पाणीपुरवठ्यासाठीच खर्च केली पाहिजे, असा निर्णय शासनाने घेतला होता. पैसे असूनही अन्य विकासकामे करणे शक्य होत नव्हते. शासन निर्णय बदलता येत नसल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. शेवटी मंत्रालयात सचिवांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. ग्रामसभेच्या मान्यतेने बक्षिसांचा निधी खर्च करण्याचा निर्णय शासनाने घेतला. एक सरपंच शासन निर्णयही बदलू शकतो, हे दाखवून दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

इतर यशोगाथा
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
मातीला गंध पुदीन्याचा....सांगली जिल्ह्यात मिरज शहराजवळील मुल्ला मळ्यात...
स्मार्ट शेती भाजीपाल्याची वर्षभरातील तीन हंगामांत मिरची, त्यातून...
खिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...
कमी कालावधीच्या हळदीची शेती; काबुली...महागाव (जि. यवतमाळ) येथील ‘एमबीए’ झालेले जयंत...
कमी पाणी, अल्प खर्चातील ज्वारी ठरतेय...जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा नदीच्या काठावरील...
पेरू फळबागेने दिली शेतीला दिशाठाणे शहरात महावितरणमधील नोकरी सांभाळून तुषार वसंत...
शेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...
थोरातांची राजगिऱ्याची व्यावसायिक शेतीपरभणी जिल्ह्यातील खानापूर (ता. परभणी) येथील तरुण...
दुष्काळी परिस्थितीत नैसर्गिक शेती...शेतीतील वाढता उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा...
हुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्गदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन...
संघर्ष, चिकाटीतून साकारलेला ...जालना जिल्ह्यात कायम दुष्काळी शिरनेर येथील देवराव...
अंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याचे `...कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील श्री दत्त...
अभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया...शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो,...
तंत्रज्ञानातून शेती केली समृद्धरोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव...
प्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...
शिक्षण, ग्रामविकासाला `श्रमजीवी'ची साथसातारा जिल्ह्यातील श्रमजीवी जनता सहायक मंडळ ही...
उत्कृष्ट रेशीम कोष उत्पादनासह चॉकी...शेती केवळ चार एकर. पैकी साडेतीन एकरांत केवळ तुती...