agriculture story in marathi, agrowon sarpanch mahaparishad, alandi, pune | Agrowon

कायद्याचा अभ्यास केल्यास अडचणी दूर होतील : नामदेव घुले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

कायद्याचा अभ्यास सरपंचांसाठी महत्त्वाचा आहे. कायद्याने काम केले तर कोणतीही अडचण सरपंचांना भेडसावणार नाही. माहिती अधिकाराची अडचणही सरपंचांबरोबर ग्रामसेवकांपुढे येणार नाही असे प्रतिपादन ग्रामपंचायतींच्या कायद्याचे अभ्यासक नामदेव घुले यांनी केले.

कायद्याचा अभ्यास सरपंचांसाठी महत्त्वाचा आहे. कायद्याने काम केले तर कोणतीही अडचण सरपंचांना भेडसावणार नाही. माहिती अधिकाराची अडचणही सरपंचांबरोबर ग्रामसेवकांपुढे येणार नाही असे प्रतिपादन ग्रामपंचायतींच्या कायद्याचे अभ्यासक नामदेव घुले यांनी केले.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम याबाबत त्यांनी सरपंच महापरिषदेत विचार मांडले. श्री. घुले म्हणाले, की सरपंचांनी कायद्याची माहिती घेणे गरजेचे आहे. कायद्यांबाबत अज्ञानी राहून चालणार नाही. तसे झाल्यास अनेकदा चुकीचे निर्णय होतात. दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक अनेक गावांमध्ये श्रीमंतदेखील आहेत. हा घोळ कायद्यानुसार काम न केल्याने व कायद्याची माहिती नसल्याने अधिक झाला. आपला देश संविधानानुसार चालतो. कायदा मोठा आहे. सरपंचपद हे आव्हानात्मक पद आहे, त्यामुळे पुढील आव्हाने पार करीत असताना ग्रामपंचायतींच्या नियमांची माहिती असली तर कोणतीही अडचण येणार नाही. कायदेशीरपणे काम केले तर लोकांचा विश्वास वाढतो.

लोकांचा विश्‍वास सोबत हवा

अलीकडे माहितीच्या अधिकारांबाबत तक्रारी दिसतात; परंतु पारदर्शकपणे काम केले तर कोणतीही अडचण येणार नाही. मग माहितीच्या अधिकाराची भीतीही वाटणार नाही. लोकांचा विश्वास सोबत असला तर मग कामेही गतीने होतात. ग्रामपंचायतीला अन्न विभाग, ग्रामविकास व अन्य अनेक अधिकार आहेत; परंतु त्यांची माहिती आपल्याला नसते. या संदर्भात कामे करताना म्हणूनच अडचण येते. ग्रामसभेला अलीकडे अधिकार वाढवून मिळाले आहेत, त्यामुळे हवी ती कामे साध्य करता येतील. ग्रामसभेचे अधिकार कोणते आहेत या संदर्भातील काम सुरवातीला सरपंच मंडळींनी केले पाहिजे, असेही घुले यांनी भाषणात सांगितले.

इतर यशोगाथा
शेतीला मिळाली बीजोत्पादनाची साथबोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावशिवारात चंद्रशेखर...
'जलवर्धिनी' करतेय लोकशिक्षणातून जल...जलवर्धिनी प्रतिष्ठानतर्फे पाण्याचे संधारण आणि...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधीनेवासा (जि. नगर) येथे नऊ वर्षापूर्वी बारा...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
दर्जेदार गांडूळखताला तयार केले मार्केटकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल)...
ग्रेडिंग, कोटींगद्वारे संत्र्याचे...सालबर्डी (जि. अमरावती) येथील संत्रा उत्पादक नीलेश...
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
जरंडीच्या पाटलांनी जोपासली देशी संकरित...राज्यात, देशभरात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाखाली...
जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम...जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही...
तूप, खवा निर्मितीसह उभारली सक्षम...दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात...
मका पिकाला दुग्धव्यवसायाची जोड खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...