agriculture story in marathi, agrowon, village development, vadgaon haveli, karad, satara | Agrowon

पिंगोरीची दुष्काळावर मात, भाजीपाला शेतीसह उभारली थेट विक्री व्यवस्था 
गणेश कोरे
गुरुवार, 28 फेब्रुवारी 2019

माझी दीड एकर शेती आहे. आम्ही समन्वयातून विविध भाजीपाला उत्पादन घेतो. जय गणेश जलसागर आणि शेततळ्याद्वारे पाण्याच्या उपलब्धततेमुळे उन्हाळ्यातही भाजीपाला घेणे शक्य झाले आहे. 
थेट विक्री होत असल्याने बाजार समितीत होणारी फसवणूक थांबली आहे. आमच्या भाजीपाल्याला साहजिकच जास्त दर मिळत आहे.
- राहुल चौधरी, शेतकरी, पिंगोरी  
 
 

 अगदी २०१२ पर्यंत दुष्काळी असलेल्या पिंगोरी (जि. पुणे ) गावाने लोकसहभागातून विकासाची कात टाकली. जलसंधारणाच्या विविध कामांतून गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले. सामूहिक शक्तीचे दर्शन घडवत शेतीत वेगळे काही करायचे हा मानस ठेवला. गावात भाजीपाला शेती सुरू झाली. एवढ्यावर न थांबता पुण्यातील प्रसिद्ध ‘टाऊनशीप’ मधील ग्राहकांना जोडणारी विक्री व्यवस्था उभारली. सुमारे ४४ शेतकऱ्यांनी एकमेकांना साथ देत सुमारे ५० एकरांवर रसायन अंशमुक्त भाजीपाला शेती पिकवित ४०० ग्राहक जोडण्यापर्यंत पल्ला गाठला आहे. 
 
दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न 
पिंगोरी हे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील दुष्काळी गाव. सन २०१२ पर्यंत गावात रब्बीत ज्वारीचे पीक घेतले जायचे. गावाला पाझर तलाव होता. मात्र मोठ्या प्रमाणावर गाळ साठल्याने पाणीधारण क्षमता कमी झाली होती. उन्हाळ्यात पाणी टिकत नव्हते. दरम्यान २०१२ मध्ये पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या वतीने हा गाळ काढण्याचे काम हाती घेतले. गावातील बुजलेले ओढे, नाले यांचेही खोली-रूंदीकरण श्रमदानातून करण्यात आले. पाच- सहा वर्षांत जलसंधारणांच्या कामांमुळे गावातील विविध पाणीसाठे जिवंत झाले. यंदा सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र पांगरीतील ओढा मात्र खळखळ वाहताना दिसणे हा सुखद धक्का म्हणावा लागेल. 

विकासाच्या वाटा शोधल्या 
गावाचा विकास करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे व सर्वांची त्यास साथ मिळणे गरजेचे असते. 
पांगरीत तेच घडले. बाबा शिंदे यांनी पुढाकार घेतला. गावात साकारणाऱ्या विकास प्रकल्पाचे समन्वयक म्हणून त्यांनी जबाबदारी पेलली. लोकसहभागातून पाण्याची संरक्षित सोय झाल्यानंतर 
शेतीच्या विकासाचा विचार सुरू झाला. ठिबकद्वारे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबरोबर भाजीपाला शेती उपक्रम हाती घेतला. 

सेंद्रिय पद्धतीची गटशेती व थेट विक्री 
गावातील ४४ शेतकऱ्यांचा ‘जय गणेश सेंद्रिय शेती गट' तयार झाला. एकमेकांच्या विचारांनी, मार्गदर्शनातूमन नियोजन सुरू झाले. सुमारे ५० एकरांवर विविध प्रकारच्या २५ प्रकारच्या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेणे आता सुरू झाले आहे. ठिबक सिंचनासाठी रोटरी क्लब ऑफ स्पोर्ट सिटी, औंध यांची मदत झाली. शेतमाल बाजार समितीत पाठवण्यापेक्षा थेट विकला तर आपल्या हाती अधिक पैसा येईल असा विचार शेतकऱ्यांनी केला. प्रकल्प समन्वयक बाबा शिंदे पुणे शहरातील प्रसिद्ध ॲमेनोरा या ‘टाऊनशीप’ मध्ये राहात होते. त्यामुळेच इथेच आपल्या मालाला मोठी बाजारपेठ मिळेल असा विचार त्यांनी केला. विविध रहिवाशांसोबत चर्चा केली. ‘ॲमेनोरा’ मधील ग्राहक महिलांना मालाच्या गुणवत्तेबाबत खात्री पटावी यासाठी दीडशे जणांची सहल पिंगोरी येथे काढण्यात आली. या महिलांनी 
गटाची शेती व उत्पादनाची पद्धत प्रत्यक्ष पाहिली. 

मागणीनुसार शेती व पुरवठा 
पिंगोरीतील भाजीपाला ॲमेनोरा टाऊनशीपमध्ये विकला जात आहे. मालाचे अतिरिक्त उत्पादन होऊ नये तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार लागवड करण्याचे धोरण शेतकऱ्यांनी अवलंबिले आहे. एका हंगामात एक शेतकऱ्यांने जे पीक घेतले, ते दुसऱ्या हंगामात दुसरा घेतो. चक्राकार पद्धतीने मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, टोमॅटो, वांगी, काकडी, मटार, घेवडा, पावटा, फ्लॉवर, कोबी, मिरची, कलिंगड, खरबूज, अंजीर, शेवगा आदी विविधता येथील शेतकरी घेऊ लागले आहेत. 

विक्रीचे पद्धतशीर नियोजन 

  • आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार पुरवठा 
  • प्रति दिन साधारण १०० ग्राहकांकडून मागणीची नोंद. प्रति ग्राहकाकडून सुमारे दीडशे रुपयांच्या भाजीपाल्याची खरेदी. प्रति दिन १२ ते १५ हजार रुपयांची विक्री. 
  • निऑन टॉवर येथेही किरकोळ स्वरूपात १२ ते १५ हजार रुपयांची विक्री 
  • डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी भाजीपाला काढणी होऊन रात्रीच्या सुमारास टेम्पो ‘ॲमेनोरा’ मध्ये येतो. या ठिकाणी असलेल्या संकलन केंद्रात तो ठेवला जातो.
  • 'टाऊनशीप’ मध्ये इमारतनिहाय ‘व्हॉटसअॅप ग्रूप’ बनविण्यात आले आहेत. त्याद्वारे शेतकऱ्यांच्या वतीने समन्वयक उद्या कोणता भाजीपाला उपलब्ध असेल त्याची यादी दरांसह ‘शेअर’ करतो. 
  • त्यानुसार ‘ग्रूप’मधील महिला आपल्या प्लॅट क्रमांकासह मागणी नोंदवितात. 
  • त्यानुसार क्रेटमधून तो सकाळी ११ वाजेपर्यंत घरपोच दिला दातो. पैसे रोखीने किंवी ‘ऑनलाईन’द्वारे दिले जातात. 

देशी वाण, गोवंश संवर्धन 
पुढील वर्षापासून भाजीपाल्याच्या देशी वाणांची लागवड पिंगोरीकर करणार आहेत. कृषी विभाग, बाएफ संस्था व देशी वाण संवर्धकांशी त्यासाठी संपर्क व संकलन ही कामे सुरू केली आहे. सेंद्रिय शेतीसाठी आवश्‍यक देशी गोवंशांच्या शेण- मूत्राबरोबरच दूधासाठी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने देशी गोवंश संवर्धनासाठी गोशाळा सुरू होणार आहे. 

शेतकरी कंपनीची नोंदणी 
मालाच्या प्रभावी मार्केटींगबरोबरच ब्रॅंडिंग आणि शासनाच्या गट शेती योजनेत सहभागी होण्यासाठी पिंगोरी फार्मर प्रोड्यूसर कंपनीची नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पिंगोरी ऑरगॅनिक हा ब्रॅण्ड विकसित करण्यात आला असून त्याची नोंदणी करण्यात येणार आहे. 

पणन परवाना आणि वाहन 
भाजीपाला विक्रीसाठी शहरांत कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून पणन संचालनालयाकडून परवाना घेण्यात आला आहे. शीतवाहन मिळण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. या दोन्ही कामांसाठी पणन मंडळाचे त्यासाठी पणन संचालक दीपक तावरे व कार्यकारी संचालक सुनील पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

पाच तरुणांना रोजगार 
थेट शेतमाल विक्री व्यवस्थेतून पाच तरुणांना रोजगार मिळाला असून थेट आणि किरकोळ विक्रीतून महिन्याला सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांची उलाढाल होते. यामधील पाच तरुणांना किमान १० हजार रूपये वेतन मिळते. एका टेम्पो चालकाला शाश्‍वत रोजगार मिळाला आहे. हे पाचही तरुण पिंगोरीमधील आहेत. 

ग्राहक प्रतिक्रिया 

पिंगोरीतील शेतकरी आणि ॲमेनोरा सिटीझन्स असा संयुक्त उपक्रम यशस्वी सुरू आहे. शेतमालाला दर न मिळण्याच्या समस्येमुळे विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी तो प्रेरणादायी आहे. त्यासाठी माझे नेहमीच सहकार्य राहील. 
- अनिरुद्ध देशपांडे 
व्यवस्थापकीय संचालक,सिटी कॉर्पोरेशन, 
ॲमेनोरा टाऊनशिप 

आम्ही पिंगोरीतील शेतकऱ्यांकडून थेट भाजीपाला खरेदी करतो. सोसायटीच्या व्हॉटसॲप ग्रूपद्वारे भाजीपाल्याची मागणी आम्ही नोंदवतो. या भाजीपाल्याचा दर्जा उत्तम असल्याने नातेवाइकांसाठीही देखील पाठवण्याची व्यवस्था करतो. 
-वंदना गायकवाड 
ॲमेनोरा टाऊनशिप 

 
सहा महिन्यांपासून ‘पिंगोरीतील भाजीपाला थेट घरपोच मिळत आहे. त्यासाठी बाजारात जाण्याची गरज उरलेली नाही. पिंगोरीतील शेती देखील प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान मला मिळाले आहे. 
- डॉ. गीता मोहन 
ॲमेनोरा टाऊनशिप 

शेतकरी प्रतिक्रिया 
माझी सात एकर शेती पाण्याच्या उपलब्धततेअभावी पडीक होती. आता उन्हाळ्यातदेखील विविध भाजीपाल्यासह कलिंगड, खरबूज घेतो. पुण्यातील थेट ग्राहकांचे मार्केट उपलब्ध झाले आहे. 
- सागर धुमाळ 
संपर्क - ८३९००२३००० 

 
संपर्क - बाबा शिंदे - ९८८११९१३५१ 

 

फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...
जमिनीच्या आरोग्य कार्डाची उपयुक्तताभारतातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
गळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्यसध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर...
विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव...कोल्हापूर जिल्ह्यातील माणगावच्या ग्रामस्थांनी...
योग्य ठिकाणीच करा पाझर तलावपाझर तलावाचा उपयोग आणि प्रयोजन हे केवळ पडणारे...
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
कडवंची : पाणंदमुक्‍त रस्त्यांची...रस्ते, पाणी आणि वीज हे शेतीविकासातील महत्त्वाचे...
कडवंची : पाणलोटाचं स्वप्न साकारकडवंची गावात जल, मृद संधारण, शेती विकासामध्ये...
‘वॉटर बजेट’ कडवंचीचे वैशिष्ट्यपाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून...
कडवंची : एकात्मिक पाणलोटातून पाणी,...पाणलोटाची जी कामे आम्ही करतो ती मृद संधारणावर...
कडवंची : ग्रामविकासाचे सूत्र : जल अन्...गाव आणि शेती विकासामध्ये ग्रामपंचायत हा...
जल व्यवस्थापनासाठी हवी लोकचळवळलक्षावधी हेक्टर जमीन, हजारो टीएमसी पाणी आणि...
लोकसहभाग, श्रमदानातून लोहसर झाले ‘आदर्श...नगर जिल्ह्यातील लोहसर (खांडगाव) येथील गावकऱ्यांनी...
भूजलाची कल्पना अन्‌ वास्तवपाणीटंचाई सुरू झाली की त्यावर उपाय करताना आपण...
दुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे...पिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य,...
अल्पभूधारक, भूमिहीन महिलांना बचतगटातून...बेल्हेकरवाडी (ता. नेवासा,जि.नगर) मधील तुकारामनगर...
मोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण...परिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा...