Agriculture story in Marathi, aonla processing | Agrowon

आर्थिक स्वावलंबनासाठी अावळा प्रक्रिया उद्योग
दीप्ती पाटगावकर
गुरुवार, 11 जानेवारी 2018

बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी विविध गृहउद्योग सुरू करता येतात. या दृष्टिकोनातून या उद्योगासाठी तांत्रिक व शास्त्रोक्त प्रशिक्षणाची आवश्‍यकता असते. या उद्योगामुळे ग्रामीण महिला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आहाराचा दर्जा वाढेल अाणि आरोग्य सुधारेल.

आवळ्याची उपलब्धता ही मर्यादित कालावीमध्येच असते. अावळ्यावर विशिष्ट प्रक्रिया करून, विविध पदार्थांद्वारे ते हे फळ वर्षभर उपलब्ध करता येते.

बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी विविध गृहउद्योग सुरू करता येतात. या दृष्टिकोनातून या उद्योगासाठी तांत्रिक व शास्त्रोक्त प्रशिक्षणाची आवश्‍यकता असते. या उद्योगामुळे ग्रामीण महिला व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आहाराचा दर्जा वाढेल अाणि आरोग्य सुधारेल.

आवळ्याची उपलब्धता ही मर्यादित कालावीमध्येच असते. अावळ्यावर विशिष्ट प्रक्रिया करून, विविध पदार्थांद्वारे ते हे फळ वर्षभर उपलब्ध करता येते.

१) आवळ्याचा मुरावळा
१ किलो आवळे पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत. चिंचोक्‍याएवढ्या चुन्याच्या निवळीत आवळे ४ तास भिजू घालावेत. एका मोठ्या पातेल्यात एक ग्लास पाणी उकळण्यास ठेवून वर चाळणीत आवळे ठेवावेत. त्यावर झाकण ठेवून ते वाफवून घ्यावेत. दोन किलो साखरेचा दोन तारी पाक करावा. पाक करताना साखर भिजेपर्यंत पाणी मिसळावे. पाकात आवळे टाकून पाच मिनिटे उकळावे. गार झाल्यानंतर बरणीत भरून ठेवावे. मुरावळा पाच-सहा दिवस बरणीला फडके बांधून उन्हात ठेवल्यास खराब होत नाही.

२) आवळा कॅंडी
पाण्यात चुना मिसळून त्यात आवळे धुऊन घ्यावेत. वरीलप्रमाणेच वाफवून बी काढून घ्यावेत. छोटे छोटे तुकडे करून एका मोठ्या पातेल्यात आवळ्याचे तुकडे साखर एकत्र करून त्यावर कपडा बांधून उन्हात तीन-चार दिवस ठेवावे. चाळणीत ओतावे. पाक सगळा गळून जाईल आणि वर कॅंडी राहील. कॅंडी तीन-चार दिवस सावलीत वाळवावी. गाळून खाली उरलेला पाक सरबत करताना वापरावा. पुदिना व बीटच्या सरबतात हा रस मिसळता येतो. पचन सुलभ होते. पाक टिकण्याकरिता एक किलो साखरेचा दोन तारी पाक करावा. त्यात हा पाक मिसळून चांगले उकळावे. थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावा.

३) आवळा सुपारी
आवळे उकडून घ्यावे. एक ग्लास पाण्यात २० ग्रॅम ओवा व ५ ग्रॅम अद्रकाची भरड मिसळून अर्धा ग्लास होईपर्यंत आटवावे. पिठाच्या चाळणीने चाळून घ्यावे. मीठ व दोन लिंबांचा रस घालून या पाण्यात रात्रभर आवळ्यांचे तुकडे भिजवावेत व सकाळी वाळवावेत.

४) आवळ्याचा कीस
मोठे आवळे स्वच्छ धुऊन पुसून कोरडे करावेत. जाड किसणीने किसून एक किलोस दोन वाटी साखर मिसळून प्लॅस्टिकवर उन्हात वाळू घालावेत. किसात रस जास्त वाढल्यास थोडे पिळून घ्यावे.

संपर्क ः दीप्ती पाटगावकर, ९४०४९८८७७०
(कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद)

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...