Agriculture story in marathi, automatic technology for weed control | Agrowon

तण नियंत्रणासाठी स्वयंचलित यंत्रणा
महेश जाधव, मनीषा जगदाळे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

तणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो. तणांच्या नियंत्रणासाठी मुख्यतः यांत्रिक पद्धती, जैविक नियंत्रण, उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर केला जातो. पिकांच्या दोन ओळीमधील तण काढण्यासाठीची यंत्रांची उपलब्धता आहे. सध्याच्या काळात शेतीमध्येही रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये वाढू लागला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आता तण नियंत्रणासाठी कसा करता येईल, याबाबत जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.

तणे पिकांसोबत पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे पीक उत्पादनावर परिणाम होतो. तणांच्या नियंत्रणासाठी मुख्यतः यांत्रिक पद्धती, जैविक नियंत्रण, उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर केला जातो. पिकांच्या दोन ओळीमधील तण काढण्यासाठीची यंत्रांची उपलब्धता आहे. सध्याच्या काळात शेतीमध्येही रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये वाढू लागला आहे. या तंत्रज्ञानाचा वापर आता तण नियंत्रणासाठी कसा करता येईल, याबाबत जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत.

स्वयंचलित यंत्राची कार्यप्रणाली ः
साधारणतः तण काढणी करणाऱ्या यंत्रामध्ये मार्गदर्शक आणि मॅपिंग यंत्रणा, तण शोधणारी आणि ओळखणारी यंत्रणा आणि पिकाच्या ओळीतील तण काढणी यंत्रणा कार्यरत असते.

मार्गदर्शन आणि मॅपिंग यंत्रणा ः

  • स्वयंचलित तण काढणाऱ्या यंत्रामध्ये मार्गदर्शनासाठी विशिष्ट यंत्रणा बसविलेली असते. विशेषतः आर. टी. के.– जी. पी. एस. (रिअल टाइम कायनेमेटिक-ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
  • यंत्रणेमध्ये वापरलेल्या कॅमेराच्या साहाय्याने पिकांच्या ओळीमधील जागेचा अंदाज घेतला जातो. त्यानुसार ही यंत्रणा पिकाच्या ओळीमध्ये अचूक चालते. आर.टी.के.–जी.पी.एस. यंत्रणेचा वापर करून हेच काम अधिक अचूकपणे करता येते, परंतु यासाठी पिकाची लागवडदेखील याच यंत्रणेच्या साहाय्याने करणे आवश्यक असते.
  • या प्रणालीसाठी आवश्यक असलेले जी.पी.एस. बेस स्टेशन शेतीपासून किमान अंदाजे १० किलोमीटरच्या आत असणे आवश्यक असते. ही यंत्रणा पिकाच्या छायाचित्रीकरणावर अवलंबून नसल्याने जास्त तण घनता, सावली, तुटाळे इत्यादींचा कार्यक्षमतेवर काही फरक पडत नाही.

२) तण शोधणे आणि ओळखणे ः
यंत्रातील दृष्टी मार्गदर्शन यंत्रणेमध्ये तण आणि पीक ओळखण्यासाठी तणाच्या भूमितिक आणि संरचनात्मक आकारशास्त्र, रंग किंवा वर्णनात्मक परावर्तनाचा वापर केला जातो. या पिक्सेल आधारित हायपर स्पेक्ट्रल वर्गीकरणाचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की हे अंशतः लपलेल्या किंवा झाकाळलेल्या वनस्पतीलादेखील ही यंत्रणा प्रभावीपणे ओळखू शकते.
 
३) तण काढणारी यंत्रणा ः
तणामुळे होणारे पिकाचे नुकसान पाहता तण काढण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करण्यात येतो. यामध्ये यांत्रिक तंत्र, रासायनिक पद्धती, औष्णिक पद्धती आणि विद्युत पद्धतीचा समावेश होतो.
अ) यांत्रिक तंत्र ः
यांत्रिक पद्धतीमध्ये ओळीमधील मशागतीसाठी ब्लेडचा वापर केला जातो, जे पिकाच्या स्थितीप्रमाणे आत-बाहेर किंवा वर-खाली अशी हालचाल करतात. जेणेकरून पिकाला नुकसान होत नाही आणि तणाची व्यवस्थित काढणी करता येते.
ब) रासायनिक पद्धती ः
यंत्रणेतील आराखड्यानुसार तणनाशकाचा वापर केला जातो. परंतु समजा पीक आणि तणाची ओळख चुकली, तर नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी यंत्रणा वापरताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते.
क) औष्णिक पद्धती ः
ही यंत्रणा तण लहान असतील, तर जास्त उपयुक्त ठरते. हे तंत्र वापरताना पिकाला उष्णतेपासून वाचवण्यासाठी अडथळा म्हणून हवा किंवा पाण्याचा वापर केला जातो. तसेच काही वेळा अग्निज्योतऐवजी उकळते पाणी (सुमारे २०० अंश सेल्सिअस) देखील तणावर फवारणीसाठी वापरले जाते.
ड) विद्युत पद्धती
विद्युत प्रोब तणाला स्पर्श करून किंवा १ ते २ सेंमी. अंतरावरून विद्युत झटका देतो. त्यामुळे तण मरते. या पद्धतीचा प्रमुख फायदा असा मातीची हालचाल कमी होते, तसेच तणनाशक जमिनीत मिसळत नाहीत. परंतु, यंत्रणा अचूक नसेल, तर उष्णतेचा धोका असतो.
( संदर्भ ःयांत्रिक तणनियंत्रण (संदर्भ: Tillett et al., २००८),औष्णिक तणनियंत्रण (संदर्भ: Pyroweeder संकेतस्थळ)
 
स्वयंचलित यंत्राचे फायदे ः

  • पीक ओळीच्या आत आणि पिकाजवळील तण काढून टाकण्यास मदत.
  • स्वयंचलित तणनियंत्रण प्रणाली टोमेटो, कापूस आणि पालेभाज्यांसारख्या एकसमान अंतरावर लागवड केलेल्या पिकांसाठी उपयुक्त.
  • मजूर वापरात ७० टक्के आणि तणनाशक वापरामध्ये ७५ टक्क्यांपर्यंत बचत.
  • उच्च कार्यक्षमता, कमी कालावधीत तण नियंत्रण.

यंत्रणेबाबत संशोधन ः
परदेशात तण नियंत्रणासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर सुरू झाला आहे. भारतामध्येदेखील कमी किमती आणि देशी बनावटीच्या यंत्र निर्मितीबाबत भोपाळ येथील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, खरगपूर येथील भारतीय प्रोद्योगिक संस्था आणि देशातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे.
 
संपर्क ः मनीषा जगदाळे ९८५०१३५४६९
(केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ, मध्य प्रदेश) 

इतर टेक्नोवन
कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...
दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...
लसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...
मधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...
सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...
मलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...
यंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...
हायड्रोपोनिक्स चारानिर्मिती यंत्रणादुष्काळी परिस्थिती दुभत्या जनावरांना पुरेसा हिरवा...
जैवइंधनावर चालणाऱ्या यंत्राची निर्मिती...सध्या पडिक आणि लागवडीखाली नसलेल्या जमिनीमध्ये...
धुरळणी यंत्र फायदेशीरधुरळणी यंत्राद्वारे पावडर स्वरूपातील रासायनिक...
देखभाल ठिबक, तुषार सिंचन संचाची...सध्याच्या काळात पाण्याच्या काटेकोर वापरासाठी ठिबक...
असे करा ट्रॅक्‍टरचे व्यवस्थापन ट्रॅक्‍टरचा कोणता भाग कधी बदलावयाचा यासाठी काही...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
खाद्य मिश्रण यंत्र, डाटा फ्लो तंत्राचा...सिन्नर (जि. नाशिक) येथील जनक कुंदे या अभियंता...
कडवंची : ब्लोअरनिर्मिती उद्योगाची सुरवातकडवंची गावातील कृष्णा क्षीरसागर, सुनील जोशी या...
सिरकॉटने तयार केले दहन सयंत्र, जिनिंग...नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्‍...
फुलांचा ताजेपणा टिकविण्यासाठी...घर किंवा कार्यालयामध्ये सजावटीसाठी फुलांचा वापर...